साडीमध्ये दिसायचंय स्लिम आणि एलिगंट? नक्की ट्राय करा हे ७ रंग

साडी नेसल्यावर लुक उठून दिसावा आणि आपण अधिक स्लिम दिसावं, असं वाटतंय? मग साडी निवडताना फक्त डिझाइनकडे न पाहता रंगाची निवडही काळजीपूर्वक करा. काही खास शेड्स तुमचा लुक अधिक स्लिम आणि एलिगंट दिसण्यास मदत करू शकतात.

साडीमध्ये दिसायचंय स्लिम आणि एलिगंट? नक्की ट्राय करा हे ७ रंग
saree fashion
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 30, 2026 | 7:22 PM

साडी हा भारतीय महिलांचा आवडता पारंपरिक पोशाख आहे. साडी नेसल्यावर आपला लुक अधिक आकर्षक आणि ग्रेसफुल दिसावा, अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. त्यासाठी साडीची डिझाइन, फॅब्रिक, बॉर्डर आणि ड्रेपिंग स्टाइलसोबतच रंगाची निवडही तितकीच महत्त्वाची असते. योग्य रंगाची साडी निवडल्यास तुमचा लुक अधिक उंच, स्लीम आणि आकर्षक दिसू शकतो. विशेषतः डीप आणि डार्क शेड्सना यासाठी पसंती दिली जाते. त्यामुळे पुढच्या वेळी साडी खरेदी करताना हे ७ रंग नक्की लक्षात ठेवा.

वाइन शेड

वाइन रंगाची साडी डीप शेडमुळे तुम्हाला अधिक स्लिम आणि शेप्ड लुक देऊ शकते. या रंगासोबत मॅचिंग किंवा त्याच्यापेक्षा थोडा गडद ब्लाउज निवडल्यास लुक अधिक उठून दिसतो. साडीची बॉर्डर फार रुंद न ठेवता पातळ बॉर्डर निवडल्यास संपूर्ण लुक अधिक एलिगंट दिसू शकतो.

Loading...

डार्क ग्रीन

गडद हिरवा रंग साडीमध्ये नेहमीच आकर्षक दिसतो. या रंगाचा डीप टोन तुम्हाला अधिक स्लिम आणि स्टायलिश लुक देऊ शकतो. डार्क ग्रीन साडीसोबत मॅचिंग ब्लाउज आणि मिनिमल बॉर्डरचा पर्याय निवडल्यास लुक अधिक संतुलित दिसतो.

नेव्ही ब्लू

नेव्ही ब्लू किंवा रॉयल ब्लूसारखे गडद निळे रंग साडीमध्ये खूपच रॉयल दिसतात. हे शेड्स तुम्हाला अधिक उंच आणि स्लीम लुक देऊ शकतात. एखाद्या खास कार्यक्रमासाठी हा रंग निवडताना टोन-ऑन-टोन किंवा मॅचिंग ब्लाउजसोबत स्टाइल करता येतो.

मॉव्ह पिंक

पिंक रंगाचा मॉव्ह मावे शेड म्हणजेच फिकट जांभळत गुलाब शेड सॉफ्ट असूनही डीप टोनमुळे लुकला स्लीम आणि एलिगंट बनवतो. हा रंग सध्या ट्रेंडमध्येही आहे. मॉव्ह पिंक साडीला पातळ बॉर्डर आणि त्याच रंगाचा किंवा मोनोक्रोम ब्लाउज दिल्यास लुक अधिक स्टायलिश दिसू शकतो.

डीप ऑरेंज

ऑरेंज रंगाची साडी उत्साही आणि आकर्षक लुक देते. मात्र स्लीम लुक हवा असल्यास खूप ब्राइट ऑरेंजऐवजी डीप किंवा रस्ट ऑरेंज शेड निवडणे फायदेशीर ठरू शकते. त्यासोबत त्याच टोनमधील ब्लाउज आणि छोटे प्रिंट्स असलेली साडी निवडल्यास लुक अधिक बॅलन्स्ड दिसतो.

चॉकलेट ब्राउन

चॉकलेट ब्राउन हा डीप रंग असून साडीला क्लीन आणि स्ट्रीमलाइन लुक देऊ शकतो. विशेषतः नाईट पार्टी किंवा फंक्शनसाठी हा शेड चांगला पर्याय ठरू शकतो. सॉलिड चॉकलेट ब्राउन साडीसोबत साधा ब्लाउज आणि कमी अॅक्सेसरीज वापरल्यास लुक अधिक एलिगंट दिसतो.

चारकोल ग्रे

चारकोल ग्रे हा सटल आणि डीप शेड सध्या ट्रेंडमध्ये आहे. या रंगाची साडी तुम्हाला अधिक स्लीम आणि स्ट्रीमलाइन लुक देऊ शकते. मॅचिंग ब्लाउज आणि मिनिमल ज्वेलरीसोबत हा रंग स्टाइल केल्यास संपूर्ण लुक अधिक हाय आणि बॅलन्स्ड दिसू शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us