Fitness Tips: जिममध्ये न जाता करा हे सोपे व्यायाम, शरीरावरील चरबी होईल झटपट कमी
Fat Burning Exercise: वजन कमी करण्यासाठी केवळ डाएट करून उपयोग होत नाही, तर योग्य व्यायाम करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. काही सोपे व्यायाम इतर व्यायामांच्या तुलनेत अधिक कॅलरीज बर्न करण्यास आणि शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करू शकतात. जाणून घेऊया असेच सोपे व्यायाम.

वाढलेले वजन आणि शरीरावर साचलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय करून पाहतात. मात्र, त्यासाठी नेहमीच जिममध्ये जाऊन हेवी वर्कआउट करण्याची गरज नसते. काही सोपे व्यायाम नियमित केल्यानेही कॅलरीज बर्न करण्यास आणि शरीरातील चरबी कमी करण्यास मदत होऊ शकते. वर्कआउट ट्रेनरच्या मते, काही व्यायाम इतरांच्या तुलनेत अधिक प्रभावी ठरतात. अर्थात, फॅट बर्न होण्याचे प्रमाण व्यायामाची तीव्रता, वय, वजन आणि उंची यांवरही अवलंबून असते. जाणून घेऊया असे व्यायाम, जे शरीर स्लिम आणि फिट ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
रनिंग
एक्स्पर्टच्या मते, फॅट बर्निंगसाठी धावणे हा उत्तम व्यायाम आहे. एक सरासरी व्यक्ती एक तासाच्या रनिंगमध्ये ५०० ते १००० कॅलरी बर्न करू शकते. मात्र, धावण्याचा वेग, वय याचाही कॅलरी बर्निंगवर परिणाम होतो. पण धावण्याने शरीरातील सर्व स्नायूंचा वापर होतो आणि जास्तीत जास्त कॅलरीज बर्न होतात.
सायकलिंग
कार्डिओ व्यायामात सायकलिंग सर्वोत्तम आहे. एक तास सायकल चालवल्यास ५०० ते ७०० कॅलरीज बर्न होतात. यामुळे गुडघे, हात, पाय यांसह शरीरातील सर्व आवश्यक स्नायूंची चरबी जाळण्यास मदत होते.
प्लँक्स
प्लँक देखील स्नायूंची चरबी वेगाने बर्न करतात. पण केवळ साधेच नव्हे तर वेगवेगळ्या पद्धतीने केलेले प्लँक शरीरावर इफेक्टिव्ह परिणाम करतात.
पायऱ्या चढणे
लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करण्याची सवय लावल्यास शरीराला चांगला व्यायाम मिळतो. पायऱ्या चढताना हृदयाचे ठोके वाढतात, त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि कॅलरीज बर्न करण्यास मदत होते. तसेच पायांचे स्नायू मजबूत होतात आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास हातभार लागतो.
स्किपिंग किंवा दोरीवरच्या उड्या
दोरीवर उड्या मारल्याने अपर आणि लोअर दोन्ही बॉडी पार्ट्सवर समान परिणाम होतो आणि स्नायूंमधून चरबी वेगाने बर्न होते. दोरीच्या उड्या मारणे हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी देखील चांगले आहे. इतकंच नाही तर दोरीच्या उड्या मारल्याने मन आणि शरीरात चांगलं संतुलन निर्माण होतं. जे मनाच्या आरोग्यासाठीही चांगले असते. एका तासात ६०० ते १००० कॅलरीज बर्न होऊ शकतात.