Kitchen Tips: नूडल्सपासून अंड्यापर्यंत… लोकप्रिय शेफने सांगितली पदार्थ उकळण्याची परिपूर्ण पद्धत

Kitchen Tips: नूडल्सपासून अंड्यापर्यंत... अनेक पदार्थ कसे उकळवायचे असा सतत पडतोय प्रश्न... तर आता काळजी करु नका... लोकप्रिय शेफकडून जाणून घ्या सर्वकाही उकळण्याची परिपूर्ण पद्धत

Kitchen Tips: नूडल्सपासून अंड्यापर्यंत... लोकप्रिय शेफने सांगितली पदार्थ उकळण्याची परिपूर्ण पद्धत
| Updated on: Jan 03, 2026 | 2:46 PM

Kitchen Tips : स्वयंपाक करणं ही केवळ गरज नाही तर एक कला देखील आहे. योग्य मीठ, मसाले इत्यादी गोष्टींटी माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कधीकधी, अन्न जास्त मीठयुक्त असतं, तर कधीकधी ते जास्त मसालेदार असते. तर कधी बटाटे आणि अंडी उकडताना ती फुटतात… यामुळे वेळ तर वाया जातोच, पण स्वयंपाक करण्याचा तुमचा मूडही खराब होतो. जर तुम्हाला वारंवार अशा समस्या येत असतील तर काही महत्त्वाच्या टीप्स जाणून घ्या. शेफ पकंज भदौरिया यांनी काही महत्त्वाच्या टीप्स दिल्या आहेत… हे तुम्हाला उकडलेल्या अंडीपासून ते बटाटे आणि नूडल्सपर्यंत सर्व काही शिजवण्याची योग्य पद्धत सांगतील, जेवणाची चव खराब न करता किंवा तुमचा मूड खराब न करता. सर्वकाही शिजवण्याची आणि उकळण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

बटाटे शिजवताना हे लक्षात ठेवा

बटाटे उकळण्यासाठी कोणत्या प्रकारचे पाणी वापरावे? त्यांच्या मते, बटाटे उकळण्यासाठी तुम्ही नेहमी सामान्य किंवा थंड पाणी वापरावं. कारण बटाटे गरम किंवा कोमट पाण्यात उकळल्याने ते बाहेरून शिजतात पण आतून कच्चे राहतात.

या टिपमुळे अंडी नाही फुटणार

बऱ्याचदा, अंडी फोडतात किंवा उकळताना बलक बाहेर येतो. शेफ सांगतात, पाण्याचं तापमान अचानक बदलल्यामुळे असं होते. म्हणून, अंडी उकळण्यासाठी, तुम्ही प्रथम त्यांना थंड पाण्यात भिजवावे आणि नंतर ते चुलीवर ठेवावे. यामुळे अंड्यांची कवच ​​पाण्याच्या तापमानाबरोबर हळूहळू गरम होऊ शकतील, ज्यामुळे अंडी उकळताना फुटणार नाही.

पास्ता किंवा नूडल्स उकळवण्याची योग्य पद्धत

शेफ सांगतात की, पास्ता, मॅकरोनी किंवा नूडल्स शिजवण्यासाठी नेहमी उकळत्या पाण्याचा वापर करावा. यामुळे पास्ता आणि नूडल्स एकमेकांना चिकटत नाहीत. पण, जर तुम्ही ते थंड पाण्यात टाकले तर पाण्यातील स्टार्च त्यांना एकत्र चिकटण्यास कारणीभूत ठरतील. हे टाळण्यासाठी, पास्ता उकळताना नेहमी मीठ आणि थोडे तेल घाला.

हिरव्या भाज्या कशा उकळायच्या?

हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. म्हणून, त्या उकळताना त्यांचा रंग आणि पोषण नष्ट होणार नाही याची खात्री करणं महत्वाचं आहे. शेफ पंकज सल्ला देतात की हिरव्या भाज्या नेहमी पाणी गरम झाल्यानंतरच उकळवायच्या. साध्या पाण्यात भाज्या भिजवल्याने त्यांचा रंग जाऊ शकतो. शेफ सल्ला देतात की, भाज्या उकळल्यानंतर लगेच थंड पाण्यात टाका. यामुळे त्यांचा नैसर्गिक रंग टिकून राहील.