LPG Cylinder Gas Level Check : सिलेंडर संपण्याआधी कसं कळणार ? या 3 सोप्या पद्धतींनी घरबसल्या चेक करा गॅस

How To Check Gas Level Cylinder At Home : LPG कमर्शिअल सिलेंडरची किंमत वाढल्यानंतर लोकांच्या मनात आता सामान्य , घरगुती वापाराच्या सिलेंडरची किंमत वाढण्याचीही भीती आहे. सिलेंडरमध्ये किती गॅस उरलाय हे कोणत्याही मशीनशिवाय, घरबसल्या जाणून घ्यायचं आहे ? मग समजून घ्या हे 3 सोपे उपाय

LPG Cylinder Gas Level Check : सिलेंडर संपण्याआधी कसं कळणार ? या 3 सोप्या पद्धतींनी घरबसल्या चेक करा गॅस
| Updated on: Oct 01, 2026 | 9:57 PM

How To Check Gas Level Cylinder At Home : गणेशोत्सव नुकताच संपला, आता काही दिवसातंच नवरात्र बसेल,. दसरा .. मग दिवाळीच दिवस येतील. सणासुदीचे दिवस जवळ येत असून याचदरम्यान कमर्शिअल LPG सिलेंडरशी निगडीत एका गोष्टीमुळे प्रत्येकाच्या घरच्या बजेटवर परिणाम होऊ शकतो. खरंतर, कमर्शिअल सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत, त्यामुळे बाजारात मिळणारे पदार्थ, मिठाई पासून ते स्नॅक्सपर्यंत अनेकाचे दर वाढू शकतात. एवढंच नव्हे तर आता घरात वापरल्या जाणाऱ्या घरगुती सिलेंडरचे दर वाढण्याचीही भूती लोकांच्या मनात आहे. त्यामुळे गॅसचा वापर काळजीपूर्वक, जपून करण्याचा लोकांचा प्रयत्न आहे. अशातच जर सिलेंडरमध्ये किती गॅस उरलाय हे तुम्हाला आधीच कळलं तर ? स्वयंपाक करता करता अचानक गॅस संपण्याचंही टेन्शन उरणार नाही.

गॅसची आच कमी -कमी होऊ लागली की सिलेंडर संपत आलाय का हे चेक केलं जात. विशेषत: सणासुदीच्या काळात चारी ठाव स्वंयपाक होतो, मिठाई आणि फराळाचे पदार्थ केले जातात, तेव्हा जर अचानक गॅस संपला तर त्रास वाढू शकतो. त्यामुळे गॅस चेक केलेला बरा. त्यासाठी एखाद्या विशिष्ट मशीनच गरज नाहीये, उलट काही साध्या घरगुती उपायांनी देखील सिलेंडरमध्ये किती गॅस आहे , ते तपासता येऊ शकतं.

Loading...

चला जाणून घेऊया सोप्या टिप्स..

पाण्याच्या ट्रिकने तपासा किती गॅस उरलाय

तुमच्या घरात असलेल्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे अंदाज लावण्याचा सोपा मार्ग म्हणजे पाण्याचा वापर करणं. यासाठी एक ग्लास किंवा मग मध्ये पाणी घ्या आणि सिलेंडरच्या वरून खाली हळूहळू ओता. काही सेकंदांनी हाताने सिलेंडरच्या वरून खाली स्पर्श करून पाहा. असं केल्यावर तुम्हाला सिलेंडरचा काही भाग तुम्हाला थंड आणि दुसरा भाग सामान्य किंवा थोडासा गरम वाटू शकतो.

ज्या ठिकाणी सिलेंडर थंड वाटतो, तिथे गॅस असल्याचा अंदाज असतो. याचं कारण म्हणजे, सिलेंडरमध्ये जे लिक्विड LPG असतं ते उष्णता पटकन शोषतं, ज्यामुळे त्या भागाचा बाह्य पृष्ठभाग थंड वाटतो. जर थंड भाग सिलेंडरमध्ये खूप खालीपर्यंत असेल, तर समजून घ्या की सिलेंडरमध्ये की गॅस कमी आहे आणि लवकरच नवीन सिलेंडर बुक करावा लागेल.

वजनावरूनही समजू शकतो किती गॅस बाकी..

जर तुम्हाला गॅसच्या प्रमाणाचा थोडासा अधिक अचूक अंदाज लावायचा असेल, तर सिलिंडरचं वजन तपासू शकता. प्रत्येक LPG सिलिंडरवर त्याचं रिकामं वजन म्हणजे टेअर वेट लिहिलेलं असतं. घरात वजन मोजण्याचं मशीन असेल तर सिलिंडर त्यावर ठेवून त्याचं एकूण वजन बघा. यानंतर एकूण वजनातून सिलिंडरचं जे रिकामं वजन आहे, ते वजा करा. त्यानंतर जे वजन उरेल, त्यावरून सिलिंडरमध्ये असलेल्या गॅसचा अंदाज समजेल. उदाहरणार्थ, जर सिलिंडरचे एकूण वजन 28.5 किलो आहे आणि सिलिंडरवर रिकामं वजन 15.5 किलो लिहिलेलं असेल तर त्यात सुमारे 13 किलो गॅस उरलाय हे समजू शकता.

शेगडीची आच किती ? त्यावरूनही येईल अंदाज

सिलेंडरमध्ये गॅस कमी झाल्यावर अनेकदा याचा परिणाम चुलीच्या ज्वालांवरही दिसू लागतो. आधीच्या तुलनेत गॅसची ज्वाला कमी दिसत असेल किंवा जेवण शिजायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत असेल, तर हे सिलेंडरमध्ये गॅस कमी झाल्याचं लक्षण असू शकतं. असं असलं तरी फक्त ज्वालेचा रंग किंवा ती जास्त-कमी होण्याने गॅसची अचूक मात्रा समजणार नाही, कारण बर्नरमध्ये घाण असेल किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे ज्वालेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असे कोणतेही संकेत दिसल्यास सिलिंडरची स्थिती दुसऱ्या पद्धतीनेही तपासणं उत्तम ठरेल .

सणासुदीच्या काळात स्वयंपाकाचं काम वाढतं, मुळात सिलिंडर पूर्णपणे संपेपर्यंत थांबण्याऐवजी आधीच त्यात किती गॅस शिल्लक आहे याचा अंदाज लावणंच शहाणपणाचं आहे. यामुळे गरज असताना गॅस संपण्याच्या त्रासापासून वाचता येतं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us