AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाणं आजही सुपरहिट पण शूटिंगच्या वेळी किंग खान घाबरलेला, मणी रत्नम यांच्या सिनेमातील थरारक किस्सा

छैय्या - छैय्या हे गाणं ऐकलं की आजही अनेकांच्या डोळ्यांसमोर धावत्या ट्रेन वर डान्स करणारा शाहरुख खान आणि मलायका अरोरा येतात. हातात हात घालून ट्रेनच्या छतावर थिरकणारे हे दोघ पाहताना हा डान्स किती सहज केला असेल असं वाटतं. किंवा किती भारी आहे हा डान्स असं वाटतं. पण प्रत्यक्षात या गाण्याचा शूटिंग करणं म्हणजे मोठं आव्हान होतं.

गाणं आजही सुपरहिट पण शूटिंगच्या वेळी किंग खान घाबरलेला, मणी रत्नम यांच्या  सिनेमातील थरारक किस्सा
chaiya chaaiya song shootImage Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 21, 2026 | 6:59 PM
Share

छैय्या – छैय्या हे गाणं ऐकलं की आजही अनेकांच्या डोळ्यांसमोर धावत्या ट्रेन वर डान्स करणारा शाहरुख खान आणि मलायका अरोरा येतात. हातात हात घालून ट्रेनच्या छतावर थिरकणारे हे दोघ पाहताना हा डान्स किती सहज केला असेल असं वाटतं. किंवा किती भारी आहे हा डान्स असं वाटतं. पण प्रत्यक्षात या गाण्याचा शूटिंग करणं म्हणजे मोठं आव्हान होतं. धावत्या ट्रेनच्या छतावर डान्स करताना कलाकारांसोबत संपूर्ण टीम मोठी काळजी घ्यावी लागली होती. विशेष म्हणजे या शूटिंगच्या आठवणी सांगताना कोरिओग्राफर फराह खान यांनी अनेक धक्कादायक आणि मजेशीर किस्से सांगितले आहेत

छैया छैया हे गाणं 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल से’ या चित्रपटातील आहे. या गाण्याला संगीत ए. आर. रहमान यांनी दिला असून, सुखविंदर सिंग आणि सपना अश्वठी यांनी ते गायलं आहे. गाण्याची कोरिओग्राफी फराह खान यांनी केली होती. आजही हे गाणं बॉलीवूडमधील सर्वाधिक लक्षात राहिलेला गाण्यांपैकी एक आहे .

मात्र या गाण्याचा शूटिंग नेहमीच्या चित्रपटांच्या शूटिंग सारखं नव्हतं. सुरुवातीला उटी रेल्वे स्टेशनवर शूट करण्याचा विचार होता. त्यासाठी स्टेशन काही दिवस बंद ठेवण्याची परवानगी मागण्यात आली होती. मात्र रेल्वे प्रशासनाकडून ऐनवेळी परवानगी मिळाली नाही. त्यानंतर दिग्दर्शक मनी रत्नम यांनी ट्रेनच्या छतावरच गाणं शूट करण्याची कल्पना मांडली. ही कल्पना ऐकल्यानंतर फरह खान यांनीही त्याला होकार दिला.

मात्र शूटिंगमध्ये सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्नही मोठा होता फराह खान यांनी सांगितलं होतं, की कलाकारांना ट्रेनवर शूट करण्याचा आधीचा अनुभव नव्हता ट्रेन वर आधी रिहर्सल करण्याची संधीही मिळाली नव्हती. त्यामुळे ट्रेन मिळाल्यानंतर थेट शूटिंगला सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे फराह यांनी सुरक्षा बद्दल विचारल्यावर उत्तर दिलं होतं की  मदतीसाठी जास्त डान्सर सोबत ठेवू, सुदैवाने पण सुदैवाने शूटिंग दरम्यान कोणत्याही मोठा अपघात झाला नाही

View this post on Instagram

A post shared by Radio Nasha (@radionasha)

या शूटिंगमध्ये शाहरुख खानलाही भीती वाटत होती हे त्याने खुद्द  एका मुलाखतीत सांगितलंय 2017 मध्ये तो PTI शी बोलताना हा अनुभव खूप कठीण आणि भीतीदायक असल्याचा सांगितलं होतं. ट्रेन संततीने धावत असली, तरी वाटेत येणारे पूल ही मोठी समस्या होती. पूल जवळ आला की कलाकारांना खाली वाकण्याचा इशारा देण्यासाठी पांढरा कपड्याचा वापर केला जात होता. तो इशारा दिसताच खाली बसावं लागायचं. पूल डोक्यावरून जाताना त्याचा आवाजही गाण्यामध्ये ऐकू येतो.

या गाण्याच्या शूटिंगमध्ये टिम शाहरूख आणि मलायकाच्या सुरक्षेची काळजी घेत होते. मलायकाने एका मुलाखतीत सांगितलं होता की ती ट्रेन वरून खाली पडू नये म्हणून SRK ने तिला सेफ्टी हार्नेस वापरण्याचा आग्रह केला होता. मात्र हार्नेस लावून डान्स करणं कठीण होतं. त्यामुळे या दोघांच्या शूटिंगमध्ये सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा होता. आज गाणं पाहताना पडद्यामागचा थरार लक्षातही येत नाही. मात्र कलाकारांचे धाडस आणि फराह खानची कोरिओग्राफी आणि संपूर्ण टीमच्या मेहनतीमुळे छैया छैयाला बॉलिवूडच्या इतिहासात अजरामर स्थान मिळालं आहे

Follow Us
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...
कोल्हे आणि भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितल
Chhagan Bhujbal : अमोल कोल्हे आणि छगन भुजबळांच्या भेटीत नेमकी काय चर्चा? भुजबळांनी स्वतःच सांगितलं, म्हणाले...
नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या...
Lasangaon Bus : नाशिक-लासलगाव मार्गावर एसटी बसचा अपघात; दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटलं
रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय..
Navnath Ban Vs Rohit Pawar : रोहित पवार तुम्ही लपवालपवी का करतायत? नवनाथ बन यांचा सवाल; नेमकं काय म्हणाले?
दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर
Nanded Drought : दीड एकर ऊस पाण्याअभावी करपला; पहिल्याच लागवडीत शेतकऱ्याच्या स्वप्नांवर पाणी