Flaxseeds | आरोग्यासाठी बहुगुणी ‘आळशी’च्या बिया, वाचा याचे महत्त्वपूर्ण फायदे…

| Updated on: Feb 20, 2021 | 8:12 AM

आळशीच्या बियांमध्ये इतर नट्सपेक्षा केवळ कॅलरी जास्त  नसतात, तर त्यामध्ये बरेच पौष्टिक घटक देखील असतात. 100 ग्रॅम आळशी बियाण्यांमध्ये जवळपास 534 कॅलरी असतात.

Flaxseeds | आरोग्यासाठी बहुगुणी ‘आळशी’च्या बिया, वाचा याचे महत्त्वपूर्ण फायदे...
जवस
Follow us on

मुंबई : फ्लॅक्ससीड्स अर्थात ‘आळशी’च्या बियांना सुपरफूड म्हणून देखील ओळखले जाते. यामध्ये केवळ पुष्कळ पोषक घटकच नसतात, तर निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असणारे चांगले घटक देखील असतात. कोरोना काळात कफ-खोकल्यावर गुणकारी म्हणून मोठ्या प्रमाणात आळशीच्या बियांचे सेवन केले जात आहे. हे बियाणे फ्लॅक्ससीड्स, जवस अशा बर्‍याच वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखले जाते. चला तर, जाणून घेऊया याच्या आणखी काही फायद्यांबद्दल…(Health Benefits of flaxseeds)

पौष्टिक घटक

आळशीच्या बियांमध्ये इतर नट्सपेक्षा केवळ कॅलरी जास्त  नसतात, तर त्यामध्ये बरेच पौष्टिक घटक देखील असतात. 100 ग्रॅम आळशी बियाण्यांमध्ये जवळपास 534 कॅलरी असतात. अर्थात एक चमचा आळशीमध्ये 55 कॅलरी असतात.

10 ग्रॅम आळशीमधील पोषक घटक

– पाणी : 7 टक्के

– प्रथिने : 1.9 ग्रॅम

– कार्ब : 3 ग्रॅम

– साखर : 0.2 ग्रॅम

– फायबर : 2.8 ग्रॅम

– चरबी : 4.3 ग्रॅम

आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर :

नट्स आणि बियाणे वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम आहार मानले जातात. म्हणून आपण आपल्या आहारात फ्लेक्ससीड अर्थात आळशी देखील समाविष्ट करू शकता. या लहान बियामध्ये भरपूर प्रमाणत फायबर असते. जे आपली भूक देखील भगवते आणि आरोग्यास निरोगी ठेवण्याचे काम करते. एका अभ्यासानुसार असे म्हटले गेले आहे की, हे वजन कमी करण्यात मदत करते.

रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीचे नियंत्रण

फ्लेक्ससीड बियाणे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. अभ्यासानुसार, दररोज आळशीचे बियाणे खाल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी 6 ते 11 टक्क्यांनी कमी होऊ शकते. हे यामुळे शक्य आहे, कारण त्यात उच्च फायबर आणि लिग्निन घटक आहे.

हृदयासाठी चांगले

आळशीमध्ये ओमेगा -3 फॅटी आम्ल असतात, जे आपल्या हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी खूप चांगले आहेत. या बियामध्ये ओमेगा-3 फॅटी आम्लासह अल्फा-लिनोलेनिक आम्ल (एएलए) देखील लक्षणीय प्रमाणात असते. निरोगी चरबी बर्‍याच गोष्टींसाठी चांगली असते. हृदयाशी संबंधित आजारांसाठी देखील हे घटक रामबाण उपाय आहे (Health Benefits of flaxseeds).

कमी रक्तदाब

या बिया खाल्ल्याने नैसर्गिक पद्धतीने रक्तदाब कमी होतो. 2015च्या अभ्यासानुसार, ज्यांनी 12 आठवड्यांपर्यंत दररोज आळशी खाल्ली होती, त्यांचा रक्तदाब नियंत्रणाखाली होता. या बियांमध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असते. हे घटक रक्तवाहिनीच्या भिंतीवरील ताण कमी करण्यात मदत करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात.

मधुमेह

एका अभ्यासानुसार दररोज, लिग्गनचे सेवन केल्यास तुमच्या रक्तातील साखरेची पातळी बर्‍यापैकी नियंत्रणाखाली राहते. या अभ्यासानुसार असे म्हटले आहे की, ज्या लोकांना टाईप-2 मधुमेह होता, त्यांनी दररोज 10 ते 20 ग्रॅम आळशीचे सेवन केले. ज्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी 1 ते 2 महिन्यांत 19.7 टक्क्यांनी कमी झाली.

कर्करोग

नुकत्याच केलेल्या एका अभ्यासानुसार, आळशीमध्ये असणाऱ्या कंपाऊंडमुळे तुम्हाला स्तन, पुर:स्थ आणि कॅलन कर्करोगापासून आराम मिळू शकतो. अभ्यासानुसार 6,000 महिलांनी फ्लेक्ससीड बियाणे सेवन केले. त्यांच्यामध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता 18 टक्क्यांनी कमी झाली. या व्यतिरिक्त यासंबंधी अजून संशोधन होणे बाकी आहे.

(टीप : सेवनापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health Benefits of flaxseeds)

हेही वाचा :