Be Alert | तुम्हालाही असेल ‘ही’ समस्या, तर चुकूनही करू नका दुधाचे सेवन!

| Updated on: Feb 12, 2021 | 11:04 AM

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहित नाही की, दूध सर्वांसाठी फायदेशीर नाही. असेही काही लोक आहेत ज्यांच्यासाठी दूध स्लो पॉयझनप्रमाणे काम करते.

Be Alert | तुम्हालाही असेल ‘ही’ समस्या, तर चुकूनही करू नका दुधाचे सेवन!
दूध
Follow us on

मुंबई : आपण सर्वांनी लहानपणापासूनच ऐकले आहे की, नियमित दूध प्यावे कारण ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दुधात कॅल्शियम, प्रथिने फॉस्फरस, सोडियम आणि पोटॅशियम सारख्या खनिजे आहेत, जी हाडांसाठी खूप फायदेशीर आहेत. परंतु, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहित नाही की, दूध सर्वांसाठी फायदेशीर नाही. असेही काही लोक आहेत ज्यांच्यासाठी दूध स्लो पॉयझनप्रमाणे काम करते. आम्ही तुम्हाला अशाच प्रकारच्या समस्येबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये दूध पिणे हानिकारक ठरते. आपल्यालाही अशा समस्या असल्यास, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय आपण कधीही दूध सेवन करू नये (Do not drink milk if you have fatty liver diseases).

फॅटी लिव्हर समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांनी दूध पिऊ नये, अशा लोकांना दूध सहज पचत नाहीत. फॅटी यकृत एखाद्या असाध्य व्याधीसारखे असते, ज्यामध्ये यकृतावर चरबी किंवा वसा जमा होते. अशा लोकांचे यकृत योग्यरित्या कार्य करण्यास सक्षम नसते, ज्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण शरीराच्या आरोग्यावर होतो.

प्रथिनेयुक्त आहार घेणे टाळले पाहिजे!

फॅटी लिव्हर या समस्येशी संघर्ष करणार्‍या लोकांना फार कमी प्रमाणात प्रोटीन घेण्याचा सल्ला दिला जातो आणि दुधामध्ये प्रथिने भरपूर असतात. असे लोक बर्‍याचदा आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न खातात. या प्रकरणात, दूध पिण्यामुळे अपचन, आंबटपणा, गॅस, आळशीपणा, थकवा, वजन वाढणे किंवा यासारख्या इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.

दुधाचे सेवन केल्याने यकृत दाह वाढू शकतो!

यासह, अशा लोकांनी दुधाचे सेवन केल्याने त्यांच्या यकृतामध्ये जळजळ वाढते आणि फायब्रॉईड देखील होऊ शकतात. जर असे लोक दुधाचे सेवन करत राहिले, तर त्यांची समस्या देखील गंभीर स्वरुपाचे रूप धारण करू शकते, ज्यामुळे त्यांचे आयुष्य देखील धोक्यात येऊ शकते (Do not drink milk if you have fatty liver diseases).

या समस्यांमध्येही सावधगिरी बाळगा!

या व्यतिरिक्त ज्या लोकांना कावीळ, अतिसार, वात समस्या किंवा सांध्यावर सूज येण्याची कोणतीही समस्या असल्यास त्यांनी दुधाचे सेवन करणे कटाक्षाने टाळावे. दूध पचनास जड पदार्थ आहे. अशा समस्या असणाऱ्या लोकांनासुद्धा दूध पचवणे अवघड होते, ज्यामुळे पाचन समस्या उद्भवू शकतात. दुधात अनेक प्रकारचे प्रोटीन्स असतात त्यापैकी केंसीइन प्रोटीन हृदयाशी संबंधित आजारांना आमंत्रण देतो. त्यामुळे दुधाचे सेवन हानिकारक ठरते.

दूध प्यायल्याने कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते, ज्यामुळे लठ्ठपणा, रक्तदाब किंवा हृदयविकाराचा इतर त्रास होऊ शकतो. दुधामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असल्यामुळे अशा तक्रारी निर्माण होतात. याशिवाय दूध प्यायल्यामुळे बर्‍याच लोकांना गॅसची समस्याही वाढते.

बर्‍याच वेळा दुधाचे सेवन केल्याने आपल्या त्वचेवर पुरळ आणि चेहऱ्यावर मुरुम येतात. तज्ज्ञांचा असा दावा आहे की दुधामध्ये जटिल चरबीचे प्रमाण जास्त असल्यामुळे बरेच लोक ते सहज पचवू शकत नाहीत. यामुळेच अशा समस्या उद्भवतात.

(Do not drink milk if you have fatty liver diseases)

हेही वाचा :