AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा अखेर मोठा निर्णय, थेट सर्व खासदारांना…

उबाठा गट मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर आहे. दिल्लीत घडामोडी घडत आहेत. ठाकरे गटाचे 6 खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यादरम्यानच आता या खासदारांना अडकवण्याकरिता मोठा प्लान शिवसेना ठाकरे गटाने केला.

मोठी बातमी! पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा अखेर मोठा निर्णय, थेट सर्व खासदारांना...
Uddhav Thackeray
| Updated on: Jun 17, 2026 | 9:42 AM
Share

एकनाथ शिंदे यांच्याकडून दुसऱ्यांदा मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना दिला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार वेगळा गट निर्माण करत आहेत. हे सर्व खासदार दिल्लीत आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा राजस्थानमध्ये घेतली. आत 6 खासदारांसोबत एकनाथ शिंदे बैठक घेतली. त्यानंतर हे खासदार स्वतंत्र गटाबाबतचे पत्र ओम बिर्ला यांना देतील. राज्यात राजकीय भूकंप येताना दिसत आहे. हे 6 खासदार कालच दिल्लीत दाखल झाले. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फुटणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत होती. ऑपरेशन टायगर सुरू झाल्याचेही सांगितले जात होते. अखेर ऑपरेशन टायगर सुरू झाल्याचे स्पष्ट झाले. 19 जूनला हे खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील. पक्षाकडून पाठबळ मिळत नसल्याचा आरोप करून हे खासदार शिवसेना शिंदे गटात सहभागी होत आहेत.

या 6 खासदारांची नावेही पुढे आली आहेत. काही आश्वासन यांना देण्यात आले. खासदारांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवरच आता शिवसेना ठाकरे गटही अलर्ट मोडवर आहे. मोठा निर्णय ठाकरे गटाकडून घेण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्याकडून ठाकरे गटातील खासदारांना मोठी आश्वासने देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल आहेत.

नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरेंच्या शिवसेनेने कायदेशीर सल्ला घेतला आहे. या खासदारांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा प्लान असल्याची महिती सूत्रांकडून मिळत आहे. ठाकरे गटाकडून संसदीय दलाची बैठक बोलवण्याच्या हालचाली सुरू आहेत. बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सर्व खासदारांना व्हीप पाठवल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बैठकीला अनुपस्थित राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

या खासदारांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा प्लान करण्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पक्षाच्या सर्व खासदारांना मेलच्या माध्यमातून हे व्हिप जारी करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. आता या बैठकीला नक्की कोणते खासदार उपस्थित राहणार आणि कोणी नाही हे स्पष्ट होईल. मात्र, या फुटीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी