Trendy Gold Ring Designs : सोनं स्वस्त होतंय! मग अंगठी घेण्याची हौस आताच पूर्ण करा! बाजारात आलेल्या या लेटेस्ट रिंग डिझाईन्स एकदा पाहून तरी घ्या

हळूहळू सोनं स्वस्त होतं चाललयं आणि लग्नाचे मुहूर्त ही तोंडावर आहेत, अशातच सोन्याच्या अंगठी घेण्याचा विचार करत असाल तर या लेटेस्ट डिझाईन्स तुम्हाला नक्की आवडतील. लग्नसमारंभ पार्ट्यांपासून ते रोजच्या वापरापर्यंत सर्व प्रसंगी घालू शकता अशा बेस्ट डिझाईन्स

| Updated on: Nov 25, 2026 | 8:46 PM
1 / 7

2 / 7

मोराच्या नक्षीची आकर्षक अंगठी बनवून घ्या : आजकाल मोराच्या नक्षीच्या अंगठ्या लोकप्रिय आहेत.तुम्हालाही मोराची नक्षी आवडत असेल, तर तुम्ही या पर्यायाचा वापर करू शकता. ही अंगठी नाजूक, सुंदरही दिसेल आणि हलकी सुद्धा राहिल. त्यामुळे ती तु्म्ही रोज घालू देखील शकता.

3 / 7

ही फुलांची रचना आकर्षक दिसेल : यासारख्या फुलांच्या नक्षी असलेल्या सोन्याच्या अंगठ्या अत्यंत सुंदर दिसतात. जर तुम्ही वजनाने हलक्या, पण तरीही वजनदार दिसणाऱ्या आणि प्रत्येक प्रसंगासाठी योग्य अशा डिझाइनच्या शोधात असाल, तर ही अशी फुलांची अंगठी तुमच्यासाठी योग्य आहे.

4 / 7

अनोख्या आकाराची सोन्याची अंगठी : सोन्याच्या अंगठीचे हे डिझाइन सध्याच्या फॅशनमधील सर्वात नवीन आहे. या प्रकारची अंगठी आताच्या तरूण पिढीमध्ये खूप लोकप्रिय आहे. रोजच्या वापरासाठीसुद्धा ही अंगठी हातांना आकर्षक लुक देते. तसेच लग्नसमारंभ आणि पार्ट्यांमध्येही ती भारी दिसते.

5 / 7

फुलाच्या आकाराची सोन्याची अंगठी बनवून घ्या :जर तुम्ही खास प्रसंगी घालता येईल अशी अंगठी शोधत असाल, तर ही फुलांची डिझाइन नक्की वापरून पहा. अशा अंगठ्या खूप आकर्षक दिसतात, विशेषतः साड्या आणि लेहेंग्यांसोबत घातल्यावर त्या पारंपरिक लुकमध्ये भर घालतात.

6 / 7

रत्नजडित अंगठी बनवा : नाजूक रत्नजडित सोन्याची अंगठी खूप सुंदर दिसते. अशी अंगठी हातावर उठून दिसते. विशेषतः जर तुम्ही एखाद्या खास प्रसंगासाठी अंगठी घेण्याचा विचार करत असाल, तर ही जड डिझाइन अगदी योग्य ठरेल.

7 / 7

रोजच्या वापरासाठी हलकी अंगठी : जर तुम्हाला अधिक नाजूक डिझाइन आवडत असतील, तर या प्रकारची अंगठी एक चांगला पर्याय ठरू शकते. ही सोन्याची अंगठी रोजच्या वापरासाठी आणि प्रवासासाठीही उपयुक्त आहे. अशी अंगठी कमी बजेटमध्येही उपलब्ध आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us