All Out किंवा Good Knight वापरताय? जाणून घ्या महिन्याभराचा वीजबिलाचा हिशोब!

अनेक घरांमध्ये All Out किंवा Good Knight सारख्या मॉस्किटो किलर मशीनचा वापर होतो आणि मग मनात एक प्रश्न येतो तो म्हणजे "ही मशीन दररोज चालवली, तर वीजबिल किती येईल?" जर तुम्हालाही याचं उत्तर हवं असेल, तर हा आर्टीकल संपूर्ण नक्की वाचा.

All Out किंवा Good Knight वापरताय? जाणून घ्या महिन्याभराचा वीजबिलाचा हिशोब!
| Edited By: | Updated on: Jun 29, 2025 | 1:44 PM

उकाड्याच्या दिवसांत आणि पावसाळ्यात मच्छरांचा उपद्रव वाढतो. अशा वेळी All Out किंवा Good Knight सारख्या मॉस्किटो किलर मशीनचा वापर करणे सर्वसामान्य गोष्ट बनली आहे. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की ही लहानशी डिव्हाईस महिनाभर चालवली, तर तुमच्या वीजबिलावर किती भार टाकते?

आपल्याला वाटतं की एखादी वस्तू रोज वापरत असलो, तर ती वीज बिल वाढवणारच. पण All Out, Good Knight सारख्या मॉस्किटो मशीनबाबत हे पूर्णपणे खरे नाही. चला, पाहूया याचा साधा आणि नेमका वीजबिल हिशोब.

ही मॉस्किटो मशीन नेमकी कशी काम करते?

Good Knight किंवा All Out यांसारख्या मॉस्किटो रिपेलंट मशीनमध्ये लिक्विड वेपोरायझर किंवा हीटिंग मॅट असतात. या मशीन प्लगमध्ये लावून चालवतात. मशीन ऑन केल्यावर ती थोडीशी गरम होते आणि केमिकल हवेत सोडते, ज्यामुळे मच्छर पळून जातात. मात्र, या उष्णतेसाठी लागणारी वीज अतिशय कमी असते.

किती वीज खर्च होते?

या मशीनची सरासरी पॉवर रेटिंग फक्त 5 वॅट असते. जर तुम्ही ती दररोज 10 तास चालवलीत, तर:

  •  दैनंदिन वीज वापर: 5W x 10 तास = 50 वॅट-तास
  • महिनाभराचा वापर (30 दिवस): 50 x 30 = 1,500 वॅट-तास = 1.5 युनिट (kWh)

आता, भारतात घरगुती वीज दर प्रति युनिट 6 ते 8 रुपये इतका असतो. त्यामुळे 6 रुपये x 1.5 युनिट = ₹9 किंवा 8 रुपये x 1.5 युनिट = ₹12 रुपये येतो. म्हणजेच मासिक खर्च फक्त ₹9 ते ₹12 एवढाच होतो!

म्हणजे किती किफायतशीर?

तुम्ही महिनाभर दररोज 10 तास ही मशीन वापरली, तरी तुमच्या वीजबिलावर कप चहा इतकाच खर्च होतो. ही एक एनर्जी-एफिशिएंट आणि सुरक्षित डिव्हाईस आहे. त्यामुळे कोणताही आर्थिक ताण न घेता तुम्ही मच्छरांपासून संरक्षण मिळवू शकता.

काही गोष्टी लक्षात ठेवा

  •  ही मशीन नियमितपणे चालू ठेवायला हरकत नाही. मात्र, रिफिल वेळेवर बदलणं गरजेचं आहे, नाहीतर प्रभाव कमी होऊ शकतो.
  • मशीन नेहमी प्लगमधून व्यवस्थित फिट असावी आणि वापरानंतर बंद करावी, यामुळे अधिक सुरक्षितता मिळते.

All Out किंवा Good Knight मशीन सतत वापरल्याने वीजबिलात फारसा फरक पडत नाही. उलट, ही मशीन तुम्हाला मच्छरांपासून वाचवते आणि तेही अतिशय कमी खर्चात. त्यामुळे तुम्ही जर मच्छर-प्रभावित भागात राहत असाल, तर ही मशीन दैनिक वापरासाठी योग्य आणि सुरक्षित पर्याय आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)