Weight Gain | वजन कमी होण्याच्या समस्येने हैराण? मग, आहारात ‘या’ घटकांचा समावेश करा!

| Updated on: Jan 06, 2021 | 4:02 PM

वाढीव वजन किंवा अति कृशपणा दोन्हीचा आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर विपरित परिणाम होतो.

Weight Gain | वजन कमी होण्याच्या समस्येने हैराण? मग, आहारात ‘या’ घटकांचा समावेश करा!
Follow us on

मुंबई : वजन जास्त असणे हे जशी एक समस्या आहे, त्याचप्रमाणे वजन प्रमाणापेक्षा कमी होणे ही देखील एक समस्याच आहे. वाढीव वजन किंवा अति कृशपणा दोन्हीचा आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर विपरित परिणाम होतो. यामुळे तुमचा आत्मविश्वासही कमकुवत होऊ लागतो. ज्याप्रमाणे चरबीयुक्त लोकांचे वजन कमी करणे, हे खूपच आव्हानात्मक आहे, त्याच प्रकारे, जे वजनाच्या किमान मर्यादेपेक्षा अधिक सडपातळ आहेत त्यांचे वजन वाढवणे हे देखील फार अवघड काम आहे. बऱ्याचदा आपल्या अतिकृश शरीरामुळे एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास डळमळू लागतो. काही लोक शरीराला वजनदार बनवण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब करतात. बाजारात मिळणारी अनेक उत्पादने वापरतात. कृत्रिम घटकयुक्त ही उत्पादने खाण्याऐवजी आपण काही घरगुती उपाय करून पाहू शकता (Food ingredients for weight gain).

खजूर

खजूर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. जर, तुम्हाला स्वतःचे वजन वाढवायचे असेल, तर दुधात तीन ते चार खजूर घालून ते दूध उकळा आणि काही वेळासाठी थंड होऊ द्या. सकाळी नाश्त्याच्या वेळी खजूर बाजूला काढून केवळ दूध प्या. नियमितपणे हा उपाय केल्याने काही दिवसांत आपल्याला एक फरक जाणवू लागेल.

केळ्याची स्मुदी / शेक

वजन वाढवसाठी केळीची स्मुदी किंवा शेक देखील खूप उपयुक्त आहे. सकाळी फक्त न्याहारीच्या वेळीच याचे सेवन करा. काही काळ नियमितपणे केळ्याचा शेक पिण्याने तुमचे वजन सुधारेल. तसेच, शरीरात लोह आणि कॅल्शियमचे प्रमाणही संतुलित होईल. परंतु, केळ्याची स्मुदी किंवा शेक बनवण्यासाठी केवळ ताजे मलईयुक्त दूध वापरा.

ड्रायफ्रुट्सयुक्त दूध

बदाम, खजूर, मनुका, अक्रोड आणि अंजीर हा सुकामेवा बारीक करून कोमट दुधात मिसळा आणि सकाळी नाश्त्याच्या वेळी प्या. याच्या नियमित सेवनाने आपल्याला काही दिवसात आपल्या वजनात फरक दिसून येईल (Food ingredients for weight gain).

शेंगदाणे

रात्री शेंगदाणे भिजत घालून, सकाळी रिकाम्या पोटी खा. यानंतर किमान एक तास काहीही खाऊ नका. यामुळे देखील काही दिवसात आपले वजन वाढेल. कारण, शेंगदाण्यामध्ये असणारी चरबी आणि कॅलरी हे वजन वाढीस उद्युक्त ठरणारे दोन्ही घटक असतात.

लक्षात ठेवा :

जर, आपले वजन सामान्यपणे वाढत नसेल, तरच हे उपाय आपल्यासाठी प्रभावी ठरतील. यासह, आपल्याला आपल्या नेहमीच्या डाएटमध्ये देखील सुधारणा कराव्या लागतील. शरीराला योग्य पोषण मिळावे म्हणून, आहारात हिरव्या भाज्या, डाळ, कडधान्य आणि फळे इत्यादी घटकांचा समावेश करा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)

(Food ingredients for weight gain)

हेही वाचा :