चालण्याचा व्यायाम करताय? मग, ‘हे’ लक्षात ठेवा!

| Updated on: Mar 22, 2021 | 1:26 PM

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम अनेकांच्या वजनावर झालेला आहे. यात कामाचे स्वरुप आणि आहार हे महत्त्वाचे घटक ठरत आहेत.

चालण्याचा व्यायाम करताय? मग, हे लक्षात ठेवा!
चालणे आरोग्यासाठी फायदेशीर
Follow us on

मुंबई : बदलत्या जीवनशैलीचा परिणाम अनेकांच्या वजनावर झालेला आहे. यात कामाचे स्वरुप आणि आहार हे महत्त्वाचे घटक ठरत आहेत. वाढलेले वजन ही अनेकांसाठी मोठी समस्या झाली आहे. बरेच लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात आणि चालतात. चालण्याने मधुमेह, हृदयरोग, बीपी यासारखे आजार देखील दूर होण्यास मदत होते. मात्र, चालताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. (Follow these tips when going for a walk)

चालताना आपले सर्व शरीर सरळ असले पाहिजे. चुकूनही खांदे झुकू देऊ नका. आजकाल सर्व वयोगटातील लोकांमध्ये ‘चालणे’ या व्यायाम प्रकारची खूपच क्रेझ आहे. कारण हा अगदी सोपा व्यायाम आहे आणि तो करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे समायोजन करण्याची आवश्यकता नाही. चालण्याचा व्यायाम हृदय निरोगी ठेवतो, हाडे मजबूत करतो आणि मानसिक तणावादेखील दूर ठेवतो. भाजीपाल्यांचं सलाड खाणं हे शरिरासाठी आरोग्यदायी आहे.

त्याचा वजन कमी करण्यासाठी देखील उपयोग होतो. जास्त प्रमाणात सलाड खाल्ले तर तुम्ही विचार करता त्यापेक्षा अधिक कॅलरी शरिरात जातात. सिजरसाठी (Caesar) वापरल्या जाणाऱ्या क्रिम सलाडमध्ये 20 ग्रॅम पर्यंत फॅट असतात, तर जवळपास 200 च्या आसपास कॅलरीज असतात. अनेक लोक त्यांच्या आहारात सॉस आणि ग्रेव्हीचा उपयोग करतात. मात्र, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फॅट आणि कॅलरिज असतात.

थेट फळं खाणं हे आपल्या आरोग्यासाठी नक्कीच चांगलं आहे. मात्र, फळांचा उपयोग करुन बनवलेले अनेक पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक असतात. उदाहरणार्थ बनाना ब्रेड. बनाना ब्रेडमध्ये बनाना फ्लेवर असतो. शिवाय मोठ्या प्रमाणात साखर, फॅट्स आणि कॅलरिज देखील असतात. हे पदार्थ खूप प्रक्रिया केलेले असतात. त्यामुळे ते आरोग्याला धोकाही पोहचवू शकतात.

फळांच्या कृत्रिम पेयांमध्ये केवळ 30 टक्के रस असतो. मात्र, साखरेचं प्रमाण मोठं असतं. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ही पेय टाळा. शिवाय जेवण करताना सावकाश व्यवस्थित चावून खाणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. त्यामुळे अधिक प्रमाणातील खाणं टाळलं जाईल आणि वजन नियंत्रित राहिल.

संबंधित बातम्या : 

दररोज नारळ पाणी प्या, व्यायाम न करता 10 किलो वजन घटणार, पाहा कसं?

पोटाचा घेर कमी करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

(Follow these tips when going for a walk)