
तुम्ही पाहिलं असेल की रात्रीच्या वेळी दुकानदार आपली दुकानं बंद करताना किंवा भाजीवाले आपला भाजीचा ठेला बंद करताना नेहमी तुपाचा दिवा लावतात आणि मगच घरी जातात. तर काही घरांमध्ये देखील रात्री झोपताना तुपाचा दिवा लावला जातो. यामागे काही कारणं आहेत. ती वास्तूशास्त्रानुसारही आहेत आणि आरोग्याच्या दृष्टीनेही आहेत. खरंतर रात्री झोपताना तुपाचा दिवा लावणे ही एक पारंपारिक पद्धत आहे. पण नक्की याचे फायदे काय आहेत जाणून घेऊयात.
रात्री सर्वांनाच शांत झोप हवी असते. कारण जर ती शांत झोप झाली तरच तुमचा दिवस नीट जातो, दिवसभरातील कामे नीट होतात. पण अनेकदा थकलेलो असू तरी देखील झोप न लागण्याची समस्या जाणवते. त्यावरचा उपाय म्हणजे रात्री झोपताना बेडरुममध्ये तुपाचा दिवा लावणे. कारण त्यामुळे सकारात्मक ऊर्जा येते आणि चांगली झोप लागते. होय, हा उपाय खरोखरंच काम करतो. आणि एवढंच नाही तर यासोबत अनेक समस्याही दूर करण्यास मदत करतो.
झोपताना बेडरुममध्ये तुपाचा दिवा लावण्याचे आरोग्यदायी फायदे
झोपताना तुमच्यापासून काही फूट अंतरावर तूप किंवा एरंडेल तेलाचा दिवा बेडरुममध्ये किंवा तुम्ही झोपत असलेल्या खोलीत लावा.नक्कीच चांगली झोप येईल. तुपाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामध्ये झोपेच्या वेळी तुपातून निघणाऱ्या धुराचा वास घेतल्याने श्वसनाचे कार्यही चांगले राहते आणि मज्जासंस्था शांत होते. एका आहारतज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे तूप निर्विवादपणे पोषक तत्वांनी समृद्ध असते. ते अ, ड, ई आणि क जीवनसत्त्वे शरीराला पुरवतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून कमी प्रमाणात त्याचे सेवन केल्याने तेजस्वी त्वचा आणि पेशी दुरुस्त करण्यात मदत होते. त्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने काही पोषक घटक त्वचा सुंदर व शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.
तुपाचा दिवा या समस्यांवर उपाय ठरू शकतो
1.शांत झोप लागण्यास मदत होते
2.घोरण्याची समस्या कमी होते
3. अपचन, आंबट ढेकरपासून सुटका मिळते
4. दररोज अँटासिड्स घेणाऱ्या लोकांसाठी हा चांगला उपाय
तुपाचा दिवा लावण्याचे वास्तूशास्त्रानुसार होणारे फायदे:
सकारात्मक ऊर्जा:
काही विद्वानांच्या मते, तुपाचा दिवा वातावरणात सकारात्मक ऊर्जा पसरवतो.
चांगली झोप:
असे मानले जाते की तुपाच्या दिव्याची ज्योत पवित्र देवतेला स्थीर करण्यास आणि झोप सुधारण्यास मदत करते.
वास्तुशास्त्र:
वास्तुशास्त्रानुसार, तुपाचा दिवा लावणे सामान्यतः शुभ मानले जाते.
नकारात्मक ऊर्जा:
काही लोकांचा असा विश्वास आहे की तुपाच्या दिव्याचा प्रकाश नकारात्मक ऊर्जा दूर करतो.
आर्थिक फायदे:
काही धार्मिक तत्त्वांनुसार, तुपाचा दिवा लावल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद राहतो आणि आर्थिक स्थिती मजबूत होते.
लक्षात ठेवण्यासारख्या योग्य गोष्टी:
सुरक्षा:
दिवा लावताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी, विशेषतः जर तुमच्या घरात मुले किंवा पाळीव प्राणी असतील. तसेच दिवा तुमच्यापासून सुरक्षित अंतरावर ठेवावा
प्रकाश:
दिव्याला अशा जागेत ठेवा जिथे तो पुरेसा प्रकाश देऊ शकेल, परंतु जास्त तेजस्वी नसेल.
नियमितता:
काही दिवस हा प्रयोग नियमित सुरु ठेवा
इतर उपाय:
झोपण्यापूर्वी कापूर जाळणे हा देखील एक चांगला उपाय आहे.
झोपण्यापूर्वी तेलात तूप घालणे देखील धोकादायक मानले जाते.