Homemade Face Pack | झटपट तयार होणारा ‘हा’ घरगुती फेस पॅक चेहऱ्याला देईल इंस्टंट ग्लो!

| Updated on: Jan 25, 2021 | 4:22 PM

पुन्हा पुन्हा लोशन लावण्याचा हा त्रास टाळण्यासाठी आपण आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणाऱ्या दोन गोष्टी वापरु शकता.

Homemade Face Pack | झटपट तयार होणारा ‘हा’ घरगुती फेस पॅक चेहऱ्याला देईल इंस्टंट ग्लो!
फेस पॅक
Follow us on

मुंबई : असे बरेच लोक आहेत जे त्वचेवर क्रिम आणि लोशन लावणे हे एखादे कंटाळवाणे काम समजतात. सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरु आहे, थंडीचा कडाकाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत आपल्याला आपल्या त्वचेला सतत मॉइश्चरायझ करणे आवश्यक आहे. परंतु, जर आपल्याला त्वचेवर लोशन लावायला आवडत नसेल, तर आम्ही आपल्यासाठी एक खास होम मेड म्हणजेच घरगुती ‘फेस पॅक’ घेऊन आलो आहोत, ज्याचा वापर करून आपली त्वचा अधिक चमकदार बनवू शकता. शिवाय सतत लोशन किंवा क्रिम लावण्याच्या कांटाळवाण्या सवयीतूनही मुक्त व्हाल (Homemade Honey And Saffron face pack).

पुन्हा पुन्हा लोशन लावण्याचा हा त्रास टाळण्यासाठी आपण आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणाऱ्या दोन गोष्टी वापरु शकता. या दोन गोष्टी म्हणजे केशर आणि मध! या दोन्ही घटकांना समान प्रमाणात एकत्र मिसळल्याने केशराचे औषधी गुणधर्म मधात पूर्णपणे उतरतात.

यासाठी एक चमचा मध आणि केशराच्या चार कड्या घ्या. एका छोट्या भांड्यात मध घाला आणि त्यात केशराच्या काड्या घाला आणि बोटाच्या सहाय्याने सतत ढवळत राहा.

फेस पॅक तयार करण्यासाठी…

फक्त 5 ते 7 मिनिटांत केशर मधात चांगले मिसळेल. आता हे मिश्रण आपल्या चेहर्‍यावर आणि गळ्यावर चांगले लावा. कमीतकमी 20 मिनिटे हा फेस पॅक चेहऱ्यावर राहू द्या. तोपर्यंत, आपण इतर काही घरगुती काम देखील करू शकता.

किमान 20 मिनिटांनंतर पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुवा. चेहरा साफ केल्यानंतर काही दिवस फेसवॉश वापरू नका. मऊ सूती कपड्याने चेहरा स्वच्छ पुसून टाका. या फेस पॅकनंतर जर, आपण आपल्या चेहऱ्यावर गुलाबाचे पाणी लावले तर त्याचा खूप चांगला फायदा चेहऱ्यावर दिसून येईल. यामुळे त्वचेचा पोत सुधारेल आणि ती घट्ट होईल (Homemade Honey And Saffron face pack).

‘फेस पॅक’चे फायदे :

केशरमध्ये व्हिटामिन ए भरपूर प्रमाणात आढळतो. ज्यामुळे त्वचा ताण मुक्त राहते. केशरच्या या काड्यांमध्ये बरेच औषधी गुणधर्म आहेत. व्हिटामिन ए व्यतिरिक्त व्हिटामिन सी, पोटॅशियम आणि कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणात आढळतात.

या ‘फेस पॅक’च्या वापरामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि अकाली वृद्धत्वाच्या इतर खुणा नाहीशा होतात. केशर त्वचेला नैसर्गिक उजळपणा देतो. तर, मध त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करतो. मध हा एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. जो क्रिम किंवा लोशनप्रमाणे त्वचेला सहज मॉइश्चरायझ करू शकतो.

(टीप : कोणत्याही कृतीपूर्वी सौंदर्य तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)

(Homemade Honey And Saffron face pack)

हेही वाचा :