AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Local Body Election Results 2025 : महायुती की महाविकास आघाडी? नगरपालिकांच्या निकालांनी राजकारण तापले; पाहा तुमच्या शहरात कोण जिंकले?

महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपरिषदांचे निकाल जाहीर होत आहेत. परतूरमध्ये भाजपची आघाडी तर मुक्ताईनगरमध्ये शिंदे गटाच्या संजना पाटील यांनी बाजी मारली आहे. वाचा सविस्तर निकाल

Maharashtra Local Body Election Results 2025 : महायुती की महाविकास आघाडी? नगरपालिकांच्या निकालांनी राजकारण तापले; पाहा तुमच्या शहरात कोण जिंकले?
mahayuti maha vikas aghadi
| Updated on: Dec 21, 2025 | 12:34 PM
Share

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सध्या नगरपालिका आणि नगरपरिषदांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. या निकालांमुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याचे दिसत आहे. आज सकाळी १० वाजल्यापासून सुरू झालेल्या मतमोजणीत सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. सध्या सातारा, जळगाव, नाशिक आणि बीड यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये मतदारांनी कुणाला कौल दिला, याची माहिती समोर आली आहे. यावेळी अनेक ठिकाणी बड्या नेत्यांना धक्के बसले असून काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे.

पुणे व नाशिक विभागात महायुती आघाडीवर

सासवडमध्ये भाजपने आपले स्थान बळकट केले आहे. प्रभाग २ आणि ९ मध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले असून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आनंदी जगताप यांनी पहिल्या फेरीपासूनच आपली आघाडी कायम ठेवली आहे.

तर नाशिकच्या सिन्नरमध्ये अजित पवार गटाचे विठ्ठलराजे उगले १०९८ मतांच्या आघाडीसह विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यासोबतच नांदगावमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. पहिल्या फेरीअखेर शिंदे गटाचे सागर हिरे (३४३६ मते) हे राजेश बनकर (१८१७ मते) यांच्यापेक्षा मोठ्या फरकाने पुढे आहेत.

मराठवाड्याचा कौल कोणाला?

जालनाच्या परतूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा येथे निर्णायक ठरताना दिसत आहे. भाजपच्या प्रियांका राक्षे १३०० मतांनी आघाडीवर असून भाजपचे तीन नगरसेवक विजयी झाले आहेत. येथे शरद पवार गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

तसेच बीड जिल्ह्यात भाजपने सहापैकी चार ठिकाणी आपली पकड मजबूत केली आहे. मात्र, माजलगावमध्ये शरद पवार गटाने मुसंडी मारली आहे. अंबाजोगाईत स्थानिक आघाडीच्या माध्यमातून लढणारे अजित पवार गटाचे राजकिशोर मोदी आघाडीवर आहेत. धरणगाव येथे शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या शहर विकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. लीलाबाई चौधरी ७५० मतांनी आघाडीवर आहेत.

त्यसोबतच आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील (शिंदे गट) यांनी भाजपच्या उमेदवार भावना महाजन यांना पिछाडीवर टाकले आहे. तर गोंदियामध्ये काँग्रेसचे सचिन सेंडे ३२०० मतांनी आघाडीवर असून त्यांनी भाजपच्या कशिश जयस्वाल यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. तसेच चंद्रपूरमध्ये गडचांदूरमध्ये येथे अत्यंत चुरशीची परिस्थिती असून टपाली मतदानामध्ये काँग्रेसचे सचिन भोयर आणि भाजप बंडखोर निलेश ताजने यांना समसमान मते पडल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

शंकरराव गडाखांना धक्का

तसेच राहाता नगरपालिकेत विखेंचा डंका पाहायला मिळत आहे. भाजपचे नगराध्यक्ष पदी डॉ.स्वाधीन गाडेकर विजयी झाल्या आहेत. या ठिकाणी महायुती 20 पैकी 19 जागेवर विजयी झाली आहे. तर स्थानिक आघाडीला एकमेव जागा मिळाली आहे. त्यासोबतच नेवासा नगरपंचायतीत महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे डॉ.करणसिंह घुले विजयी झाले आहेत. माजी मंत्री शंकरराव गडाखांना धक्का बसला आहे. नगरसेवक पदाचे 10 उमेदवार विजयी झाले आहे. मात्र त्यांनी नगराध्यक्ष पद गमावले आहे.

शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांना मोठा धक्का, जळगावात मविआचा विजय
शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांना मोठा धक्का, जळगावात मविआचा विजय.
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.