फादर्स डे निमित्त द्या असे सरप्राईज, बाबांच्या आयुष्यभर लक्षात राहील हा खास दिवस

दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. तुम्ही हा दिवस तुमच्या वडिलांसाठी खास बनवू शकता, ज्यामुळे ते आनंदी होतील. आजच्या या लेखात आपण तुम्ही तुमच्या वडिलांसाठी कशा प्रकारे एक सरप्राईज प्लॅन करू शकता ते जाणून घेऊयात...

फादर्स डे निमित्त द्या असे सरप्राईज, बाबांच्या आयुष्यभर लक्षात राहील हा खास दिवस
Fathers Day
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Jun 13, 2025 | 6:14 PM

दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. प्रेम दाखवत नसले तरी आपल्या मुलांवर अफाट प्रेम करणारे व्यक्ती म्हणजे आपले वडील. तस बघायला गेलं तर आई-वडील हे एका नाण्यांचे दोन बाजू असतात. ज्याप्रमाणे आपल्या आईची जागा कोणी घेऊ शकत नाही, त्याचप्रमाणे वडीलांची जागा देखील कोणी घेत नाही. म्हणून वडीलांचे प्रेम, त्याग आणि मार्गदर्शनाबद्दल आभार मानण्याचा एक खास प्रसंग म्हणजे फादर्स डे आहे. मुलांसाठी सर्वात महत्त्वाचा नाते म्हणजे त्यांचे पालक. ते आपले संपूर्ण आयुष्य आपल्याला वाढवण्यात आणि एक चांगला माणूस बनवण्यात घालवतात. वडील अनेकदा शांतपणे जबाबदारीचे ओझे त्यांच्या खांद्यावर घेऊन जातात आणि त्यांच्या मुलांना शक्य तितके सर्व आनंद देतात. पण जसजसे आपण मोठे होतो आणि आपल्या कामात व्यस्त होतो तसतसे आपण आपल्या पालकांना कमी वेळ देऊ शकतो.

तुमच्या वडीलांसाठी वेळ काढणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही त्यांच्यासाठी एक सरप्राईस प्लॅन देखील करू शकता. तर या फादर्स डे निमित्त बोलून न दाखवता तुमच्या कृतीतून त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करा. तर यंदा हा फादर्स डे तुम्ही त्यांच्यासाठी खास आणि संस्मरणीय बनवू शकता. या दिवशी तुम्ही त्यांना अशा प्रकारे सरप्राईज प्लॅन देऊ शकता.

एक खास व्हिडिओ

जर तुम्ही तुमच्या कुटुंबापासून दूर कुठेतरी राहत असाल तर तुम्ही बाबांसाठी एक खास व्हिडिओ बनवून तो त्यांना पाठवू शकता. तुम्ही तुमच्या आणि बाबांच्या फोटोंसह एक व्हिडिओ तयार करा. तुम्ही तुमच्या वडीलांसाठी एक छान गाणं या व्हिडिओ मध्ये जोडुन तयार करा. तसेच यांमध्ये तुम्ही बाबांसाठी काही ओळी बोलू शकता. तुम्ही हा व्हिडिओ त्याच्यासोबत शेअर करू शकता. तर अशापद्धतींचा प्रेमाने भरलेला हा व्हिडिओ पाहून त्यांना नक्कीच आवडेल.

आवडते जेवण बनवा

तुमच्या वडिलांच्या आवडीनिवडी तुम्हाला माहित असतातच, तर हेच लक्षात घेऊन तुम्हीत्यांच्यासाठी काही चविष्ट पदार्थ बनवा. जसे की छोले भटुरे, मटर पनीर, किंवा गुलाब जामुन सारखे गोड पदार्थ किंवा तुमच्या वडिलांना जे आवडते तेच पदार्थ घरी स्वतः बनवा. नंतर जेवणाचा टेबल छानसा सजवून बाबा व कुटुंबासोबत एकत्र जेवण करा.

फिरायला जा

लहानपणी आपले आई-वडील मुलांना बाहेर फिरायला घेऊन जातात. पण आता तुम्ही तुमच्या वडीलांना फादर्स डे निमित्त सोबत फिरायला घेऊन जा. तुम्ही त्यांना जवळच्या कुठेतरी एक दिवसासाठी रेसॉर्टला घेऊन जाऊ शकता. याशिवाय वडीलांच्या आवडत्या ठिकाणी जाऊन तुम्ही जास्त वेळ घालवा. किंवा तुम्ही शनिवारीच कुटुंब सहलीची योजना देखील आखू शकता. तिथे तुमच्या पालकांना पूर्ण वेळ द्या.

भेट द्या

तुम्ही तुमच्या वडिलांना त्यांच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार भेट देऊ शकता. तुम्ही त्यांना पुस्तक, घड्याळ, फोन किंवा इतर काहीही भेट देऊ शकता. मूलं त्याच्या पालकांना जे काही देते, ते मोठे असो किंवा लहान, त्यांना ते नेहमीच आवडते.