Diwali 2021 | दिवाळीत सुंदर रांगोळी काढायचीय ना?, चिंता सोडा, या 5 डिझाईन बघाच

| Updated on: Nov 03, 2021 | 1:42 PM

दिवाळी 2021: जर तुम्ही यावर्षी सुंदर रांगोळी काढण्याचा विचार करत असाल तर या सोप्या टिप्सचे करून तुम्ही अतिशय सुंदर रांगोळी बनवू शकता.

1 / 5
रंगीत तांदूळांची रांगोळी - दारासमोर रांगोळाचा सडा घातल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते अशी मान्याता आहे. पण तुम्ही साध्या रंगांच्या रंगोळीने कंटाळून गेला असाल तर या वर्षीतुम्ही रंगीत तांदूळाचा वापर करुन रंगोळी तयार करु शकता. तुम्ही तांदूळ वेगवेगळ्या रंगाच्या पाण्यात रात्रभर भिजवू शकता. यानंतर रांगोळी काढण्यासाठी रंग न वापरता. तुम्ही हे रंगीत तांदूळ वापरू शकता. या रंगोळीमुळे तुमची रंगोळी इतरांपेक्षा वेगळी आणि सुंदर वाटेल.

2 / 5
 दिव्याचा वापरणे - तेजाचे प्रतिक असणारे दिवे वापरल्यामुळे तुमची रांगोळी अजुनच सुंदर होण्यास मदत होईल. तुमची रंगोळी आकर्षित करण्यासाठी तुम्ही दिव्यांचा वापर करु शकता. दिव्यामुळे सर्वत्र सकारात्मता निर्माण होते. सर्व वातावरण अगदी प्रसन्न होते. दिवा हा तुमची रांगोळी  सजवण्यासाठी कोणता चांगला मार्ग असू शकतो. तुम्ही दिवे आणि मेणबत्त्यांनी रांगोळी सजवू शकता.

3 / 5
घरातील पिठांचा वापर - या दिवाळीत रांगोळी काढण्याचा दुसरा मार्ग म्हणजे मैदा किंवा तांदळाचे पीठ वापरणे. त्यात रंग मिसळून सुंदर रांगोळी काढता येते. प्रत्येक पिठाला त्याचा असा रंग असतो त्यामुळे त्यात रंग नाही मिसळले तरी चालतील. या दिवाळीत पिठाचा वापर करुन रांगोळी नक्की ट्राय करा.

4 / 5
फुले आणि पानांचा वापर - रांगोळीला तुम्ही नैसर्गिक लूकही देऊ शकता. यासाठी झेंडूची फुले, गुलाबाच्या पाकळ्या, आंब्याची पाने इत्यादी विविध रंगांचा वापर करून रांगोळी काढता येते. या नैसर्गिक रंगोळीमुळे तुम्हाला कमी मेहनतीमध्ये उत्तम रंगोळी काढता येते. यंदाच्या दिवाळीमध्ये फुले आणि पानांचा वापर करुन तुम्ही तुमची रंगोळी काढू शकता.

5 / 5
रंगीत खडू वापरा - वेगवेगळ्या रंगाचे खडू वापरूनही तुम्ही छान रांगोळी काढू शकता. रंगीत खडूंचा भूगा करुन तुम्ही त्यापासून रंग तयार करु शकतो. किंवा रंगीत खडूच्या माध्यमातून सुंदर रंगोळी काढू शकता.