AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Points Table : गुजरातचा विजयी पंच, आरसीबीचा तिसरा पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये कोण सरस?

IPL 2026 Points Table : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामात गुरुवारी गुजरातने आरसीबीला पराभूत करुन गेल्या पराभवाची परतफेड केली. मात्र गुजरातला पॉइंट्स टेबलमध्ये नेट रनरेट व्यतिरिक्त अपेक्षित असा फायदा झाला नाही. जाणून घ्या

IPL 2026 Points Table : गुजरातचा विजयी पंच, आरसीबीचा तिसरा पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये कोण सरस?
Rashid Khan and Rahul TewatiaImage Credit source: Bcci
| Updated on: May 01, 2026 | 7:35 AM
Share

गुजरात टायटन्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 42 व्या सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर एकतर्फी फरकाने विजय मिळवला. गुजरातच्या गोलंदाजांनी अप्रतिम बॉलिंग करुन आरसीबीला 155 धावांवर यशस्वीरपित्या रोखलं. त्यामुळे गुजरातला तुलनेत 156 धावांचं माफक आव्हान मिळालं. गुजरातने हे 156 धावांचं आव्हान हे 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. गुजरातचा हा या मोसमातील एकूण पाचवा तर आरसीबी विरुद्धचा पहिला विजय ठरला. गुजरात 19 व्या मोसमात 5 सामने जिंकणारी पाचवी टीम ठरली. तसेच गुजरातने यासह आरसीबीवर मात करुन गेल्या पराभवाची अचूक परतफेड केली. आरसीबीचा हा या मोसमातील तिसरा पराभव ठरला. गुजरात विरुद्ध बंगळुरु या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोणती टीम कोणत्या स्थानी आहे हे जाणून घेऊयात.

गुजरातने बंगळुरु विरुद्ध 25 बॉल राखून विजयी आव्हान पूर्ण केलं. त्यामुळे गुजरातला पॉइंट्स टेबलमध्ये फायदा होण्याची अपेक्षा होती. मात्र नेट रनरेटचा अपवाद वगळता गुजरातला पॉइंट्स टेबलमध्ये काहीच फायदा झालेला नाही. या सामन्याच्या निकालानंतरही आरसीबी दुसऱ्या तर गुजरात पाचव्या स्थानी कायम आहे.

गुजरातला फायदा नाही आणि आरसीबीला तोटा नाही

गुजरातने 19 व्या मोसमात मोहिमेतील नवव्या सामन्यानंतर विजयी पंच लगावला. अशाप्रकारे गुजरातच्या खात्यात 10 गुण झाले आहेत. गुजरातचा विजयानंतर नेट रनरेट सुधारला आहे. गुजरातचा नेट रनरेट हा -0.192 असा झाला आहे जो सामन्याआधी -0.475 असा होता. मात्र गुजरात पॉइंट्स टेबलमध्ये आहे तिथेच आहे. गुजरातने या विजयासह आपलं पाचवं स्थान भक्कम केलं आहे.

आरसीबीने मोठी संधी गमावली

आरसीबीला पराभवामुळे पॉइंट्स टेबलमध्ये तसं फार नुकसान झालं नाही. मात्र आरसीबीने मोठी संधी गमावली. आरसीबीकडे गुजरातला पराभूत करुन पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 होण्याची संधी होती. मात्र आरसीबीने पराभवासह संधी गमावली. आरसीबीचा पराभवानंतर नेट रनरेट हा 1.420 इतका आहे जो इतर 9 संघांच्या तुलनेत सर्वोत्तम आहे. या सामन्याआधी आरसाबीचा नेट रनरेट हा 1.919 असा होता.

शुक्रवारी पॉइंट्स टेबलमध्ये बदल फिक्स

दरम्यान शुक्रवारी 1 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना होणार आहे. या सामन्याच्या निकालानंतर पॉइंट्स टेबलमध्ये बदल होणार हे निश्चित आहे. राजस्थानने सामना जिंकल्यास ते थेट चौथ्या क्रमांकावरुन टेबल टॉपर होतील. तसेच दिल्ली विजयी झाल्यास त्यांना एका स्थानाचा फायदा होईल. दिल्ली विजयासह सातव्या स्थानावरुन सहाव्या क्रमांकावर पोहचेल. त्यामुळे शुक्रवारी कुणाच्या बाजूने निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
ऑपरेशन टायगर यशस्वी होणार? ठाकरे गटातील 6 खासदार बंडाच्या तयारीत
मोठी घडामोड! ऑपरेशन टायगर यशस्वी होणार? ठाकरे गटातील 6 खासदार बंडाच्या तयारीत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री दिल्लीत दाखल!
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!