हिऱ्याची अंगठी घालण्यापूर्वी हे नक्की वाचा! या राशीच्या व्यक्तींनी अजिबात घालू नये, या राशीसाठी असते शुभ
Gemstone: हिरा हे शुक्र ग्रहाशी संबंधित रत्न मानले जाते. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येकाला हे रत्न अनुकूल ठरत नाही. जाणून घ्या, हिरा कोणी घालावा आणि कोणत्या राशींनी तो घालणे टाळावे.

हिरा हा केवळ मौल्यवान आणि चमकदार रत्न नसून ज्योतिषशास्त्रातही त्याला विशेष महत्त्व दिले जाते. अनेकजण अंगठी किंवा दागिन्यांच्या स्वरूपात हिरा घालणे पसंत करतात. मात्र, प्रत्येक व्यक्तीला हिरा अनुकूल ठरेलच असे नाही. रत्नशास्त्रानुसार, कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी कुंडलीतील ग्रहांची स्थिती आणि राशी विचारात घेणे आवश्यक असते. हिरा हा शुक्र ग्रहाशी संबंधित मानला जातो. शुक्राचा संबंध धन, संपत्ती, ऐश्वर्य, सौंदर्य आणि प्रेमजीवनाशी जोडला जातो. त्यामुळे हिरा धारण करण्यापूर्वी तो आपल्यासाठी योग्य आहे की नाही, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. कोणत्या व्यक्तींनी हिरा घालावा आणि कोणत्या राशींनी तो घालणे टाळावे, जाणून घेऊया.
हिरा कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे?
रत्नशास्त्रानुसार, हिरा शुक्र ग्रहाचे रत्न मानले जाते. शुक्र ग्रहाचा संबंध धन, संपत्ती, सुख-सुविधा, सौंदर्य आणि प्रेमजीवनाशी जोडला जातो. योग्य पद्धतीने हिरा धारण केल्यास कुंडलीतील शुक्र ग्रहाची स्थिती मजबूत होऊ शकते, अशी ज्योतिषीय मान्यता आहे. त्यामुळे शुक्र ग्रहाशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी काही जण हिरा धारण करण्याचा सल्ला घेतात.
हिरा कोणी आणि कधी धारण करावा?
ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र ग्रहाची स्थिती मजबूत किंवा सकारात्मक असते, त्या व्यक्ती हिरा धारण करू शकतात. शुक्र ग्रहाशी संबंधित असल्यामुळे शुक्रवारच्या दिवशी हिरा घालणे शुभ मानले जाते. मात्र, तो धारण करण्यापूर्वी त्याचे शुद्धीकरण करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. हिरा धारण करण्यासाठी योग्य दिवस आणि पद्धत जाणून घेणेही महत्त्वाचे मानले जाते.
हिरा घालण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी?
प्रत्येकाला हिरा अनुकूल ठरेलच असे नाही. त्यामुळे केवळ आवड किंवा फॅशन म्हणून हे रत्न धारण करू नये. कुंडलीतील ग्रहांची स्थिती आणि राशीनुसारच हिरा घालण्याचा निर्णय घ्यावा. चुकीचे रत्न धारण केल्यास अपेक्षित लाभ मिळत नाही, अशी ज्योतिषशास्त्रात मान्यता आहे. यासाठी ज्योतिषतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य मानले जाते.
कोणत्या राशींनी हिरा घालणे टाळावे?
रत्नशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, मेष, मीन, वृश्चिक आणि कर्क या चार राशींच्या व्यक्तींनी हिरा घालणे टाळावे, असे सांगितले जाते. तसेच हिरा धारण करताना पोवळे आणि माणिक या रत्नांसोबत तो घालू नये, अशी मान्यता आहे. त्यामुळे हिरा किंवा इतर कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी आपल्या कुंडलीचा अभ्यास करून घेणे आवश्यक मानले जाते.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)