Kitchen Hacks : अंडी कधीच धुवू नका, धुतल्यास काय होईल? एक चूक देईल मोठ्या धोक्याला निमंत्रण

Kitchen Hacks : अनेकांच्या घरात अंडी असतातच. डॉक्टर देखील उकडून अंडी खाण्याचा सल्ला देतात. पण काही लोक अंडी धुवतात, जे योग्य नाही. ज्यामुळे तुमची एक चूक मोठ्या धोक्याला निमंत्रण देऊ शकते.

Kitchen Hacks : अंडी कधीच धुवू नका, धुतल्यास काय होईल? एक चूक देईल मोठ्या धोक्याला निमंत्रण
| Updated on: Oct 28, 2026 | 3:03 PM

डॉक्टर कामय लहान मुलांपासून मोठ्यांना उकडलेली अंडी खाण्याचा सल्ला देत असतात. अंडी आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहेत. अंड्यामध्ये व्हिटॅमिन-बी भरपूर प्रमाणात असतं. या व्यतिरिक्त व्हिटॅमिन बी 12, बायोटिन, रिबोप्लाविन, थियामिन आणि सेलेनियम देखील असते. या व्हिटॅमिनमुळे केस, त्वचा आणि नखांना फायदेशीर ठरतं. अनेकांच्या घरात तर अंडी असतातच. पण बऱ्याच जणांना दुकानातून अंडी घरी आणल्याबरोबर ती पाण्याने स्वच्छ धुऊन फ्रिजमध्ये ठेवण्याची सवय असते. मात्र, अन्न सुरक्षा तज्ज्ञ असा इशारा देतात की, यामुळे फायद्याऐवजी आरोग्याच्या अधिक समस्या आणि अन्न विषबाधा होऊ शकते. तर जाणून घ्या दुकानातून आणल्या आणल्या का धुवू नये… जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट…

क्यूटिकलचा थर नष्ट होतो: जेव्हा कोंबड्या अंडी घालतात, तेव्हा त्यांच्या कवचाच्या पृष्ठभागावर ‘क्यूटिकल’ नावाचा एक पातळ नैसर्गिक संरक्षक थर तयार होतो. निसर्गानेच हे कवच अंड्यामध्ये जीवाणू आणि ओलावा शिरण्यापासून रोखण्यासाठी तयार केलेले असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही अंडे धुता, तेव्हा हा थर पूर्णपणे नष्ट होतो. यामुळे पुढे जाऊन आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

Loading...

सूक्ष्म छिद्रे उघडतात: अंड्याच्या कवचावर हजारो सूक्ष्म छिद्रे असतात जी आपल्याला दिसत नाहीत. जेव्हा तुम्ही ते पाण्याने धुता, तेव्हा ही छिद्रे उघडतात आणि पाण्यासोबत बाहेरील धूळ व ओलावा अंड्यामध्ये शिरतो. नंतर, जेव्हा तुम्ही हे अंडे खाता, तेव्हा ते खराब होऊ शकते किंवा तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते.

साल्मोनेला जिवाणूंचा धोका: साल्मोनेलासारखे धोकादायक जिवाणू, जे अंड्याच्या कवचाबाहेर आढळतात, ते पाण्याद्वारे अंड्याच्या पांढऱ्या भागात आणि पिवळ्या भागात प्रवेश करू शकतात. यामुळे अतिसार, उलट्या आणि ताप यांसारखी अन्न विषबाधेची गंभीर लक्षणे दिसू शकतात. दुकानातून आणलेली अंडी न धुता कागदाने किंवा कापडाने पुसून स्वच्छ करणं योग्य आहे.

अंडी धुण्याने आणि साठवण्याने थेट आजार होत नाही. पण, अंड्यावरील संरक्षक थर नाहीसा झाल्यामुळे जिवाणू आत शिरण्याचा धोका वाढतो. अन्नातून विषबाधा, अतिसार, थकवा आणि निर्जलीकरण ही शरीरातील साल्मोनेला संसर्गाची प्रमुख लक्षणे आहेत. त्यामुळे, अंडी शिजवण्यापूर्वीच स्वच्छ पाण्यानेच धुवावीत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us