Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचा होतेय कोरडी? त्वचेचा ओलावा टिकवण्यासाठी करा हा घरगुती उपाय! चेहरा दिवसभर दिसेल हायड्रेटेड

हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात त्वचा कोरडी, खरखरीत होते. त्वचा सुकल्याने दिवसभर काय शरीरात एनर्जीचं राहत नाही. मग ब्यूटी प्रोडक्ट्स खरेदी करतो. पण तुम्हाला माहित आहे घरच्याच काही उपायांनी तुम्हाला दिवसभर हायड्रेटेड वाटू शकते.

Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचा होतेय कोरडी? त्वचेचा ओलावा टिकवण्यासाठी करा हा घरगुती उपाय!  चेहरा दिवसभर दिसेल हायड्रेटेड
winter skincare
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 21, 2026 | 7:17 PM

हिवाळा सुरू झाला की त्वचेच्या समस्या डोकं वर काढू लागतात. थंड हवेमुळे चेहऱ्यावरील ओलावा कमी होतो आणि त्वचा कोरडी खरखरीत दिसू लागते. अनेकदा चेहऱ्याचा नैसर्गिक तजेलदारपणाही कमी होतो. अशावेळी त्वचेचे काळजी घेण्यासाठी महागडे ब्युटी प्रॉडक्ट्सवर खर्च करण्याऐवजी घरातील काही पदार्थांचा वापर करता येऊ शकतो. बदाम आणि दूध यांच्यापासून तयार केलेला मिश्रणची काळजी घेण्यासाठी उपयोगी ठरू शकतं विशेष म्हणजे हे मिश्रण तयार करण्यासाठी फार कष्टही घ्यावे लागत नाही.

बदामामध्ये विटामिन ई आणि अँटिऑक्सिडंट असतात त्यामुळे त्वचेच्या निगेसाठी बदामाचा वापर केला जातो.तर दुधाचा वापर आणि घरगुती सौंदर्य उपायांमध्ये केला जातो. या दोन्ही पदार्थांपासून तयार होणारा बदामाचे दूध हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी वापरता येऊ शकतो.

Loading...

बदामाचे दूध तयार करण्यासाठी काय कराल?

यासाठी 4 बदाम,4 चमचे दूध घ्या.सर्वप्रथम बदाम पाण्यात भिजत ठेवा बदाम मऊ झाल्यानंतर त्याची साल काढून घ्या,त्यानंतर 4 चमचे दुधामध्ये बदाम बारीक वाटून घ्या.मिश्रण एकजीव झाला की बदामाचे दूध तयार होईल.

चेहऱ्यावर कसा लावायचा?

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.त्यानंतर कापसाच्या मदतीने तयार केलेल्या बदामाचे दूध चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. काही वेळाने काही वेळाने किंवा त्वचेला योग्य वाटत असल्यास ते धुऊन टाका.हे मिश्रण त्याच तयार करून वापरणे चांगले जास्त दिवस ठेवू नये .

त्वचेला कोणते फायदे मिळतात?

बदामातील विटामिन ई आणि अँटिऑक्सिडंट साठी उपयुक्त ठरतात या मिश्रणामुळे त्वचेला बहुपणा मेहनत मदत होते हिवाळ्यात कोरडी पडणारी त्वचा सांभाळण्यासाठी घरगुती उपाय हा चांगला आहे नियमित महत्वाचे योग्य काळजी घेतल्यास त्वचेचा फ्रेश आणि तजेलदार दिसेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us