Radhika-Anant Diwali: ‘तूने मुझे बुलाया शेरावालिये…’, जमिनीवर बसून अनंत अंबानी भक्तीत तल्लीन, व्हिडीओ पाहून म्हणाल..

Radhika-Anant Diwali: भारतात प्रत्येकाने मोठ्या थाटात दिवाळी साजरी केली. पण अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांनी परदेशात मोठ्या भक्तीभावाने दिवाळी साजली केली, त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Radhika-Anant Diwali: तूने मुझे बुलाया शेरावालिये..., जमिनीवर बसून अनंत अंबानी भक्तीत तल्लीन, व्हिडीओ पाहून म्हणाल..
Anant Ambani
| Updated on: Nov 11, 2026 | 4:18 PM

Radhika-Anant Diwali: भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील अनंत आणि राधिका चर्चेत आले आहेत. भारतात मोठ्या उत्साहात आणि थाटात सर्वांनी दिवाळी साजरी केली. पण अनंत आणि राधिका परदेशात भक्तीत तल्लीन होताना दिसले. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनंत अंबानी आणि राधिका अंबानी यांनी यंदाचा दिवाळीचा सण देशापासून कोसो दूर परदेशात अत्यंत खास शैलीत साजरा केला.

त्यांनी न्यूयॉर्कमधील त्यांच्या घरी दिवाळीचं सेलिब्रेशन केलं आणि या निमित्ताने एका भव्य भजन संध्याचं देखील आयोजन केलं होतं. यावेळी अनंत अंबानी आणि राधिका पूर्ण श्रद्धेने देवाच्या भक्तीत लीन झालेले दिसून आले. दोघेही या दरम्यान ‘तूने मुझे बुलाया शेरावालिए’, ‘शिव शंभू-शिव शंभू’, ‘ओम नमः शिवाय’ यांसारख्या भजनांच्या सुरात तल्लीन झालेले दिसले. चक्क जमिनीवर बसून आनंद घेताना अनंत अंबानी दिसले. सध्या त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे…

Loading...

 

सांगायचं झालं तर, परदेशी भूमीवर भारतीय संस्कृती, संगीत आणि भजन-कीर्तनाचा हा सुंदर नजराणा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. अमेरिकेत आयोजित या भजन संध्येत पारंपरिक संगीत, मंत्रोच्चार आणि लोकप्रिय भजनांचा गजर ऐकू आला, ज्यामुळे संपूर्ण वातावरण पूर्णपणे अध्यात्ममय झाले होते. राधिका आणि अनंत यांसोबत इतर लोक देखील व्हिडीओमध्ये भक्तीत तल्लीन झाले आहेत.

या धार्मिक कार्यक्रमात राधिका यांचा अतिशय साधेपणा आणि एलिगन्सने नटलेला पारंपरिक लूक दिसून आला, तर अनंत अंबानीसुद्धा पारंपरिक लूकमध्ये दिसले. परदेशात राहूनही आपल्या संस्कृती आणि परंपरांशी जोडलेले राहण्याचा त्यांचा हा अंदाज प्रत्येकाचं मन जिंकून घेत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us