Hair Care Tips : केसांमध्ये पांढरे केस वाढत आहेत? घरच्या घरी बनवा ही नैसर्गिक हेअर डाई, केस दिसतील काळेभोर

बाजारतील किती महागडी हेअर डाई प्रोडक्ट्स वापरली तरी काही वेळाने केस पांढरे पडतातच. उलट त्याचे प्रमाण आणखीनच वाढते. वेगवेगळ्या अॅलर्जा होतात हा प्रॉब्लेम तर वेगळाच. पण काही घरगुती उपाय केल्याने तुमचे केस बरेच दिवस काळेभोर राहण्यास मदत होते. कसलीही अॅलर्जी होत नाही.

Hair Care Tips : केसांमध्ये पांढरे केस वाढत आहेत? घरच्या घरी बनवा ही नैसर्गिक हेअर डाई, केस दिसतील काळेभोर
hair colour tips
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 06, 2026 | 8:41 PM

आपल्या छान काळ्या केसांत एक पांढरा केल दिसला तर आपण काही वेळ दुर्लक्ष करतो. पण जर पांढरे केस वाढतच गेले तर खूप जास्त टेन्शन येते. म्हातारं झाल्याची फिलींग येते. मग ते पांढरे केस काळे करण्यासाठी तारेवरची कसरत केली जाते.बाजारापासून ते घरगुती उपायांपर्यंत सगळे उपाय ट्राय केले जातात. पण काही लोकांच्या केसांना काडीचा पण फरक पडत नाही.पहिल्यांदा केस काळे होतात पण मग काही दिवसातच केस पुन्हा पांढरे फटक दिसू लागतात. यावर मी तुम्हाला एक जालीम उपाय सुचवते ज्यामुळे तुमचे केस बराच काळभोर राहतील.

 

Loading...

डाई तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :

यासाठी 2 चमचे चहापत्ती, 2 तेजपत्ता , 2 कडीपत्याची पाने, 2 आवळ्याची पाने, 1 चमचा हळद, 1 चमचा काळे जिरे, 5 ते 6 लवंगा आणि 1 चमचा आवळ्याची पावडर

 

अशी तयार करा घरगुती डाई

सर्वात आधी लोखंडी कढईमध्ये चहा पत्ती, तेजपत्ता, कडीपत्त आणि आवळ्याची पाने घेऊन भाजून घ्या. मिश्रणातून हलका धूर येऊ लागल्यानंतर त्यात हळद, काळे जिरे आणि लवंगा घाला. त्यानंतर आवळा पावडर मिसळून हे मिश्रण गडद रंगाचे होईपर्यंत भाजावे.मिश्रण थंड झाल्यानंतर ते ग्राईंडरमध्ये बारीक करून घ्या. नंतर हे पावडर गाळून घ्या. तयार झालेली बारीक पावडर हवाबंद डब्यात ठेवता येते. तयार पावडरमध्ये थोडं पाणी आणि दही मिसळून पेस्ट तयार करा. त्यात आवळा पावडरही घालता येते. ही पेस्ट पांढऱ्या केसांवर व्यवस्थित लावून 2 तास ठेवून घ्या. त्यानंतर केस थंड पाण्याने धुवून घ्या.

 

दुसरा पर्याय

तयार केलेल्या पांडरेमध्ये नारळाचे तेल किंवा अॅलोवेरा जेल मिसळूनही पेस्ट बनवता येते. ही पेस्ट केसांवर लावून 15 ते 20 मिनिटे केसांना लावा आणि केस धुवून टाका.

 

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us