AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India A : सलग 2 पराभवांमुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ, अफगाणिस्तान विरुद्ध शेवटची संधी

India A vs Afghanistan A : टीम इंडियाला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात कोणत्याही स्थितीत जिंकावं लागणार आहे.

India A : सलग 2 पराभवांमुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ, अफगाणिस्तान विरुद्ध शेवटची संधी
Vaibhav Sooryavanshi Team India A Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Jun 16, 2026 | 6:40 AM
Share

इंडिया ए टीमचा 15 जून रोजी ट्राय नॅशन ए सीरिजमध्ये सलग दुसरा पराभव झाला. टीम इंडियाला आधी डीएलएसनुसार अफगाणिस्तान विरुद्ध पराभूत व्हावं लागलं होतं. तर सोमवारी 15 जूनला भारताला श्रीलंकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. भारताने अशाप्रकारे सलग 2 सामने गमावले. त्यामुळे आता टीम इंडियाला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात कोणत्याही स्थितीत जिंकावं लागणार आहे. त्यामुळे आता भारताची करो या मरो अशी स्थिती झाली आहे.

विजयी सलामी आणि मग सलग 2 पराभव

टीम इंडियाने यजमान श्रीलंकेला पराभूत करत विजयी सलामी दिली. भारताने तिलक वर्मा याच्या नेतृत्वात 9 जून रोजी श्रीलंकेवर 8 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. भारताने श्रीलंकेच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावत 2 गुणांची कमाई केली. त्यानंतर भारतासमोर 11 जूनला अफगाणिस्तानचं आव्हान होतं. टीम इंडियाची युवा ब्रिगेड अफगाणिस्तानला सहज गुंडाळेल असा विश्वास चाहत्यांना होता.

अफगाणिस्तान विरुद्ध पावसामुळे गेम!

भारतीय संघाने पावसाने प्रभावित 49 षटकारांच्या या सामन्यात 349 धावा केल्या. त्यामुळे अफगाणिस्तानला 350 धावांचं आव्हान मिळालं. मात्र त्यानंतर पावसाच्या खोड्यामुळे अफगाणिस्तानला सुधारित आव्हान मिळालं. मात्र या दरम्यान मुसळधार पाऊस सुरुच होता. तसेच जेव्हा सामन्याचा निकाल लावण्याचं निश्चित झालं तेव्हा अफगाणिस्तान डीएलएसनुसार पुढे होती. त्यामुळे अफगाणिस्तानचा 4 धावांनी विजय झाला. अशाप्रकारे भारताला पावसामुळे हा सामना गमवावा लागला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

श्रीलंकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभव

त्यानंतर भारताने 266 धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला 265 धावांवर रोखलं. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. पंचांना केलेल्या विनंतीनंतर कमी सूर्यप्रकाशात सुपर ओव्हरचा थरार रंगला. श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या 17 धावांच्या प्रत्युत्तरात भारताला 9 धावाच करता आल्या. श्रीलंकेने अशाप्रकारे विजय मिळवला. त्यामुळे आता टीम इंडियाला ट्राय सीरिजच्या फायनलमध्ये पोहचायचं असेल तर बुधवारी 17 जून रोजी अफगाणिस्तान विरुद्ध कोणत्याही स्थितीत जिंकावं लागणार आहे. त्यामुळे कर्णधार तिलक वर्मा आणि उपकर्णधार ऋतुराज गायकवाड हे दोघे नेतृत्वाच्या जबाबदारीसह अनुभवी खेळाडू म्हणून कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
आता तरी सुषमाताईंना पक्षाने...सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय...
आता तरी सुषमाताईंना पक्षाने...सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
दिवसभर काम आणि अनेक दौरे केल्यानंतर... रोहित पवारांना नेमकं काय झालंय?
दिवसभर काम आणि अनेक दौरे केल्यानंतर... रोहित पवारांना नेमकं काय झालंय? ब्रीच कँडी रुग्णालयातील व्हिडीओ आला समोर
26 फेब्रुवारीच्या बैठकीत घडलं ते... निवडणूक आयोगाकडून NCP ला तातडीचे न
Sunetra Pawar | निवडणूक आयोगाकडून NCP ला तातडीचे निर्देश; 26 फेब्रुवारीच्या बैठकीत घडलं ते...
उद्धव ठाकरेंना आणखी मोठा हादरा! विश्वासू महिला नेत्याच्या राजीनाम्यानं
उद्धव ठाकरेंना आणखी मोठा हादरा! विश्वासू महिला नेत्याच्या राजीनाम्यानंतर...
ट्रेकिंगचा थरार ठरला जीवघेणा! दरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मोठी बातमी! रायगडमध्ये ट्रेकिंगचा थरार ठरला जीवघेणा! दरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
मोठी बातमी! Gen Z बाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोठा निर्णय; मुंबईत
मोठी बातमी! Gen Z बाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोठा निर्णय; मुंबईत तब्बल 2000...
माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडे
माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडेंचंही मोठं विधान
मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते...
मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते, पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाने खळबळ!
धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी...
धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी, म्हणाले मराठ्यांच्या नादी ...
CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कोर्टाचे सर्व...
मोठा दिलासा! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कोर्टाचे सर्व राज्यांना आदेश