AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अलिबागमध्ये भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गटाचा धुव्वा… कुणी मारली बाजी? आकडेवारीने सर्वच चक्रावले

अलिबाग नगर परिषद निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गटाला मोठा धक्का बसला आहे. शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) येथे दणदणीत विजय मिळवला असून नगराध्यक्ष पदही जिंकले आहे. राज्यात महायुतीला यश मिळत असताना, अलिबागकरांनी मात्र स्थानिक शेकापलाच कौल दिला.

अलिबागमध्ये भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गटाचा धुव्वा... कुणी मारली बाजी? आकडेवारीने सर्वच चक्रावले
अलिबागमध्ये कुणी मारली बाजी ?Image Credit source: social media
| Updated on: Dec 21, 2025 | 12:17 PM
Share

संपूर्ण राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीत महायुती सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. तसेच महायुतीनेच सर्वाधिक जागाही जिंकल्या आहेत. या तुलनेत महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स अत्यंत पुअर राहिला आहे. त्यातल्या त्यात काँग्रेसला या निवडणुकीत घवघवीत यश मिळताना दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात काँग्रेसची पाळंमुळं अजूनही खोलवर असल्याचं दिसत आहे. राज्यात सर्वत्र भाजपचा दबदबा राहिलेला असतानाच अलिबागमध्ये मात्र, भाजपला विजयासाठी संघर्ष करावा लागत असल्याचं चित्र दिसत आहे. अलिबागकरांनी भाजप, शिंदे गट, अजितदादा गटाला सपशेल नाकारलेलं दिसत आहे. या ठिकाणी अलिबागकरांनी शेतकरी कामगार पक्ष म्हणजे शेकापला भरभरून यश दिल्याचं चित्र आहे.

अलिबागमध्ये मोठी लढत होती. या निवडणुकीत कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. तसेच राज्यात सर्वच निवडणुकीत भाजपचा बोलबाला राहिला आहे. त्यामुळे अलिबागमधील शेकापच्या वर्चस्वाला भाजप धक्का देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. शेकापच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी भाजपने प्रचंड मेहनतही घेतली. पण मतदारांनी पारंपारिक आणि स्थानिक पक्षालाचा प्राधान्या देण्याचं ठरवल्याचं दिसत आहे.

नगराध्यक्षही शेकापचाच ? 

अलिबागमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये शेकापला 17 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर ठाकरे गटाने दोन आणि भाजपने एका जागेवर आघाडी घेतली आहे. अजितदादा गट, शिंदे गट आणि शरद पवार गटाला अलिबागमध्ये खातंही खोलता आलेलं नाही. तर शेकाप पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षया नाईक या 6 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे अलिबागमध्ये शेकापचाच नगराध्यक्ष होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

उरणमध्ये काय घडतंय ?

दरम्यान, उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शरद पवार गटाच्या उमेदवार भावना घाणेकर विजयी झाल्या आहेत. त्यामुळे पवार गटासाठी ही मोठी आनंदाची बातमी मानली जात आहे. रायगड जिल्ह्यातही अजितदादा गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी रायगडचा किल्ला एक हाती राखला आहे. रायगडवर निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर आता शिंदे गटाकडून रायगडच्या पालकमंत्रीपदावर पुन्हा एकदा दावा केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.