कोंडा दूर करायचे सोपे घरगुती उपाय!

| Updated on: Jul 19, 2023 | 1:44 PM

अशा तऱ्हेने कोंड्याच्या सुरवातीलाच त्यापासून सुटका झाली तर तुमच्या केसांचे आरोग्य टिकून राहते. आज आम्ही कोंडा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही केसांमधील कोंडा साफ करू शकता, तर चला जाणून घेऊया कोंडा दूर करण्यासाठी घरगुती उपाय...

कोंडा दूर करायचे सोपे घरगुती उपाय!
dandruff problem
Follow us on

मुंबई: पावसाळ्यात केस चिकट आणि तेलकट होतात, ज्यामुळे कोंडा होतो. कोंडा ही केसांना कमकुवत बनवणारी एक समस्या आहे. त्याचबरोबर केसांमध्ये कोंडा जास्त असेल तर त्यामुळे टाळूमध्ये इन्फेक्शन किंवा जखमेची समस्याही उद्भवते. अशा तऱ्हेने कोंड्याच्या सुरवातीलाच त्यापासून सुटका झाली तर तुमच्या केसांचे आरोग्य टिकून राहते. आज आम्ही कोंडा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही केसांमधील कोंडा साफ करू शकता, तर चला जाणून घेऊया कोंडा दूर करण्यासाठी घरगुती उपाय…

कोंडा दूर करायचे उपाय

  1. समप्रमाणात पाणी आणि ॲपल साइडर व्हिनेगर मिक्स करा. सर्वप्रथम शॅम्पूने केस स्वच्छ धुवावेत. नंतर हे मिश्रण केसांमध्ये घालून काही मिनिटे सोडा. यानंतर केस धुवून स्वच्छ करावेत. हे आपल्या टाळूची पीएच पातळी राखेल.
  2. ताज्या लिंबाचा रस काढून आपल्या टाळूवर चांगला लावा. त्यानंतर हलक्या हातांनी सुमारे ५-१० मिनिटे मसाज करा. हे आपल्या टाळूची पीएच पातळी अबाधित ठेवेल, ज्यामुळे आपल्याला कोंडा कमी होण्यास मदत होईल. परंतु जर तुम्हाला टाळूवर कसली जखम असेल तर हे लावणे टाळा.
  3. यासाठी खोबरेल तेल आणि ऑलिव्ह ऑईलमध्ये टी ट्री ऑइलचे काही थेंब मिसळा. त्यानंतर केसांच्या मुळांना लावून मसाज करा. टी ट्री ऑइल मध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात जे केसांमधून कोंडा दूर करतात.
  4. फ्रेश कोरफड जेल काढून ते थेट आपल्या टाळूवर लावा. नंतर सुमारे 30 मिनिटे ठेवा. यानंतर आपल्या रेग्युलर शॅम्पूने धुवून केस स्वच्छ करा. कोरफडमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात जे टाळूचा कोरडेपणा आणि कोंडा दूर करण्यास मदत करतात.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)