‘हर्बल टी’ने दिवसाची सुरूवात करा होतील अनेक फायदे, वाचा याबद्दल अधिक !

| Updated on: Apr 15, 2021 | 11:02 AM

आपण सर्वजण आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीचा गरमागरम घोट घेऊन करतो.

हर्बल टीने दिवसाची सुरूवात करा होतील अनेक फायदे, वाचा याबद्दल अधिक !
काढा
Follow us on

मुंबई : आपण सर्वजण आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीचा गरमागरम घोट घेऊन करतो. आपल्या जीवनशैलीचा खाण्यापिण्याच्या सवयींवरही मोठा परिणाम होतो. सकाळी सकाळी हर्बल टी’ने जर आपण आपल्या दिवसाची सुरूवात केली तर आपली त्वचा, केस आणि आरोग्य हे सर्व चांगले राहण्यास मदत होते. ‘हर्बल टी’ने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तसेच, ‘हर्बल टी’ आपल्या पचन तंत्रासाठीदेखील चांगली आहे. दररोज ‘हर्बल टी’चे नियमित सेवन केल्याने तुमचे वजनही कमी होते. (Drinking herbal tea is extremely beneficial for health)

ग्रीन टी मध्ये न्यूट्रिशन आणि अँटीऑक्सिडेंट घटक असतात. ज्यामुळे शरीरातील वाढलेले वजन आटोक्यात येते आणि लठ्ठपणा कमी होतो. तसेच ग्रीन टी ही तुमच्या त्वचेसाठीही उत्तम मानली जाते. आपण काहीही खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर त्याचे रुपांतर ताकदीत करण्यासाठी शरीराला मदत करतो. ग्रीन टी मधील घटक शरीरातील मेटाबॉलिज्म घटकाला वाढवतात. त्यामुळे शरीरातील वजन कमी होते. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी सोबतच नियमित व्यायामही गरजेचा असतो.

ग्रीन टी तयार करण्यासाठी पाण्याला खूप जास्त गरम करु नका. त्यामुळे त्यात आवश्यक जीवनसत्त्व नष्ट होतात. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही पाणी गरम करुन 10 मिनीटे तसेच ठेवा. त्यानंतर ग्रीन टीचे पॅकेट कपात घेऊन त्यावर गरम पाणी टाका आणि 1 मिनीटे तसेच ठेवा. ग्रीन टी आणि पाणी एकत्रित झाल्यानंतर प्या.

जे लोक नियमित ब्लॅक टी घेतात त्यांची हाडे ‘ब्लॅक टी’ न घेणाऱ्यांपेक्षा बळकट असतात, असे एका संशोधनातून समोर आले आहे. मात्र, जे लोक ब्लॅक टी घेत नाहीत किंवा कमी प्रमाणात घेतात त्यांना अर्थ्रायटीस होण्याची शक्यता असते. ‘ब्लॅक टी’मध्ये फायटोकेमिकल नावाचा पदार्थ असतो ज्याचा हाडांच्या बळकटीसाठी उपयोग होतो.

‘लेमन टी’ पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. ‘लेमन टी’चे नियमित सेवन फायदेशीर ठरू शकते. जर रोगप्रतिकारक शक्ती चांगली नसेल, तर हवामान बदलल्यामुळे लोकांना त्रास होऊ लागतो. अशा लोकांना हिवाळ्यात ताप, सर्दी, खोकला येणे, घसा खवखवणे, छातीत श्लेष्मा, कफ यासारखे त्रास उद्भवू लागतात. यावर आले आणि लिंबू घातलेला चहा गुणकारी ठरतो. आले-लिंबूयुक्त चहा या समस्यांपासून आपले संरक्षण करतो आणि आपली रोगप्रतिकार शक्ती सुधारतो.

संबंधित बातम्या : 

(Drinking herbal tea is extremely beneficial for health)