Hair Care | हिवाळ्यात कुरळ्या केसांची निगा राखताना दमछाक होतेय? ‘या’ टिप्स ट्राय करा!

| Updated on: Feb 01, 2021 | 1:45 PM

सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरू आहे. या हंगामात आपल्याला बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागतो.

Hair Care | हिवाळ्यात कुरळ्या केसांची निगा राखताना दमछाक होतेय? ‘या’ टिप्स ट्राय करा!
हिवाळ्यात आपल्या केसांनाही अधिकची काळजी घेण्याची गरज असते.
Follow us on

मुंबई : सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरू आहे. या हंगामात आपल्याला बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागतो. आपले शरीर हवामानातील अचानक झालेल्या बदलांचा सामना करण्यास सक्षम नसते आणि यामुळेच बर्‍याच रोगांनाही बळी पडते. हिवाळ्यात आपल्या केसांनाही अधिकची काळजी घेण्याची गरज असते. तथापि, या हंगामात केसांची काळजी घेणे वाटते तितके सोपे नाही त्यातही जर आपले केस कुरळे असतील, तर मग अगदी दमछाकच होते (Hair care tips for curly hair during winter season).

थंड वाऱ्याच्या माऱ्यामुळे, आपल्या केसांवर आणि त्वचेचा सर्वाधिक परिणाम दिसून येतो. विशेषत: जर आपले केस कुरळे असतील, तर या हंगामात त्यांना सर्वात काळजी घ्यावी लागते. जर, आपले केसदेखील कुरळे असतील आणि हिवाळ्याच्या हंगामात त्यांनी निगा राखणे खूप कठीण काम वाटत असेल तर आम्ही आपल्यासाठी येथे काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याचा वापर करून आपण आपल्या कुरळे केसांची सहज काळजी घेऊ शकता.

केसांना तेल लावावे

कोरडे केस व्यवस्थापित अर्थात सेट करण्यासाठी तेल लावणे फार महत्वाचे आहे. याचा तुमच्या केसांवर खूप परिणाम होतो. या हंगामात आपण आपल्या कुरळे केसांवर तेल मालिश करणे आवश्यक आहे. हिवाळ्याच्या हंगामात केसांसाठी आपण एरंडेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. तसेच आवडत असल्यास, आपण खोबरेल तेलाची मालिश देखील करू शकता.

कोमट पाण्याने केस धुवा

केसांना तेल लावल्यानंतर आपण ते कोमट पाण्याने स्वच्छ धुतले पाहिजे. हे लक्षात ठेवावे की जास्त गरम पाणी वापरल्याने आपल्या केसांमध्ये कोरडेपणा उद्भवू शकतो. नेहमी कोमट पाण्याने कुरळे केस धुवावे (Hair care tips for curly hair during winter season).

कोरडेपणा दूर करण्यासाठी हेअर मास्क वापरा

हिवाळ्याच्या मौसमात आपण कोरडे केस टाळण्यासाठी नेहमी हेयर मास्क वापरला पाहिजे. जर आपण बाजारातून तयार हेअर मास्क विकत घेत असाल, तर केसांच्या गुणवत्तेनुसार खरेदी करा. या पेक्षा आपण घरच्या घरी हेअर मास्क तयार करा आणि आपल्या केसांना लावा. यासाठी दोन चमचे नारळ तेलात 4 चमचे, कोरफड जेल आणि 3 चमचे दही मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांवर लावा आणि अर्धा तास तशीच सोडा. नंतर कोमट पाण्याने केस धुवा. आपण आठवड्यातून एकदा हा उपाय करू शकता.

केस सुकवण्यासाठी ड्रायर वापरू नका

शक्यतो हिवाळ्यात, आपले कुरळे केस ड्रायरपासून दूर ठेवा. जर तुम्ही केस वाळवण्यासाठी ड्रायर वापरत असाल तर, बरेच प्रयत्न करूनही तुमची ही समस्या संपणार नाही.

ओल्या केसांमध्ये ब्रश करू नका

ओल्या केसांनी कधीही ब्रश करू नका. कोरडे झाल्यानंतरच आपल्या कुरळ्या केसांना ब्रश किंवा कंगव्याने विंचरा. तसेच, केस हलके कोरडे झाल्यावर त्यात हेअर सीरम लावा आणि त्यानंतरच केसांवर फणी किंवा ब्रश फिरवा.

(Hair care tips for curly hair during winter season)

हेही वाचा :