Party Wise Local Body Election Results LIVE : महायुती vs महाविकास आघाडी, नगर परिषद, नगर पंचायतींचे निकाल पहा एका क्लिकवर
Party Wise Maharashtra Local Body Election Results 2025 LIVE : महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. सगळ्या महाराष्ट्राच लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. टीव्ही 9 मराठीच्या माध्यमातून एका क्लिकवर तुम्ही हे निकाल पाहा.

महाराष्ट्रात आज सर्वच ठिकाणी नगर परिषदा आणि नगर पंचायत निवडणूक निकालाची उत्सुक्ता आहे. 242 नगर परिषदा आणि 46 नगर पंचयातींचे निकाल जाहीर होत आहेत. महाराष्ट्रात मागच्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या निवडणुका घेण्यात आल्या. राज्यात 2 डिसेंबर 2025 रोजी नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं होतं. पण 23 नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. अखेर 20 डिसेंबर म्हणजे काल 23 नगरपालिकांसाठी मतदान पार पडलं. अखेर आज या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहे. तुम्ही टीव्ही 9 मराठीच्या माध्यमातून पक्ष आणि आघाडी निहाय निकाल पाहू शकता.
नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीत अनेक समीकरणं आकाराला येतात. राज्यात, केंद्रातले मित्र पक्ष स्थानिक पातळीवर परस्परांविरोधात निवडणुका लढवताना दिसतात. अनेकांसाठी हे चित्र आश्चर्यकारक असतं. पण स्थानिक पातळीवरील समीकरणांनुसार हे निर्णय घेतले जातात. सध्याच्या नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीमध्येच आपसात काटे की टक्कर आहे. खरंतर हा सामना महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा असला पाहिजे. पण तुलनेने विरोधी पक्ष महाविकास आघाडी कमकुवत आहे. त्यामुळे महायुतीमधल्या शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच चुरशीचा सामना होऊ शकतो.
Party/Alliance Wise Maharashtra Local Body Election Results LIVE
महायुती 150 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर
महाराष्ट्रात मतमोजणी सुरु झाली आहे. प्रारंभिक कल आहेत, त्यानुसार भाजपने मोठी आघाडी घेतल्याचं चित्र आहे. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आगे. महायुती 150 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. महाविकास आघाडीत तुलनेने काँग्रेसचं थोडं चांगलं प्रदर्शन दिसून येतय. स्थानिक स्वराज्य संस्था सर्वच पक्षांसाठी महत्वाच्या आहेत. कारण स्थानिक स्वराज्य संस्था या पक्ष विस्तारासाठी आणि भविष्यातील नेते घडवण्याच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. काही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढवली आहे. तर बहुतांश ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणुका लढवत आहेत.
