जेवल्यानंतर पोटाच्या समस्या सतावत असेल तर ‘हे’ घरगुती उपाय लगेच देतील आराम

जेवण जेवल्यानंतर पोटात जडपणा येणे, गॅस तयार होणे असे अनेक समस्या बहुतेकांना होत असतात. पण अशावेळेस या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी औषध घेणे आपल्या आरोग्यासाठी योग्य मानले जात नाही. तर तुम्हालाही या समस्या सतावत असतील तर आजच्या या लेखात आपण अशा काही घरी उपलब्ध असलेल्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करून पाहूयात ज्यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळेल...

जेवल्यानंतर पोटाच्या समस्या सतावत असेल तर हे घरगुती उपाय लगेच देतील आराम
Home remedies
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Jun 22, 2025 | 2:04 AM

आपले आरोग्य चांगले व तंदूरस्त राहावे यासाठी निरोगी पदार्थांचे सेवन करणे महत्वाचे असते. म्हणूनच आपण निरोगी राहण्यासाठी, संतुलित आहार घेतला पाहिजे, परंतु या आहाराचा पूर्ण फायदा तेव्हाच होतो जेव्हा ते योग्यरित्या पचते. जर अन्न योग्यरित्या पचलेच नाही तर त्यातील पोषक तत्वे योग्यरित्या आपल्या शरीराला मिळत नाहीत. त्यामुळे अनेकजण जेवणानंतर पचनक्रिया खराब असेल तर पोट फुगणे, अपचन, आम्लता, गॅस, पोटात जडपणा, मळमळ, उलट्या, जुलाब यासारख्या समस्यांची तक्रार करत असतात. कधीकधी जड अन्नपदार्थ खाल्ल्याने किंवा खाल्ल्यानंतर लगेच झोपल्याने किंवा बसल्याने पोट फुगू लागते. तर या समस्यापासून मुक्त होण्यासाठी कोणते घरगुती उपाय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात, जे थोड्याच वेळात आराम देतात.

अन्न पूर्णपणे पचण्यासाठी आणि शरीराला पूर्ण फायदा मिळण्यासाठी जेवणानंतर 15 ते 20 मिनिटे चालणे किंवा वज्रासनात बसणे महत्वाचे आहे. जेवण आणि झोपण्याच्या वेळेत दीड ते दोन तासांचे अंतर असले पाहिजे. यामुळे तुमचे वजन देखील नियंत्रणात राहते. अशातच आजच्या या लेखात आपण आणखीन अशा 5 उपायांबद्दल किंवा नैसर्गिक गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत जे तुमचे अन्नपदार्थ पचवण्यास मदत करतात.

बडीशेप आहे सर्वोत्तम

जेवणानंतर एक चमचा बडीशेप चावून खावी. बडीशेप हे अन्न पचवण्यासाठी एक उत्कृष्ट नैसर्गिक घटक आहे. त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि म्हणूनच जेवणानंतर बडीशेप चावून खाण्याची परंपरा आपल्या देशात फार पूर्वीपासून आहे.

मेथीपासून मिळेल आराम

मेथीचे दाणे प्रत्येक घरांमध्ये स्वयंपाकात वापरले जातात. तर या मेथीच्या दाण्याची थोडीशी पावडर कोमट पाण्यासोबत घेतल्याने पोटदुखी, जडपणा, पोट फुगणे, पेटके येणे इत्यादी समस्यांपासून थोड्याच वेळात आराम मिळतो.

हिंग आहे फायदेशीर

गॅसपासून ते पोटात जडपणा, पोट फुगणे यासारख्या समस्या दूर करण्यासाठीही हिंग खूप फायदेशीर आहे. तर तुम्हाला पोटाच्या समस्यांचा त्रास होत असेल तर अशावेळेस दोन चिमूटभर हिंग घ्या आणि त्यात तीन-चार थेंब कोमट पाणी घाला आणि लहान मुलाच्या पोटावर, विशेषतः नाभीवर लावा, पोटदुखीपासून आराम मिळतो. मोठया व्यक्तींनी कोमट पाण्यासोबत थोडी हिंग घेऊ पिऊ शकतात, फक्त लक्षात ठेवा की जेव्हा तुम्हाला जुलाब होत असेल तेव्हा हिंग घेऊ नका, अन्यथा समस्या वाढू शकते.

आले देखील उपयुक्त

आले पोटफुगी कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. आले बारीक करून एक कप पाण्यात चांगले उकळा आणि नंतर ते गाळून घ्या आणि तयार आल्याचे पाणी कोमट झाल्यावर घोट घोट करून प्या. तुम्ही त्यात थोडा पुदिना देखील टाकू शकता.

ही रेसिपी तयार ठेवा

दोन चमचे ओवा, तेवढेच जिरे, एक चमचा मेथीचे दाणे, अर्धा चमचा हिंग चवीनुसार काळे मीठ टाकून यांची बारीक पावडर करून घ्या. ही पावडर हवाबंद डब्यात ठेवा. गॅस, अपचन, पोटफुगीच्या समस्या जाणवली की थोडी पावडर खाणे फायदेशीर ठरते.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)