AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Election News LIVE : हिंगोली – ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

| Edited By: | Updated on: Feb 02, 2026 | 9:33 PM
Share

Live Updates in Marathi : अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पहिला शासकीय दौरा पार पडला आहे. तर, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत येणार असल्याची माहिती समोर येत आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

Maharashtra Election News LIVE : हिंगोली – ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेल्यानंतर सुनेत्रा पवारांचा पहिलाच शासकीय दौरा पार पडला. सुनेत्रा पवार आज सातारा दौऱ्यावर 10 वाजता कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी दर्शन घेणार आहेत. त्यानंतर फलटण तालुक्यातील तरडगाव येथे जात अजित दादाचे सुरक्षारक्षक स्वर्गीय विदीप जाधव यांच्या घरी सांत्वनपर भेट देणार आहेत. तर, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत येणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 3 तर शरद पवार गटाचा 1 नगरसेवक शिंदे सेनेत सहभागी होऊन एकच गट स्थापन करणार आहे. आता शिंदे सेनेच्या गटाची संख्या 29 वरून 33 वर तर महायुतीचं एकत्रित संख्याबळ 122 पर्यंत पोहचणार आहे. अमेय घोले यांची शिवसेनेची गट नेते पदी निवड होणार असल्याची माहिती समोर येत आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांचा पवित्र अस्थिकलश आज व उद्या वाशिम जिल्ह्यात दाखल होत आहे. 2 व 3 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 Feb 2026 08:48 PM (IST)

    वसई विरार : महापौर निवडीसाठी प्रशासन सज्ज

    वसई विरार महापालिकेत उद्या होणाऱ्या महापौर उपमहापौर निवडीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त दिपक सावंत, नगरसचिव विश्वनाथ तळेकर, नगर अभियंता प्रदीप पाचंगे यांनी आज महासभा सभागृह, महापौर, उपमहापौर दालन यांची सर्व पाहणी करून सर्व तयारी केली आहे. महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात उद्या दुपारी 1 वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरवात होणार आहे.

  • 02 Feb 2026 08:30 PM (IST)

    हिंगोली – ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

    ऊस उत्पादक शेतकऱ्यां सह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी वसमत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले . ऊसाला वाढीव दर द्या ,चालू हंगामात उसाला पहिली उचल प्रति टनाप्रमाणे 3600 रुपये द्या अशा विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

  • 02 Feb 2026 08:09 PM (IST)

    लोणावळा : ट्रेकसाठी आलेल्या एका 19 वर्षीय तरुणीचा ड्युक्स नोज परिसरात अपघाती मृत्यू

    लोणावळ्याच्या टायगर पॉईंट दरीत सुन्न करणारी घटना घडली आहे. मुंबईहून ट्रेकसाठी आलेल्या एका १९ वर्षीय तरुणीचा ड्युक्स नोज परिसरात अपघाती मृत्यू झाला आहे. ड्रोन, डॉग स्क्वॉड आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांनंतर 390 फूट खोल दरीतून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. श्रेया पती असे या तरुणीचे नाव आहे.

  • 02 Feb 2026 06:52 PM (IST)

    क्रीडा महाकुंभ 13 फेब्रुवारीपासून दिल्लीत सुरू होईल

    खेल महाकुंभ 13 फेब्रुवारी रोजी दिल्लीत सुरू होईल. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता त्याचे उद्घाटन करतील. सुमारे 20 हजार खेळाडू सात खेळांमध्ये सहभागी होतील.

  • 02 Feb 2026 06:40 PM (IST)

    विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवार निर्णय घेतील- भुजबळ

    विलिनीकरणाबाबत अजितदादांनी आम्हाला काही सांगितलं नव्हतं. बारामतीच्या कृषी प्रदर्शनाबाबत चर्चा झाली, हे दादा म्हणाले होते. त्यामुळे विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवार काय तो निर्णय घेतील. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने बोलत आहे, असं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. त्यामुळे माझं नाव यात घेऊ नका आणि आमच्या कलगीतुरा लावू नका, असंही त्यांनी प्रसारमाध्यमांना बजावलं.

  • 02 Feb 2026 06:30 PM (IST)

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी बारामतीमधील सहयोग सोसायटीमध्ये मोठी गर्दी

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी बारामतीमधील सहयोग सोसायटीमध्ये मोठी गर्दी केली आहे. बारामतीसह राज्यभरातून सांत्वनपर भेटीसाठी कार्यकर्ते पदाधिकारी येत आहेत. दुपारीपासून सुनेत्रा पवार बारामतीमधील सहयोग सोसायटी येथे आहेत.

  • 02 Feb 2026 06:21 PM (IST)

    मीरा-भाईंदरमध्ये अमराठी महापौरांविरुद्ध उद्या मोर्चा

    ​अमराठी महापौराच्या नेमणुकीला विरोध करण्यासाठी उद्या मंगळवार, 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता भाईंदरच्या सुभाषचंद्र मैदानावर भव्य ‘मराठी मोर्चा’ निघणार आहे. महापौर पदासाठी भाजपाच्या डिंपल मेहता यांनी अर्ज दाखल केला आहे.

  • 02 Feb 2026 06:03 PM (IST)

    2027 च्या जातीय जनगणनेत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

    2027 च्या जनगणनेत नागरिकांच्या जातीशी संबंधित डेटाची नोंद, वर्गीकरण आणि पडताळणी करण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.

  • 02 Feb 2026 05:45 PM (IST)

    अजित पवारांच्या अस्थींचे नाशिकच्या रामकुंडावर केले जाणार विसर्जन

    स्वर्गीय अजित पवारांच्या अस्थींचे नाशिकच्या रामकुंडावर विसर्जन केले जाणार आहे. अस्थी विसर्जन करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, माणिकराव कोकाटे आणि इतर नेते उपस्थित असणार आहेत.

  • 02 Feb 2026 05:20 PM (IST)

    कात्रज दूध संघाला अजितदादा पवार नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय

    पुणे : कात्रज दूध संघाला अजितदादा पवार नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.  कात्रज दूध संघाने एकमताने हा निर्णय घेतला आहे.  यापुढे कात्रज दूध संघाटे नाव अजित दादा पवार दूध संघ असे असेल.

  • 02 Feb 2026 05:09 PM (IST)

    अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नगरमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन

    अहिल्यानगर : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह आजी-माजी आमदार या शोकसभेला उपस्थित होते.

  • 02 Feb 2026 05:02 PM (IST)

    मुंबईला महापौर केव्हा मिळणार? अखेर तारीख ठरली

    मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागून बरेच दिवस झालेत. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही महापौरपदाचा तिढा कायम आहे. त्यामुळे मुंबईला महापौर केव्हा मिळणार? असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. अशात आता महापौर निवडीचा दिवस ठरला आहे.

    येत्या 11 फेब्रुवारीला मुंबईला महापौर मिळणार आहे. महापौर पदासाठी 6 तारखेला ऊमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तर महापौर पदाच्या मतदानासाठी 11 फेब्रुवारी ही तारीख ठरली आहे.

  • 02 Feb 2026 04:57 PM (IST)

    कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार जाहीर, 6 जणांचा होणार सन्मान

    कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  रावसाहेब थोरात सभागृहात 10 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात होणार आहे. सन्मानचिन्ह आणि 21 हजार रुपये रोख, असं या पुरस्काराचं स्वरुप असणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सहा मान्यवरांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

    • सयाजी शिंदे(लोकसेवा)
    • डॉ अनिरुद्ध पंडित (विज्ञान)
    • चंद्रमोहन कुलकर्णी (चित्र)
    • उस्मान खान (संगीत)
    • प्रशांत दामले(नाट्य)
    • आशिष माने(साहस)

    वरील 6 मान्यवरांना ‘गोदावरी गौरव’ पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून हा पुरस्कार देण्याची परंपरा आहे.

  • 02 Feb 2026 04:44 PM (IST)

    दिलेला शब्द खरं करणं म्हणजे दादा, देवयानी फरांदे यांची प्रतिक्रिया

    अजित दादा याना श्रद्धांजली देण्याची वेळ येईल हे कधी वाटलं नव्हतं. दिलेला शब्द खरं करणं म्हणजे दादा, त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी दिली आहे. नाशिकमधील नवीन जिल्हा परिषद इमारतीला अजित दादाचं नाव द्यावं, अशी मागणीही यावेळेस फरांदे यांनी केली.

  • 02 Feb 2026 04:38 PM (IST)

    अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करावी, एकनाथ खडसेंची मागणी

    दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यात तथ्य असून विमान अपघातातला सहावा माणूस कोण तो कुठे गेला? असा प्रश्न राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत अनेक शंका उपस्थित होत असताना याप्रकरणी न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.

  • 02 Feb 2026 04:20 PM (IST)

    पिंपरी चिंचवडचा महापौर निश्चित, सलग 2 वेळ बिनविरोध नगरसेवक असलेल्या रवी लांडगेची वर्णी लागणार!

    पिंपरी चिंचवड महापौरपदी भाजपच्या रवी लांडगे यांची वर्णी लागणार हे निश्चित झालंय. रवी लांडगे सलग दोन वेळा बिनविरोध नगरसेवक झालेत. त्यामुळं ते महापौर पदाचे प्रबळ दावेदार होते. अपेक्षेनुसार प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी रवी लांडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. मात्र यानिमित्ताने शहराध्यक्ष शत्रुघ्न काटेंच्या तोंडाला पानं पुसली गेलीत. चिंचवडचे आमदार शंकर जगतापांनी त्यांचा काटा काढला अशी चर्चा शहरात रंगलेली आहे.

  • 02 Feb 2026 04:04 PM (IST)

    अजितदादांच्या निधनानंतर पाचव्या दिवशी अस्थी कलश जालन्यात दाखल

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. अपघाताच्या पाचव्या दिवशी दादांच्या अस्थीचा कलश जालन्यात दाखल झालाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयात हा अस्थी कलश ठेवण्यात आलाय. माजी मंत्री राजेश टोपे आणि दादा गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी अस्थिकलशांच दर्शन घेतलंय.

  • 02 Feb 2026 02:55 PM (IST)

    अजित पवारांच्या निधनानंतर पिंपरी चिंचवड महापौर निवडणूक, राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही

    उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर पार पडणाऱ्या पिंपरी चिंचवड महापौर निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाहीये. खरं तर दिवंगत अजित पवारांनी इथं भाजपला आव्हान दिलं होतं. मात्र ही निवडणूक पार पडली आणि त्यानंतर अजित पवारांचं अपघाती निधन झालं. हे पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर पदाची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलाय.त्यामुळं भाजपकडून महापौर पदासाठी ज्याचा अर्ज दाखल होईल.

  • 02 Feb 2026 02:45 PM (IST)

    हॉटेलमध्ये रुमबॉयचे काम करणाऱ्या तरूणाची आत्महत्या

    शिर्डी शहरातील हॉटेलमध्ये रुमबॉयचे काम करणा-या तरूणाने आत्महत्या केली आहे. हॉटेलच्या रुममध्येच गळफास लावून आत्महत्या केली. शिर्डी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. काल दुपारपासून हॉटेलच्या एका रुमचा दरवाजा आतुन बंद असल्याने हॉटेल व्यवस्थापनाला शंका आल्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली.

  • 02 Feb 2026 02:15 PM (IST)

    शिंदेंच्या सभेआधीच शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

    कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे होणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर प्रचार सभेआधीच शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या सभेसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी लावलेल्या बॅनरवरून पालकमंत्री संजय शिरसाट यांचा फोटो गायब असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

  • 02 Feb 2026 01:55 PM (IST)

    आम्ही देशभक्त नाही असं सत्ताधारी म्हणालेत – राहुल गांधी

    “आम्ही देशभक्त नाही असं सत्ताधारी म्हणालेत. केंद्र सरकारने नरवणेंचं पुस्तक प्रकाशित होऊ दिलं नाही” असा राहुल गांधी यांचा दावा. लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणावेळी सत्ताधाऱ्यांचा गदारोळ. राहुल गांधींचा मुद्दा चुकीचा असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

  • 02 Feb 2026 01:43 PM (IST)

    राहुल गांधींच्या भाषणानंतर लोकसभेत गदारोळ

    जनरल नरवणेंच पुस्तक प्रकाशित झालं नाही असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. राहुल गांधींच्या भाषणानंतर लोकसभेत गदारोळ. राहुल गांधींकडून नरवणेंच्या पुस्तकांचा संदर्भ देण्याचा प्रयत्न. चीनने भारताच्या हद्दीत चार तंबू ठोकल्याचा दावा.

  • 02 Feb 2026 01:29 PM (IST)

    अहिल्यानगर महानगरपालिका महापौर, उपमहापौराची निवड

    राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ज्योती गाडे महापौर तर भाजपचे धनंजय जाधव उपमहापौर पदाचे अर्ज दाखल करणार. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार युतीचे आहेत 68 पैकी 52 नगरसेवक. भाजप आणि राष्ट्रवादी AP युतीचे होणार महापौर उपमहापौर. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार संग्राम जगताप माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजप व राष्ट्रवादी नगरसेवकांची बैठक संपन्न.

  • 02 Feb 2026 01:19 PM (IST)

    मनसे उमेदवारांनी राज ठाकरेंकडे मांडल्या उद्धव सेनेच्या तक्रारी

    उद्धव ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्यासाठी काम केलं नाही. मनसे उमेदवारांच्या राज ठाकरेंकडे तक्रारी. स्थानिक स्तरावर आपण किती तयारी केली होती, राज ठाकरेंचा सवाल. जिथे आपली ताकद होती, ते वॉर्ड आपण जागा वाटपात घेतले नाहीत असं संदीप देशपांडे म्हणाले.

  • 02 Feb 2026 01:06 PM (IST)

    जे नेते या चर्चेला नव्हते, त्यांना या चर्चेबद्दल काय माहिती असणार? शरद पवार

    दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबद्दल भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, जे नेते या चर्चेला नव्हते, त्यांना या चर्चेबद्दल काय माहिती असणार?. शरद पवार यांनी शनिवारी दोन्ही राष्ट्रवादीचं 12 तारखेला विलिनीकरण होणारं होतं असं म्हटलं.

  • 02 Feb 2026 12:55 PM (IST)

    पुणे पोर्श अपघात प्रकरण – रक्ताचे नमुने बदलणाऱ्या तिघांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर…

    पुणे पोर्श अपघात प्रकरण –  आरोपीला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलणाऱ्या तिघांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.  पोर्शे अपघात प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून दहा आरोपींपैकी तिघांना जामीन, आदित्य सुड, आशिश मित्तल याच्यासह आणखी एका व्यक्तीस जामीन मिळाला आहे.

  • 02 Feb 2026 12:44 PM (IST)

    मनसेकडून मुंबईत भाजपला महापौरपदासाठी समर्थन ? संदीप देशपांडे काय म्हणाले ?

    मुंबईत महापौरपदासाठी मनसेकडून भाजपला समर्थन देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्प्ष्ट उत्तर दिलं. अशा प्रकारची कुठलीही चर्चा आमची भारतीय जनता पक्षाशी झालेली नाही. अशा प्रकारचं कुठलंही समर्थन देण्याचा विषय नाही – असं संदीप देशपांडे म्हणाले.

  • 02 Feb 2026 12:33 PM (IST)

    विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी सुनेत्रा पवार पोहोचल्या

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगाव येथे विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला पोहोचल्या. कुटुंबियांची सांत्वनपर घेणार भेट.

  • 02 Feb 2026 12:26 PM (IST)

    आज अमरावतीत भाजपचा महापौर पदाचा उमेदवार ठरणार

    आज अमरावतीत भाजपचा महापौर पदाचा उमेदवार ठरणार आहे.  भाजपचा महापौर पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी अमरावतीच्या एका हॉटेल मध्ये भाजपच्या कोअर कमिटीची व नगरसेवकांची बैठक सुरू आहे.

    बैठकीत पक्ष निरीक्षक आमदार संजय कुटे, भाजपचे संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर व भाजपचे शहर अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे उपस्थित आहेत.  काल अमरावती भाजप कोर कमिटी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात नागपूर येथे चर्चा झाली . महापौर पदासाठी मिलिंद बांबल,ऋषिकेश देशमुख व आशिष अतकरे या तिघांची नावे समोर आली आहेत.

  • 02 Feb 2026 12:15 PM (IST)

    बीड- विद्यार्थिनीने स्वतःच्याच अत्याचाराचा रचला बनाव

    बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत एका विद्यार्थिनीने स्वतःवर अत्याचार झाल्याचा बनाव केला. पोलीस तपासात हा बनाव उघड झाला आहे.  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीने चालत्या रिक्षामध्ये लैंगिक छेडछाड आणि अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची तक्रार 26 नोव्हेंबर 2025 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शहरात दाखल केली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता तो संपूर्ण प्रकार पिडीतेनेच रचल्याच उघड झालं.

  • 02 Feb 2026 12:05 PM (IST)

    सोलापूर – सोलापूर महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून विनायक कोंड्याल यांचा अर्ज दाखल

    सोलापूर महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून विनायक कोंड्याल तर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांचा अर्ज दाखल झाला आहे.   विनायक कोंड्याल हे भाजप आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी आहेत.  सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत विनायक कोंड्याल हे सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत. तर उपमहापौर पदासाठी पहिल्यांदाच निवडून आलेल्या ज्ञानेश्वरी देवकर यांना भाजपच्या वतीने संधी देण्यात आली आहे.

  • 02 Feb 2026 12:00 PM (IST)

    विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वादावर दिल्लीत होणार चर्चा

    चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात सुरू असलेला वाद आणि सत्ता स्थापनेबद्दल असलेला पेच यावर उद्या दिल्लीत चर्चा होणार आहे. काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी 12 नंतर दिल्लीत बैठक होणार आहे.या बैठकीत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, सुनील केदार आणि राज्याचे सहप्रभारी कुणाल चौधरी उपस्थित राहणार आहेत. नेत्यांमधील गटबाजी आणि त्याचा सत्ता स्थापनेवर होणारा परिणाम यावर चर्चा होणार आहे.

  • 02 Feb 2026 11:50 AM (IST)

    जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये विक्रमी घसरण

    जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये विक्रमी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 9 हजार 800 रुपये तर चांदीच्या दरात तब्बल 53 हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 53 हजार 470 रुपये तर चांदीचे दर 2 लाख 57 हजार 500 रुपयांवर आले आहेत. दोन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचलेले सोन्याचे दर पुन्हा दीड लाखांवर तर चार लाखांचा आकडा पार करणाऱ्या चांदीचे दर देखील अडीच लाखांवर आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

  • 02 Feb 2026 11:40 AM (IST)

    अखेर भाजपचा गटनेता ठरला असून गणेश खणकर यांची वर्णी

    अखेर भाजपचा गटनेता ठरला असून गणेश खणकर यांची गटनेतेपदी वर्णी लागली आहे. गणेश खणकर हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपात सक्रिय आहेत.

  • 02 Feb 2026 11:30 AM (IST)

    नाशिकमधील गिरीश महाजन यांच्या वक्तव्यानंतर सेना-भाजप एकत्र येण्याबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

    नाशिकमधील गिरीश महाजन यांच्या वक्तव्यानंतर सेना-भाजप एकत्र येण्याबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आम्हाला कोणाच्या कुबड्यांची आवश्यकता नसल्याचं गिरीश महाजन यांनी वक्तव्य केलं होतं. मात्र भाजपात समन्वय नसल्याचा सेनेचा आरोप आहे. भाजप शहराध्यक्ष एकीकडे सत्तेत येण्याचा प्रस्ताव देतात, तर दुसरीकडे महाजन अस स्टेटमेंट देतात. सत्तेत जायचं की विरोधात बसायचं हा निर्णय एकनाथ शिंदे घेतील, असा पलटवार शिवसेना गटनेते अजय बोरस्ते यांनी भाजपवर केला.

  • 02 Feb 2026 11:20 AM (IST)

    जळगावात अजित पवारांना श्रद्धांजली देण्यासाठी पार पडली सर्वपक्षीय शोकसभा

    जळगावातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहामध्ये अजित पवारांना श्रद्धांजली देण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभा पार पडली. शोकसभेत अमळनेरच्या पाडळसे इथल्या निम्न तापी प्रकल्पाला ‘दिवंगत अजित पवार निम्न तापी प्रकल्प’ असं नाव देण्याची आमदार अनिल पाटलांनी मागणी केली. आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणात माहिती दिली. या शोकसभेत राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.

  • 02 Feb 2026 11:10 AM (IST)

    अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात

    अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी मलंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रेन सुरू झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दर तासाला 1200 भाविक या फ्युनिक्युलने प्रवास करत आहेत. 2 ते 3 तासांचा पायी प्रवास आता अवघ्या दहा मिनिटांवर येऊन पोहोचला आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडाच्या मुक्तीसाठी आज माघ पौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें हे मलंगगडावरील मत्स्येंद्रनाथांच्या समाधीवर आरती करणार आहेत.

  • 02 Feb 2026 10:55 AM (IST)

    अजित पवारांच्या निधनानंतर शिवसेनेचे नगरसेवक मनपा कार्यालयात दाखल, शक्तीप्रदर्शन न करता नोंदणी करणार

    शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी आज मुंबई महानगरपालिका कार्यालयात येण्यास सुरुवात केली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात दुःखाचे वातावरण असून, याचे पडसाद नगरसेवकांच्या भूमिकेतूनही उमटताना दिसत आहेत. “अजित पवार यांच्या निधनामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचे शक्ती प्रदर्शन करणार नाही, मात्र प्रशासकीय प्रक्रिया आणि काळाची गरज म्हणून आम्ही नाव नोंदणीसाठी जात आहोत,” अशी संयमी प्रतिक्रिया यावेळी नगरसेवकांनी माध्यमांशी बोलताना दिली.

  • 02 Feb 2026 10:45 AM (IST)

    प्रलंबित असलेली कामे आणि विकासाचा बॅकलॉग भरुन काढणार – अमेय घोले

    अमेय घोले यांनी यावेळी बोलताना पक्ष नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी पार पाडण्यास आपण तयार असल्याचे सांगितले. गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे आणि विकासाचा बॅकलॉग भरून काढत नागरिकांना दिलासा देण्याचे काम भविष्यात प्राधान्याने केले जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

  • 02 Feb 2026 10:35 AM (IST)

    अजित पवारांच्या जाण्याचे दुःख, पण काळाची गरज म्हणून नोंदणी करणार – अमेय घोले

    शिवसेना (शिंदे गट) नेते अमेय घोले यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महत्त्वपूर्ण विधान केले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने (राजकीय घडामोडींच्या संदर्भात) आमच्यावरही दुःखाचे सावट असल्याचे सांगत, याच वातावरणात आम्हाला नाव नोंदणी करावी लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्हाला या गोष्टीचे दुःख आहे, मात्र काळाची गरज म्हणून आम्हाला नाव नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, असे अमेय घोले म्हणाले. साधारण सकाळी ११ वाजता सर्व नगरसेवक तीन बसेसद्वारे कोकण भवनकडे रवाना होणार आहेत.

  • 02 Feb 2026 10:25 AM (IST)

    पुणे मनपा १६५ नगरसेवकांपैकी केवळ १४ जण उच्चशिक्षित; ४५ सदस्य केवळ दहावीपर्यंतच शिकलेले

    विद्येचे माहेरघर आणि ‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ अशी जागतिक ओळख असलेल्या पुणे शहराचा कारभार पाहणाऱ्या नगरसेवकांच्या शैक्षणिक पात्रतेची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या १६५ नगरसेवकांपैकी केवळ ८ टक्के म्हणजेच १४ सदस्यांनी पदव्युत्तर पदवी (Post Graduation) पर्यंत शिक्षण घेतले आहे. तर तब्बल २५ टक्के म्हणजेच ४५ नगरसेवक हे केवळ दहावी किंवा त्यापेक्षा कमी शिकलेले असून, यामध्ये दुसरी ते नववीपर्यंत शिक्षण घेतलेल्यांचाही समावेश आहे. ६१ नगरसेवकांनी पदवीपर्यंत मजल मारली असली, तरी एकूण आकडेवारी पाहता शहराच्या शैक्षणिक वारशाच्या तुलनेत लोकप्रतिनिधींच्या शिक्षणाची आकडेवारी कमी असल्याचे दिसून येत आहे. ३३ सदस्य बारावी उत्तीर्ण आहेत, तर ७ सदस्यांच्या शिक्षणाची कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.

  • 02 Feb 2026 10:15 AM (IST)

    बीड हादरलं, बस स्थानक परिसरात तृतीयपंथीयाकडून प्रवाशाला अमानुष मारहाण; व्हिडिओ व्हायरल

    बीड बस स्थानक परिसरात गुंडगिरी आणि वादाच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. काल रात्री बस स्थानक परिसरात एका तृतीयपंथीयाने एका व्यक्तीला अत्यंत अमानुषपणे बेदम मारहाण केली. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बीड बस स्थानकावर तृतीयपंथीयांचा सतत वावर असतो आणि यापूर्वीही अनेकदा किरकोळ वादाच्या घटना घडल्या आहेत. मात्र, कालच्या या गंभीर प्रकारामुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवून प्रवाशांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

  • 02 Feb 2026 10:05 AM (IST)

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कराडमधील शासकीय विश्रामगृहात दाखल…

    सुनेत्रा पवारांसोबत सुनील तटकरे, मंत्री मकरंद पाटील, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर देखील आहेत.. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा सातारा जिल्ह्यात आल्याने सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक देखील याठिकाणी उपस्थित आहेत… थोड्या वेळात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी सगळे नेते निघणार.

  • 02 Feb 2026 09:55 AM (IST)

    कल्याणच्या श्रीमलंगडावर भाविकांची मोठी गर्दी

    अनेक वर्षापासून श्रीमलंगड मुक्तीसाठी शिवसेनेकडून आंदोलन चळवळ सुरू केली असून आज माघ पौर्णिमेनिमित्त शिवसैनिकांकडून मलंग गडावरती आरती केली जाते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आज येणार असून त्यासाठी जयत तयारी करण्यात आली आहे.

  • 02 Feb 2026 09:50 AM (IST)

    बारामतीत ‘दादांच्या’ अंत्यसंस्काराच्या गर्दीत सोनसाखळी चोराचा धुमाकूळ

    राज्यातील लाखो नागरिक आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत दाखल झाले असताना, या दुःखद प्रसंगाचा गैरफायदा घेत चोरट्यांनी नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २८ जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. त्यांच्यावर बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • 02 Feb 2026 09:40 AM (IST)

    भीक मागण्याच्या बहाण्याने महिलांकडून चोरी

    सातपूरच्या कामगारनगर परिसरातील प्रकार. सहा महिलांच्या टोळीचा घरफोडीचा डाव. एका घरातून ८ हजार रुपयांची रोकड लंपास. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. काही संशयित महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले

  • 02 Feb 2026 09:30 AM (IST)

    भाजपा + AP राष्ट्रवादी युतीच्या महापौर, उपमहापौर पदाचे उमेदवार आज ठरणार

    आज अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्याने भाजपा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे घेणार नगरसेवकांची बैठक. भाजपा + AP राष्ट्रवादी युतीच्या सर्व नगरसेवकांची सकाळी ११ वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत होणार बैठक. महापौर उमेदवार ठरविण्यासाठी नगरसेवकांची मते ऐकून घेतली जाण्याची शक्यता. महापालिका निवडणूकित एकूण 68 जागेपैकी भाजपा + AP राष्ट्रवादीच्या युतीने जिंकल्या आहेत सर्वाधिक 52 जागा.

  • 02 Feb 2026 09:20 AM (IST)

    मच्छिंद्रनाथ यात्रेनिमित्त श्री मलंगगडावर भाविकांचा महासागर, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

    आज माघ पौर्णिमेनिमित्त कल्याणमधील श्री मलंगगडावर मच्छिंद्रनाथ यात्रेला भाविकांची मोठी गर्दी. सकाळपासूनच गड परिसर भक्तिमय वातावरणात न्हालेला, जयघोषाने परिसर दुमदुमला. यात्रेच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त आणि सतत निगराणी.

  • 02 Feb 2026 09:05 AM (IST)

    वाढे गावाजवळ कण्हेर डाव्या कालव्याला पडले भगदाड

    मध्यरात्री उशिरा कालव्याला पडले भगदाड. लाखो लिटर पाणी गेले वाया. वाढे पाटखळ गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान. कण्हेर डाव्या कालव्याबाबत वासोळे गावाच्या ग्रामस्थांनी प्रशासनाला दिले होते निवेदन

  • 02 Feb 2026 08:55 AM (IST)

    नाशिक – दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट

    नाशिक येथे  दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. शहरातील दुचाकी चोरीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत. अवघ्या पाच मिनिटांत  दोन दुचाकी चोरी केल्या. शरणपूर रोड येथील राजीव गांधी भवन समोरील इमारतीतील दुचाकी चोरीचा सीसीटीव्ही व्हिडिओ असल्याची माहिती समोर येत आहे.

  • 02 Feb 2026 08:45 AM (IST)

    अमरावतीत भाजपचा महापौर करण्याच्या हालचालींना वेग

    अमरावतीत भाजपचा महापौर करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार असून 3 नावे चर्चेत आहेत. कोअर कमिटीकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवणार पाठवण्यात आला आहे. यावेळी भाजप पुरुष महापौर देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 2 फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असून 6 फेब्रुवारी रोजी अमरावतीला महापौर मिळणार आहे. अशात मॅजिक फिगर जुडविण्यासाठी राजकीय हालचाली वाढल्या आहेत.

  • 02 Feb 2026 08:35 AM (IST)

    अजित दादांच्या अस्थींचे आज नाशिकच्या रामकुंडावर होणार विसर्जन

    अजित दादांच्या अस्थींचे आज नाशिकच्या रामकुंडावर विसर्जन होणार आहे.  मंत्री छगन भुजबळ अजित दादांच्या अस्थी आणणार आहेत.  रामकुंडावर पुरोहितांच्या उपस्थितीत अस्थी विसर्जन कार्यक्रम होणार आहे.  अजित दादांच्या अस्थी येणार असल्याने प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. रामकुंड, मालेगाव स्टँड परिसरात वाहतुकीचे पोलिसांकडून नियोजन सुरू झालं आहे.  दुपारी 3 च्या दरम्यान अजित दादांच्या अस्थी नाशिकमध्ये येणार आहे.

  • 02 Feb 2026 08:25 AM (IST)

    खासदार ओमराजे निंबाळकर यांचा ईव्हीएम घोटाळ्यावरून सवाल…

    ईव्हीएममध्ये घोळ असता, तर ओमराजे खासदार झाला असता का? असा सवाल धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केला आहे. मोदी साहेबांसाठी महत्त्वाची निवडणूक लोकसभेची होती, नगरपालिकेची नव्हे. मग घोळ करायचाच असता, तर तो लोकसभेलाच झाला असता, असे खासदार ओमराजे  म्हणाले. ईव्हीएममध्ये घोळ नाही, मात्र जागरूक राहणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. मतदानादिवशी 50 मते तपासणे, 7C फॉर्मवरील सिरीयल नंबर नोंदवणे आणि मतमोजणीवेळी तीच मशीन आहे का? याची खात्री या तीन गोष्टी केल्या, तर ईव्हीएममध्ये घोळ शक्य नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला….

  • 02 Feb 2026 08:15 AM (IST)

    नाशिक – द्वारका सर्कलच्या अंडरपासच्या कामाला आजपासून होणार सुरुवात

    द्वारका सर्कलच्या अंडरपासच्या कामाला आजपासून सुरुवात होणार आहे.  द्वारका चौकात आजपासून बसेस आणि अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांसाठी द्वारका अवजड वाहनांसाठी बंद राहणार आहे. 15 फेब्रुवारी नंतर हलक्या वाहनाना देखील बंदी असणार आहे. शहरातील वाहतुकीवर प्रचंड परिणाम होणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याची प्रशासनाकडून सूचना देण्यात आली आहे.

  • 02 Feb 2026 08:09 AM (IST)

    बुलढाण्यातील मिर्झा नगरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन..

    बुलढाण्यातील मिर्झा नगरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झालं आहे. परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण आहे. बिबट्या रहिवासी वस्तीत शिरल्याचे cctv मध्ये कैद झालं आहे. यापूर्वी अनेकदा याच भागत बिबट्या आला होता. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

Published On - Feb 02,2026 8:07 AM

Follow Us
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल.
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला.
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन.
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला.
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, मातोश्रीचं टेन्शन वाढताच...
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, मातोश्रीचं टेन्शन वाढताच....
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला.
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?.
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट.