Skin Care | गर्भावस्थेत वॅक्सिंग करण्याचा विचार करताय? मग, ‘या’ गोष्टी आधी लक्षात घ्या…

| Updated on: Feb 12, 2021 | 3:21 PM

गर्भधारणेदरम्या स्त्रियांच्या मनामध्ये बर्‍याच गोष्टींचा कोलाहल सुरु असतो. या काळात कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करू नयेत, याविषयी त्यांच्या मानता संभ्रम निर्माण झालेला असतो.

Skin Care | गर्भावस्थेत वॅक्सिंग करण्याचा विचार करताय? मग, ‘या’ गोष्टी आधी लक्षात घ्या...
गर्भावस्थेत काही महिलांना वॅक्सिंग सुरक्षित वाटते, तर काही महिलांना ही प्रक्रिया असुरक्षित वाटते.
Follow us on

मुंबई : गर्भधारणेदरम्या स्त्रियांच्या मनामध्ये बर्‍याच गोष्टींचा कोलाहल सुरु असतो. या काळात कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करू नयेत, याविषयी त्यांच्या मानता संभ्रम निर्माण झालेला असतो. यातीलच एक गोष्ट म्हणजे वॅक्सिंग. गर्भावस्थेत काही महिलांना वॅक्सिंग सुरक्षित वाटते, तर काही महिलांना ही प्रक्रिया असुरक्षित वाटते. परंतु, जर तज्ज्ञांचे मत लक्षात घेतले तर, त्यांच्या म्हणण्यानुसार गर्भावस्थेच्या दरम्यान वॅक्सिंग करणे अतिशय सुरक्षित समजले जाते. परंतु, काही विशिष्ट परिस्थितीत या गोष्टी टाळल्या पाहिजेत (Health Care Tips Waxing during pregnancy).

व्हेरिकोज वेन्स

गरोदरपणात व्हेरिकोज वेन्स या नसांच्या समस्येमुळे, नसा सुजलेल्या आणि वाकड्या वाटल्यास वॅक्सिंग करू नये. व्हेरिकोज वेन्सची समस्या शरीराच्या कोणत्याही भागावर असू शकते. परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये ती पायावरच असते.

जखमेच्या किंवा भेगा असल्यास

जर शरीराच्या कोणत्याही भागावर जखम किंवा त्वचा कट किंवा भेगाळालेली असेल तर, वॅक्सिंग करू नका. यामुळे वेदना, तसेच संक्रमणाचा धोका निर्माण होईल.

तपकिरी डाग

गर्भधारणेदरम्यान, शरीरावर तपकिरी डाग अर्थात मेलाज्मा असल्यास वॅक्सिंग करू नये. यामुळे जळजळ होऊ शकते, तसेच मेलाज्मा आणखी गंभीर होण्याचा धोका वाढू शकतो (Health Care Tips Waxing during pregnancy).

पुरळ

या काळात हार्मोनल बदलांमुळे बर्‍याच महिलांच्या त्वचेवर वारंवार पुरळ येत असते. आपल्यालाही पुरळ उठण्याची समस्या असल्यास वॅक्सिंग टाळणे चांगले. वॅक्सिंगमुळे संक्रमणाचा धोका अधिक वाढू शकतो.

इंजेक्शन घेतले असल्यास

ज्या ठिकाणी इंजेक्शन दिले गेले आहे तेथे वॅक्सिंग करू नका. याव्यतिरिक्त, सनबर्न झालेल्या भागावर देखील वॅक्सिंग करणे कटाक्षाने टाळा. यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो.

नेहमीच्या इतर दिवसांपेक्षा जास्त वेदना

सर्वसाधारणपणे, गर्भावस्थेदरम्यान केले जाणारे वॅक्सिंग इतर सामान्य दिवसात केलेल्या वॅक्सिंगपेक्षा किंचित वेदनादायक असते. वास्तविक, गर्भधारणेदरम्यान स्त्रीला अनेक हार्मोनल बदलांना सामोरे जावे लागते. यामुळे त्वचा आणि केस इतर सामान्य दिवसांपेक्षा अधिक दाट वाढतात. ज्यामुळे वॅक्सिंग करताना अनेक समस्या उद्भवतात.

इतर वेळीही वॅक्सिंगच्या प्रक्रियेला सामोरे जाताना वेदना या होतातच! मात्र, या काळात वेदना अधिक होतात. त्यामुळे शक्यतो वॅक्सिंग टाळावी. वॅक्सिंगला पर्याय म्हणून रेझर वापरू शकता. याने वेदना होणार नाहीत. मात्र, रेझरचा वापर करतानाही वरील गोष्टी लक्षात घ्याव्या. जर तुम्हाला त्वचेची कोणतीही समस्या असल्यास वॅक्सिंग किंवा रेझर वापरणे पूर्णपणे टाळावे. हे तुमच्या आणि होणाऱ्या बाळाच्या दृष्टीने योग्य ठरेल.

(Health Care Tips Waxing during pregnancy)

हेही वाचा :