Maharashtra Local Body Election Results 2025 Updates : नगर परिषद, नगर पंचायत निकाल, पहिल्या तासाभरातील 10 महत्वाच्या अपडेट्स
Maharashtra Local Body Election Results 2025 Updates : महाराष्ट्रात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. पहिल्या तासाभरातील 10 महत्वाच्या अपडेट्स जाणून घ्या. कुठल्या भागात कुठल्या दिग्गज नेत्याला धक्का बसला आहे. कोण पुढे, कोण मागे जाणून घ्या.

महाराष्ट्रात 242 नगर परिषदा आणि 46 नगर पंचयातींचे निकाल जाहीर होत आहेत. 2 डिसेंबर आणि काल 20 डिसेंबरला या निवडणुकींसाठी मतदान पार पडलं होतं. आज मतमोजणी सुरु आहे. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या निवडणुकांच्या मतमोजणीचे आतापर्यंतचे कल काय आहेत? मतदारांनी कोणावर सर्वात जास्त विश्वास दाखवलाय? महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये कोण पुढे, कोण मागे आतापर्यंतचे निवडणूक निकालांच्या महत्वाच्या अपडेट्समधून जाणून घ्या.
1 जळगाव जिल्ह्यात 16 नगरपरिषदा व दोन नगरपंचायतीसाठी आज मतमोजणी पार पडत आहे. जळगाव जिल्ह्यात 25 नगरसेवक व एक नगराध्यक्ष बिनविरोध झाले आहेत. बिनविरोध झालेल्या नगरसेवकांमध्ये भाजपचे नगरसेवक . शिवसेना शिंदे गटाचे 3 नगरसेवक, काँग्रेस 1, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आहे 1 व इतर 2 आहेत.
2 सोलापूर जिह्यातील अक्कलकोट तालुक्यातील दुधनी नगर परिषदेच्या स्ट्राँग रूमची चावी हरवली. स्ट्राँ रूमची चावी हरवल्याने स्ट्राँ रूमचे कुलूप तोडण्यात आले. चावी हरवल्यामुळे अद्याप मतमोजणीला सुरुवात नाही.
3 चाळीसगाव येथे टपाली मतमोजणीत भाजपाच्या उमेदवार प्रतिभा चव्हाण आघाडीवर. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण टपाली मतदानात आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
4 भोकरदन नगरपालिकेत पहिल्या फेरीमध्ये शरद पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या समरीन मिर्झा आघाडीवर. समरीन मिर्झा(शरद पवार )2445. आशाताई माळी(bjp) 2083. प्रियंका देशमुख काँग्रेस 1524. शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार समरीन मिर्झा 362 मतांनी पुढे.
5 इगतपुरी, पहिल्या फेरी अखेर शिवसेने शिंदे गटाच्या शालिनी खातळे 2000 मतांनी आघाडीवर
6 परतूर नगरपालिका, भाजपच्या प्रियांका राक्षे 1300 मताच्या आघाडीवर, प्रियंका राक्षे यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परतुर मध्ये सभा घेतली होती. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शांताबाई हिवाळे पिछाडीवर. भाजपचे तीन नगरसेवक विजयी. शरद पवार गटाचे एक नगरसेवक विजयी.
7 तळेगाव नगरपरिषद (भाजप+अजित पवार राष्ट्रवादी) युतीचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे 1989 मतांनी आघाडीवर.
8 राहुरी नगरपालिका – नगराध्यक्ष पदाचे शहर आघाडीचे बाबासाहेब आघाडीवर. नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार सुनील पवार पिछाडीवर.
9 बीड मध्ये 6 पैकी चार ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. माजलगाव मध्ये शरद पवार गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत तर अंबाजोगाई येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्थानिक आघाडीतून लढत असलेले राजकिशोर मोदी आघाडीवर आहेत.
10 मुक्ताईनगर, जळगाव टपाल मतदानामध्ये मुक्ताईनगर येथे शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार संजना पाटील आघाडीवर. भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भावना ललित महाजन पिछाडीवर. संजना पाटील या शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या आहेत.
