AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : ऑपरेशन टायगरमुळे शरद पवार गटाचे धाबे दणाणले, लगेच उचललं महत्वाचं पाऊल

Sharad Pawar : ऑपरेशन टायगरमुळे शरद पवार गटाची अस्वस्थतता वाढली आहे. ते अलर्ट मोडवर आले आहेत. लगेच शरद पवार गटाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कधी, काय होईल ते सांगता येत नाही.

Sharad Pawar : ऑपरेशन टायगरमुळे शरद पवार गटाचे धाबे दणाणले, लगेच उचललं महत्वाचं पाऊल
Sharad Pawar Image Credit source: ANI
| Updated on: Jun 17, 2026 | 9:54 AM
Share

मागच्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा होती. हे ऑपरेशन टायगर खरचं होणार की नुसती हूल दिली जातेय या बद्दल ठाम अंदाज बांधता येत नव्हता. कारण लोकसभेत भाजपकडे स्वत:च्या बळावर 272 हा बहुमताचा आकडा नसला, तरी एनडीए राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे पूर्ण बहुमत आहे. केंद्रातल्या मोदी सरकारला कुठलाही धोका नाहीय. त्यामुळे ऑपरेशन टायगर होणारच या बद्दल ठाम खात्री नव्हती. पण आता वेगाने हालचाली सुरु झाल्या आहेत. दिल्ली आणि महाराष्ट्रात वेगवान घडामोडी घडतायत. ऑपरेशन टायगर सक्रीय झालं आहे. उद्धव ठाकरे यांच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार आहेत. ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाणार आहेत. केंद्रात मोदी सरकारला पाठिंबा देणार आहेत.

या ऑपरेशन टायगरमुळे शरद पवार गटाची अस्वस्थतता वाढली आहे. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अलर्ट मोडवर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांना पक्षाकडून संपर्क साधला जात आहे. पुढील एक-दोन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची बैठक होईल अशी सूत्रांची माहिती आहे. कारण सध्याच्या राजकीय स्थितीत कोण कुठे जाईल हे सांगता येत नाही. 2024 लोकसभा निवडणुकीत शरद पवार पक्षाचे आठ खासदार निवडून आले होते. सुनेत्रा पवार गटाला फक्त एक रायगडची जागा जिंकता आली होती. पण त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार पक्षाचे निराशाजनक प्रदर्शन केलं. त्यांचे फक्त 10 आमदार निवडून आले. तेच सुनेत्रा पवार गटाचे 42 आमदार निवडून आले.

म्हणून त्यांनी लगेच पाऊल उचललय

उद्धव ठाकरे यांना त्यांचे 9 खासदार एकत्र ठेवता आले नाहीत. आता तीच धास्ती शरद पवार गटाने घेतली आहे. म्हणून शरद पवार गटाकडून तातडीने खासदारांशी संपर्क साधला जात आहे. येत्या एक-दोन दिवसात त्यांची बैठक घेऊन त्यांच्या तक्रारी, मुद्दे ऐकले जातील. ठाकरे गटाचे जे सहा खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार आहेत, त्यांचं हेच म्हणणं होतं की, उद्धव ठाकरेंची भेट मिळत नाही, त्यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. आता शरद पवार यांना आपल्या पक्षात तसं घडू द्यायचं नाहीय. म्हणून त्यांनी लगेच पाऊल उचललय.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं