मद्यप्रेमींनो लक्ष द्या, 2026 मध्ये कोणत्या महिन्यात, कधी दारुची दुकाने राहणार बंद?, पाहा ड्राय डेची यादी?

2026 सालातील ड्राय डेची संपूर्ण यादी जाणून घ्या. राष्ट्रीय सुट्ट्या आणि महत्त्वाच्या सणांच्या दिवशी मद्यविक्रीची दुकाने बंद राहणार आहेत. तुमच्या पार्ट्यांचे आणि सुट्ट्यांचे योग्य नियोजन करण्यासाठी ही सविस्तर महिन्यानुसार यादी आत्ताच तपासा.

मद्यप्रेमींनो लक्ष द्या, 2026 मध्ये कोणत्या महिन्यात, कधी दारुची दुकाने राहणार बंद?, पाहा ड्राय डेची यादी?
liquor
| Updated on: Jan 01, 2026 | 1:30 PM

नवीन वर्षाची सुरुवात झाली की अनेकजण वर्षभरातील सुट्ट्या आणि खास सेलिब्रेशनचे प्लॅन आखू लागतात. मग ती गेट-टुगेदर पार्टी असो किंवा मित्रांसोबतची एखादी छोटी मैफिल, आनंदाच्या क्षणांमध्ये कोणालाही व्यत्यय नको असतो. पण भारतात अनेक महत्त्वाचे राष्ट्रीय सण, धार्मिक उत्सव आणि थोर पुरुषांच्या जयंती निमित्त मद्यविक्रीवर बंदी असते. ज्याला आपण ड्राय डे म्हणून ओळखतो. ऐन वेळी पार्टीच्या दिवशी मद्यविक्रीची दुकाने बंद असल्याचे समजले की सर्व उत्साहावर विरझण पडते. त्यामुळे, तुमच्या कोणत्याही प्लॅनमध्ये किंवा पार्टीमध्ये कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी २०२६ मधील ड्राय डे ची संपूर्ण यादी आधीच माहिती असणे आवश्यक आहे.

दरवर्षी प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन आणि गांधी जयंती यांसारख्या राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशी देशभरात मद्यविक्री पूर्णपणे बंद असते. याशिवाय स्थानिक सण आणि राज्य सरकारच्या नियमांनुसार काही विशिष्ट दिवसही ड्राय डे म्हणून पाळले जातात. त्यामुळे २०२६ या वर्षात कोणत्या महिन्यात किती दिवस दारूची दुकाने बंद राहतील, याची सविस्तर माहिती आपण येथे घेणार आहोत.

यंदाच्या वर्षातील ड्राय डे कधी?

जानेवारी

  • 14 जानेवारी (बुधवार) – मकर संक्रांती
  • 26 जानेवारी (सोमवार) – प्रजासत्ताक दिन
  • 30 जानेवारी (शुक्रवार) – शहीद दिवस

फेब्रुवारी

  • 12 फेब्रुवारी (गुरुवार) – महर्षी दयानंद सरस्वती जयंती
  • 15 फेब्रुवारी (रविवार) – महाशिवरात्री
  • 19 फेब्रुवारी (गुरुवार) – छत्रपती शिवाजी महाराज जयंती

मार्च

  • 04 मार्च (बुधवार) – होळी (धुलिवंदन)
  • 19 मार्च (गुरुवार) – गुढीपाडवा
  • 20 मार्च (शुक्रवार) – ईद-उल-फित्र (रमजान ईद)
  • 26 मार्च (गुरुवार) – रामनवमी
  • 31 मार्च (मंगळवार) – महावीर जयंती

एप्रिल

  • 03 एप्रिल (शुक्रवार) – गुड फ्रायडे
  • 14 एप्रिल (मंगळवार) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

मे

  • 01 मे (शुक्रवार) – बुद्ध पूर्णिमा / महाराष्ट्र दिन
  • 26-27 मे (मंगळवार-बुधवार) – ईद-उल-अधा (बकरी ईद)

जून

  • 26 जून (शुक्रवार) – मोहर्रम

जुलै

  • 25 जुलै (शनिवार) – आषाढी एकादशी
  • 29 जुलै (बुधवार) – गुरुपौर्णिमा

ऑगस्ट

  • 15 ऑगस्ट (शनिवार) – स्वातंत्र्यदिन
  • 25 ऑगस्ट (मंगळवार) – ईद-ए-मिलाद

सप्टेंबर

  • 04 सप्टेंबर (शुक्रवार) – जन्माष्टमी
  • 14 सप्टेंबर (सोमवार) – गणेश चतुर्थी
  • 25 सप्टेंबर (शुक्रवार) – अनंत चतुर्दशी

ऑक्टोबर

  • 02 ऑक्टोबर (शुक्रवार) – गांधी जयंती
  • 20 ऑक्टोबर (मंगळवार) – दसरा (विजयादशमी)

नोव्हेंबर

  • 08 नोव्हेंबर (रविवार) – दिवाळी (लक्ष्मीपूजन)
  • 20 नोव्हेंबर (शुक्रवार) – कार्तिकी एकादशी
  • 24 नोव्हेंबर (मंगळवार) – गुरुनानक जयंती

डिसेंबर

  • 06 डिसेंबर (रविवार) – महापरिनिर्वाण दिन
  • 25 डिसेंबर (शुक्रवार) – नाताळ (ख्रिसमस)