
फळं खाण्याचा विचार आला की द्राक्ष हा बहुतेकांचा आवडता पर्याय असतो. रसाळ, गोडसर आणि पोषक घटकांनी भरलेलं हे फळ चव आणि आरोग्य या दोन्ही दृष्टीने उत्तम मानलं जातं. परंतु, अनेक लोकांना अजूनही हे माहीत नाही की आपण जे नाव वापरतो ते खरं तर दुसऱ्या भाषेतील आहे. खरंतर ‘अंगूर’ हा शब्द हिंदीचा नाहीच! मग काय आहे या गोडसर फळाचं भारतीय नाव? वाचा आणि मिळवा एक मजेशीर भाषिक माहिती.
‘अंगूर’ हा शब्द कुठून आला?
‘अंगूर’ हा शब्द मुळात फारसी भाषेतून आलेला आहे. अनेक शब्द आपल्याला हिंदीचे वाटले तरी ते फारसी, अरबी किंवा अन्य परकीय भाषांतून आलेले असतात. अंगूर देखील त्यापैकीच एक आहे. भारतात शतकानुशतके विविध भाषा मिसळत गेल्याने असे अनेक शब्द आपल्या रोजच्या भाषेत रूढ झाले. त्यामुळे आपण आज ‘अंगूर’ म्हणतो, पण ते खरेतर हिंदी शब्द नाही.
हिंदीत ‘अंगूर’चं खरं नाव काय?
जर अंगूर हा हिंदी शब्द नसेल, तर मग खरं नाव काय? उत्तर आहे ‘दाख’. होय, हिंदी भाषेत ग्रेप्ससाठी अधिकृत शब्द ‘दाख’ असा आहे. हे नाव अनेक जुन्या हिंदी ग्रंथांत आणि शास्त्रीय लिखाणात वापरलेलं आढळतं. विशेष म्हणजे, संस्कृत भाषेत देखील या फळाला ‘द्राक्षा’ असं म्हणतात.
मराठीत काय म्हणतात?
आपल्या मराठी भाषेत आपणही ‘द्राक्ष’ हा शब्द शुद्ध शब्दरूप म्हणून वापरतो. जरी सामान्य संवादात ‘अंगूर’ हेच नाव अधिक प्रचलित असलं, तरी ‘द्राक्ष’ हेच शुद्ध व शास्त्रीय नाव आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी व स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
का महत्त्वाची आहे ही माहिती?
भाषेचा अभ्यास करताना आपण शब्दांच्या उगमाकडे दुर्लक्ष करतो. मात्र, भाषेची शुद्धता जपण्यासाठी आणि योग्य संज्ञा वापरण्यासाठी अशा माहितीचं भान ठेवणं गरजेचं आहे. विशेषतः जे विद्यार्थी हिंदी वा मराठी साहित्याचा अभ्यास करत आहेत, किंवा स्पर्धा परीक्षा देत आहेत, त्यांनी हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे.