AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Tiger: खासदारांचा दिल्लीतील मुक्काम कुठे? घरी मात्र… महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत ग्राऊंड रिपोर्ट काय?

Operation Tiger Shivsena Uddhav Thackeray Eknath Shinde: राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. त्याचे केंद्रबिंदु हे दिल्लीत असल्याचे दिसून आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली जवळ करताच उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदारही तिथे पोहचले आहेत. खासदारांचा दिल्लीत मुक्काम कुठे आहे?

Operation Tiger: खासदारांचा दिल्लीतील मुक्काम कुठे? घरी मात्र… महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत ग्राऊंड रिपोर्ट काय?
ऑपरेशन टायगरImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 17, 2026 | 9:26 AM
Share

Operation Tiger Shivsena Uddhav Thackeray Eknath Shinde: राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर यशस्वी होत असल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. दिल्लीत या भूकंपाचे केंद्रबिंदू आहे. एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे सेनेचे सहा खासदारही दिल्लीत पोहचले आहेत. उद्धव सेनेचे सहाही खासदार दिल्लीत डेरेदाखल झाले आहेत. ते लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांना भेटून स्वतंत्र गट स्थापन करण्याची अथवा शिंदे सेनेत विलीन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान खासदारांचा दिल्लीत कुठे मुक्काम आहे, याची चर्चा रंगली आहे.

शिवसेनेचे सहा खासदार वेगळा गट स्थापन करणार

शिवसेनेचे इशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे काल दुपारीच दिल्लीत गेल्याची खात्रीलायक सुत्रांची माहिती समोर येत आहे. सर्व कागदपत्र घेऊन संजय दिना पाटील हे खाजगी विमानाने दिल्लीला रवाना झाल्याचे समजते. दिल्लीत एक पंच तारांकित हाटेलमध्ये ते थांबल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या भांडूपमधील राहत्या घरी सध्या शांतता पाहायला मिळत आहे दुपारनंतर मोठी घडामोड होण्याचे संकेत आहेत. कामं होत नाही, निधी मिळत नाही , पक्षाकडून हवा तसा पाठिंबा मिळत नाही अशा काही कारणांमुळे संजय दिना पाटील हे ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकून धनुष्यबाण हाती घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या कन्या राजोल पाटील ह्या ठाकरे सेनेतून नगरसेविका आहेत. त्यामुळे त्या पण शिंदेंच्या शिवसेनेत जाणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहेत.

संजय देशमुख दिल्लीत, निवासस्थानी शुकशुकाट

यवतमाळ- राज्यातील शिवसेना उबाठा गटाचे 6 खासदार हे फुटीच्या उंबरठ्यावर असून त्यात यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांचे सुद्धा नाव चर्चेत आहे. काल पासून संजय देशमुख हे माध्यमापासून दूर आहेत उद्धव ठाकरे यांनी बोलवल्या बैठकीत सुद्धा ते ऑनलाइन उपस्थित होते त्यानंतर नागपूर येथे मुलीच्या लग्नाच्या तयारीला लागले मात्र काल संजय देशमुख हे दिल्लीला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. संजय देशमुख यांच्या दिग्रस चिंचोली येथील निवासस्थानी शुकशुकाट पाहायला मिळत आहे . संजय देशमुख यांच्या या भूमिकेवरून जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

नागेश पाटील आष्टीकर यांच्या निवासस्थानी शुकशुकाट

नागेश पाटील आष्टीकर यांच्या नांदेड जिल्ह्यातील हदगाव निवासस्थानी शुकशुकाट आहे. नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे फोन लागत नसल्याचे समोर आले आहे. मध्यरात्री नागेश पाटील आष्टीकर दिल्लीत दाखल झाल्याची माहिती आहे. नांदेडहून हैदराबाद आणि तिथून ते दिल्लीत दाखल झाल्याची बातमी समोर येत आहे.

भाऊसाहेब वाकचौरे सुद्धा दिल्लीत

ठाकरे सेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे दिल्लीत दाखल झाले आहेत. ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना खासदार वाकचौरे दिल्लीत पोहचल्याची माहिती समोर येत आहे. पण त्यांच्या दिल्लीतील बंगल्यात शुकशुकाट आहे. भाऊसाहेब वाकचौरे ठाकरे गटाची साथ सोडणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. भाऊसाहेब वाकचौरे 2014 साली पक्ष सोडून गेल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी व्यक्त विश्वास केला होता. विरोध असताना पुन्हा 2024 मध्ये शिर्डी लोकसभेची उमेदवारी दिली होती. ठाकरे गटाचे 6 खासदार दिल्लीत असल्याने वातावरण तापले आहे.

 ओमराजे निंबाळकर कुठे?

उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत खासदार म्हणून ओळख असलेले ओमराजे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का? अशी धाराशिव जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले ओमराजे निंबाळकर यांची निष्ठावंत खासदार म्हणून ओळख आहे. सध्या त्यांच्याशी संपर्क केला असता ते पुण्यात असल्याचे समोर आले आहे. ओमराजे निंबाळकर उद्धव सेनेसोबत गेल्यास मराठवाड्यातील सर्व समीकरणं बदलतील.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी