त्वचेसाठी सर्वोत्तम! घरच्या घरी बनवता येणारं ‘हे’ मॉइश्चरायझर

| Updated on: May 25, 2023 | 3:16 PM

आज आम्ही तुमच्यासाठी मधाचे मॉइश्चरायझर म्हणजेच हनी मॉइश्चरायझर बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. हे मॉइश्चरायझर ग्लिसरीनच्या मदतीने तयार केले जाते. याच्या वापराने चेहऱ्यावरील घाण दूर होण्यास मदत होते. यामुळे तुमची त्वचा गोरी, मुलायम आणि चमकदार बनते, तर चला जाणून घेऊया हनी मॉइश्चरायझर कसे बनवायचे.

त्वचेसाठी सर्वोत्तम! घरच्या घरी बनवता येणारं हे मॉइश्चरायझर
Mosturizer
Follow us on

मुंबई: मध एक नैसर्गिक स्वीटनर आहे जे जीवनसत्त्वे, अमीनो आम्ल, प्रथिने आणि खनिजे यासारख्या गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्यामुळे हे आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी फायदेशीर आहे. आज आम्ही तुमच्यासाठी मधाचे मॉइश्चरायझर म्हणजेच हनी मॉइश्चरायझर बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. हे मॉइश्चरायझर ग्लिसरीनच्या मदतीने तयार केले जाते. याच्या वापराने चेहऱ्यावरील घाण दूर होण्यास मदत होते. यामुळे तुमची त्वचा गोरी, मुलायम आणि चमकदार बनते, तर चला जाणून घेऊया हनी मॉइश्चरायझर कसे बनवायचे.

हनी मॉइश्चरायझर तयार करण्यासाठी साहित्य

  • 1 चमचा मध
  • 5-6 थेंब ग्लिसरीन
  • 1 ग्रीन टी बॅग
  • 1/2 चमचा लिंबाचा रस

हनी मॉइश्चरायझर कसे बनवावे?

  • मध मॉइश्चरायझर बनविण्यासाठी प्रथम एक वाटी घ्या.
  • मग तुम्ही त्यात ग्लिसरीन घाला
  • त्यानंतर त्यात ग्रीन टी चे पाणी आणि लिंबाचा रस घाला.
  • मग तुम्ही या सर्व गोष्टी नीट मिसळून क्रीमी पेस्ट तयार करा.
  • यानंतर तयार केलेली पेस्ट काचेच्या डब्यात भरून ठेवा.
  • आता तुमचे मध मॉइश्चरायझर तयार आहे.
  • चांगल्या रिझल्टसाठी तुम्ही रोज रात्री हे क्रीम लावून झोपू शकता.
  • यामुळे तुमच्या कोरड्या त्वचेची समस्या दूर होते.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)