Valentines Day 2023 : व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो? लाल रंगाची भानगड काय?

| Updated on: Feb 08, 2023 | 7:40 AM

व्हॅलेंटाईन डेला लाल रंगाचं अधिक महत्त्व आहे. लाल रंग हा प्रेमाचं प्रतिक मानला जातो. त्यामुळे व्हॅलेंटाईन विकच्या आधी मॉल्स, थिएटर, शॉपिंग सेंटर आणि रेस्टॉरंटमध्ये लाल रंगाची सजावट केली जाते.

Valentines Day 2023 : व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो? लाल रंगाची भानगड काय?
Valentine Day
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) हा संपूर्ण जगात साजरा केला जातो. या दिवशी तरुण तरुणी एकमेकांना प्रपोज करतात. अनोख्या अंदाजात कपल्स हा दिवस साजरा करतात. काही लोक तर 14 फेब्रुवारी रोजीच आपला विवाह उरकून घेतात. ही तारीख कायम लक्षात राहावी म्हणून याच दिवशी कपल्स विवाह बंधनात अडकतात. पण व्हॅलेंटाईन डेची सुरुवात कधी झालीय माहिती आहे का? (Valentine’s Day History) आणि 14 फेब्रुवारी रोजीच व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो हे तरी माहीत आहे का? (why celebrate Valentine’s Day) व्हॅलेंटाईन डे हा कुणाच्या प्रेमाच्या कहाणीचा दिवस आहे? या दिवसाशी संबधित एक गोष्टही आहे. तीच आज जाणून घेऊया.

सुरुवात कधी?

14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे संपूर्ण जगात साजरा केला जातो. रोमचा राजा क्लॉडियसच्या काळात हा दिवस साजरा करण्याची प्रथा सुरू झाल्याचं सांगितलं जातं. त्याकाळी रोममध्ये एक पाद्री होते. त्यांचं नाव सेंट व्हॅलेंटाईन होतं. त्यांनी पहिल्यांदा व्हॅलेंटाईन डेची सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा

व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो?

संपूर्ण जग प्रेमात आकंठ बुडावं असं सेंट व्हॅलेंटाईन यांना वाटत होतं. पण ते राहत असलेल्या शहराचे राजे क्लॉडियस यांना ही गोष्ट मान्य नव्हती. प्रेम आणि विवाहामुळे पुरुषांची बुद्धी आणि शक्ती नष्ट होते, असं राजाचं मत होतं. त्यामुळे राजाने आपल्या सैन्यातील अधिकारी आणि सैन्याला लग्न न करण्याचे आदेश दिले होते.

सेंट व्हॅलेंटाईन यांना फाशी

सेंट व्हॅलेंटाईन यांनी राजाच्या या आदेशाला विरोध केला होता. त्यांनी अनेक अधिकारी आणि सैन्यातील जवानांचे विवाह लावले होते. राजाला जेव्हा ही माहिती मिळाली तेव्हा तो क्रोधित झाला. त्याने 14 फेब्रुवारीच्या दिवशी सेंट व्हॅलेंटाईन यांना फाशीवर चडवले.

त्यानंतर सेंट व्हॅलेंटाईन यांच्या निधनाच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाऊ लागला. सेंट व्हॅलेंटाईन यांच्या बलिदानाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

सेंट व्हॅलेंटाईन यांचे नेत्रदान

सेंट व्हॅलेंटाईन यांच्या निधनाचा दिवस आणखी एका खास कारणाने साजरा केला जातो. तो म्हणजे, त्याकाळी जेलरला एक मुलगी होती. जॅकोबस असं त्या मुलीचं नाव होतं. ती दृष्टीहिन होती. फाशीवर जाण्यापूर्वी व्हॅलेंटाईन यांनी आपले डोळे जेलरच्या मुलीला दान केले होते.

लाल रंग प्रेमाचं प्रतिक

व्हॅलेंटाईन डेला लाल रंगाचं अधिक महत्त्व आहे. लाल रंग हा प्रेमाचं प्रतिक मानला जातो. त्यामुळे व्हॅलेंटाईन विकच्या आधी मॉल्स, थिएटर, शॉपिंग सेंटर आणि रेस्टॉरंटमध्ये लाल रंगाची सजावट केली जाते. लाल रंगाचे बलून, रिबन फूल, सुंदर आऊटफिटसारख्या गोष्टींनी सजावट केली जाते.

कवितेमुळे लाल रंग प्रेमाचं प्रतिक

पूर्वी लाल रंग बलिदानाचं प्रतिक समजलं जायचं. राग आणि द्वेषाचं प्रतिक म्हणूनही लाल रंग समजला जायचा. लाल रंग धोक्याचं प्रतिकही मानला जायचा. रोममध्ये मध्ययुगात श्रद्धांजलीच्यावेळी लाल रंगाचे कपडे परिधान केले जायचे. पण एका कवितेमुळे लाल रंग प्रेमाचं प्रतिक बनला.

त्याचं श्रेय ग्रीक समुदायाला दिलं जातं. “रोमन डी ला रोज” ही कविता त्याकाळी खूप फेमस झाली. या कवितेच्या आशयानुसार एक व्यक्ती लाल रंगाच्या गुलाबाच्या शोधासाठी निघाला आणि त्याचवेळी त्याला त्याची जीवनसाथी मिळाली. तेव्हापासून लाल रंग हा प्रेमाचं प्रतिक बनला.