चपाती खाल्यानंतर ‘ही’ चूक अजिबात करु नका, आरोग्यास होऊ शकतं नुकसान

| Updated on: Dec 31, 2020 | 2:41 PM

आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहार प्रचंड महत्त्वाचा आहे (Do not drink water after eating chapati)

चपाती खाल्यानंतर ही चूक अजिबात करु नका, आरोग्यास होऊ शकतं नुकसान
Follow us on

मुंबई : आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहार प्रचंड महत्त्वाचा आहे. पौष्टिक आहाराचं सेवन केल्याने अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. जेवताना बोलू नये किंवा बडबड करु नये, असं म्हणतात. मात्र, या गोष्टीला कुणी सहसा गांभीर्याने घेत नाही. या छोट्या-छोट्या गोष्टींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो (Do not drink water after eating chapati).

आपलं शरीर 75 टक्के पाण्याने भरलं आहे. दररोज आपल्याला 5 ते 7 लीटर पाण्याची गरज असते. मात्र, तुम्हाला ठावूक आहे का, चपाती खाल्यानंतर पाणी पिल्यास आरोग्यास हानिकारक ठरु शकतं. तसं केल्यास त्याचा थेट परिणाम आपल्या पचनक्रियेवर पडतो. जर तुम्ही गरम चपातीसोबत पानी, कोल्डड्रींक किंवा दूध पीत असाल तर पचनक्रियेसाठी ते हानिकारक आहे (Do not drink water after eating chapati).

जेवणानंतर चहा-कॉफी पिऊ नये

जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिऊ नये. तज्ज्ञांच्या मते, जेवणाच्या एक तास आधी किंवा नंतर चहा किंवा कॉफी पिऊ नये. कारण त्यामध्ये असलेलं टेनिन केमिकल जेवणातील लोह शोषून घेते. त्यामुळे शरीरातील लोहाचं प्रमाण कमी होते. परिणामी, तुम्ही कदाचित अॅनिमियाचे बळी ठरु शकता.

चुकूनही सिगरेट पिऊ नका

अनेक लोकांना सिरगेटचं व्यसन असतं. सिगरेट आपल्या शरीरास हानिकारक आहे हे सर्वांना ठावूक आहे. पण जर जेवणानंतर सिगरेट पिल्यास त्याचं नुकसान हे दहा सिगरेट पिल्याच्या बरोबरचं नुकसान होतं. तुम्हालादेखील जर सिगरेटची सवय असेल सिगरेटची सवय मोडायला हवी.

जेवणानंतर अंघोळ करु नये

आयुर्वेदच नाहीच तर मेडिकल सायन्सही सांगतं की, जेवणानंतर लगेच अंघोळ करु नये. अंघोळ केल्यानंतर शरीरातील तापमान कमी होतं. त्याचा परिणाम ब्लड सर्क्युलेशनवर होतो.