AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Local Body Election 2025: कोल्हापुरात आमदार अशोकराव मानेंचा मोठा पराभव! मुलगा, सून अन् पुतण्याला सुद्धा हाणून पाडलं

Watch LIVE Vote Counting of Maharashtra Local Body Election Results 2025 : आज राज्यात नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. कोल्हापूरमध्ये आमदार अशोकराव मानेंना मोठा धक्का बसला आहे. जाणून घ्या कोल्हापूरमधील निकालाविषयी...

Maharashtra Local Body Election 2025: कोल्हापुरात आमदार अशोकराव मानेंचा मोठा पराभव! मुलगा, सून अन् पुतण्याला सुद्धा हाणून पाडलं
kolhapurImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 21, 2025 | 12:39 PM
Share

आज 21 डिसेंबर रोजी राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. राज्यात महायुतीच्या 213 जागा निवडून आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील धक्कादायक निकाल समोर आला आहे. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील आमदार अशोक माने यांना मोठा झटका बसला आहे. मतदारांनी अशोकरावांची घराणेशाही अक्षरश: हाणून पाडली आहे. त्यांचा मुलगा, सून आणि पुतण्या यांचा दारुण पराभव झाला आहे.

मुलगा, सून अन् पुतण्याला सुद्धा हाणून पाडलं

कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत निवडणुकीमध्ये धक्कादायक निकाल समोर आला आहे. अशोकरावांना होम ग्राऊंडवर मोठा धक्का बसला आहे. अशोकराव माने यांची सून सारिका अरविंद माने यांचा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये मोठा पराभव झाला आहे. तसेच नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये मुलगा अरविंद अशोकराव माने यांचा सुद्धा दारुण पराभव झाला. इतकेच नव्हे तर त्यांच्या पुतण्याला सुद्धा मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे. एक प्रकारे अशोकराव यांची घराणेशाही हद्दपार करून टाकल्याचे चित्र दिसत आहे. शिरोळ नगरपालिकेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची सत्ता संपुष्टात आली आहे. 15 नगरसेवक आणि नगराध्यक्ष विजयी झाला आहे.

शिवसेना शिंदे आघाडीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लक्षणीय यश मिळवला आहे. जयसिंगपूर, शिरोळ, मुरगूड आणि कुरुंदवाड अशा चार ठिकाणी शिंदे गटाने नगराध्यक्षपदाचा विजय खेचून आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला कागल आणि गडहिंग्लमध्ये अपेक्षित यश मिळाले आहे. मुरगुड नगरपालिकेमध्ये मतदारांनी हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्या आघाडीला नाकारत शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. या ठिकाणी सुहासिनीदेवी पाटील या विजयी झाल्या आहेत. दुसरीकडे कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मोठी पिछेहाट झाली असून एकाही जागेवरती विजय मिळवू शकलेली नाही. अशीच सेम परिस्थिती कोल्हापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाची झाली आहे. काँग्रेस सुद्धा अवघ्या दोन ठिकाणी पेठवडगाव आणि शिरोळमध्ये विजय मिळाला आहे.

कोल्हापूरमधील निकाल

जिल्ह्यातील नगराध्य एकूण जागा : 13

शिवसेना शिंदे : 4 ( जयसिंगपूर, शिरोळ, मुरगूड आणि कुरुंदवाड)

राष्ट्रवादी : 2 ( गडहिंग्लज, कागल)

काँग्रेस : 2 ( पेठवडगाव, शिरोळ)

शिवसेना UBT- 0

राष्ट्रवादी SP- 0

मनसे – 0

जनसुराज्य – 2 ( पन्हाळा, मलकापूर)

इतर स्थानिक आघाडी

भाजप : 3 ( चंदगड, हुपरी, भाजप )

देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.
पंकजा मुंडे यांना मोठा झटका, बीड धारुरमध्ये भाजपचे सर्व उमेदवार हरले
पंकजा मुंडे यांना मोठा झटका, बीड धारुरमध्ये भाजपचे सर्व उमेदवार हरले.
30 वर्षांचा वनवास संपला अन् विकास कामांचा... सरोज अहिरेंची प्रतिक्रिया
30 वर्षांचा वनवास संपला अन् विकास कामांचा... सरोज अहिरेंची प्रतिक्रिया.
शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांना मोठा धक्का, जळगावात मविआचा विजय
शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांना मोठा धक्का, जळगावात मविआचा विजय.
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.