किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणे कोणती? डॉक्टरांकडून जाणून घ्या

किडनी निकामी होणे ही अचानक येणारी स्थिती नाही. त्याआधी आपले शरीर आपल्याला असे काही संकेत देतात जी ओळखणे महत्त्वाचे असते. आणि जर ती लक्षणे जर ओळखले तर नक्कीच आपल्याला त्यावर उपचार करता येतील.

किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणे कोणती? डॉक्टरांकडून जाणून घ्या
Early Kidney Failure Symptoms
Image Credit source: Meta AI
| Updated on: Jun 25, 2025 | 4:42 PM

किडनीला आपल्या शरीराचे फिल्टर मशीन म्हटले जाते कारण ते एका फिल्टरसारखे काम करते. ते रक्त स्वच्छ करते, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि पाणी-सोडियम संतुलन राखते. जर किडनीने काम करणे थांबवल तर शरीराला गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागू शकतं.

किडनी निकामी होण्याआधी लक्षणे 

किडनी निकामी होणे ही अचानक होणारी स्थिती नाही, त्याआधी आपल्याला काही लक्षणे दिसतात जी ओळखणे महत्वाचे आहे जेणेकरून वेळेवर उपचार करता येतील. आणि जर लवकर त्याची लक्षणे लक्षात आली तर नक्कीच त्यावर योग्य उपचारांनी किडनी निकामी होण्यापासून रोखता येऊ शकतं. किडनी निकामी होण्याची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत हे डॉक्टरांकडून जाणून घ्या. दिल्लीतील वरिष्ठ चिकित्सक डॉ. अजय कुमार यांनी किडनी निकामी होण्याची सुरुवातीची लक्षणे सांगितली आहेत.

किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणे

1) सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे

जर किडनी रक्त योग्यरित्या स्वच्छ करू शकत नसेल, तर शरीरात टाकाऊ पदार्थ जमा होऊ लागतात, ज्यामुळे शरीर सुस्त आणि कमकुवत वाटते.

2) चेहरा, पाय आणि घोट्यांवर सूज येणे

जेव्हा मूत्रपिंड अतिरिक्त द्रव काढून टाकू शकत नाहीत तेव्हा ते शरीरात जमा होऊ लागते. यामुळे चेहऱ्यावर सूज येते, घोटे सुजतात आणि बूट घट्ट होतात.

3) लघवीमध्ये बदल

रात्री वारंवार लघवी होणे, लघवीत रक्त येणे, जळजळ होणे किंवा दुर्गंधी येणे. ही सर्व लक्षणे किडनी व्यवस्थित काम करत नसल्याचे संकेत दर्शवतात.

4) लक्ष केंद्रित करण्यात अडचण आणि चिडचिड

जेव्हा शरीरात विषारी पदार्थ वाढतात तेव्हा त्याचा मेंदूवरही परिणाम होतो. त्यामुळे निद्रानाश, मूड स्विंग, चिडचिडेपणा आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते.

5) मळमळ, उलट्या आणि भूक न लागणे

जेव्हा शरीरात विषारी घटक वाढतात तेव्हा ते पोटावर परिणाम करतात. परिणामी भूक न लागणे, मळमळ किंवा उलट्या होतात. हळूहळू वजन देखील कमी होऊ लागते.

तुमची किडनी निरोगी ठेवण्यासाठी टिप्स

1) उच्च रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात ठेवा

2) भरपूर पाणी प्या (पण जास्त पाणी पिऊ नका)

3) धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर रहा

4) डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक आणि अँटीबायोटिक्स घेऊ नका.

7) दर 6-12 महिन्यांनी आरोग्य तपासणी करा.