Pune local elections : पुण्यात चाललंय काय? अजित पवारांकडून गुंडाना उमेदवारी, खरातांचं नाव पुढं करून दादांची पळवाट
पुण्यात शिवसेना (शिंदे गट) उमेदवाराचा एबी फॉर्म गिळल्याचा प्रकार चर्चेत आहे. यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना उमेदवारी दिल्याचा आरोप होत आहे. अजित पवारांनी सचिन खरात गटाकडे बोट दाखवत प्रश्नांना बगल दिली. दरम्यान, पुणे-पिंपरीमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदे गट युती करण्याच्या तयारीत आहे.
पुण्यामध्ये निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना उमेदवारी दिल्याचा आरोप अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर होत आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणात कोल्हापूरच्या तुरुंगात असलेल्या लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघींना, तसेच कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नी जयश्री मारणे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म देण्यात आल्याचा आरोप आहे. या तिघीही घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. या आरोपांवर पत्रकार परिषदेत उत्तर देताना अजित पवारांनी मात्र अंग झटकले. आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) यांच्यासोबत युती केली असून त्यांना काही जागा सोडल्या आहेत. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय त्यांचा असल्याचे अजितदादांनी सांगितले. मात्र कोणत्या जागा खरात गटाला दिल्या आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे एबी फॉर्म खरात गटाने वाटले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अजित पवारांकडून गुंडाना उमेदवारी, खरातांचं नाव पुढं करून दादांची पळवाट
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, ठाकरे बंधूंचा वचननामा फायनल? कधी होणार जाहीर?
मनसेसोबत मोठा गेम? दोन उमेदवार अचानक गायब, नेमकी खेळी काय?
शिवसेना उमेदवारानं खरंच प्रतिस्पर्धीचा AB फॉर्म खाल्ला?

