हिवाळ्यात कोणते मॉइश्चरायझर वापरावे? त्वचेचा कोरडेपणा टाळण्यासाठी ही आहे लावण्याची योग्य पद्धत

Itchy Dry Skin in Winter: थंडीमुळे त्वचा कोरडी होते. कधी कधी त्वचा अधिक कोरडी झाल्याने खाज येते. तुम्हाला सुद्धा असा त्रास होत असेल तर योग्य मॉइश्चरायझर निवडण्याची आणि लावण्याची पद्धत जाणून घ्या.

हिवाळ्यात कोणते मॉइश्चरायझर वापरावे? त्वचेचा कोरडेपणा टाळण्यासाठी ही आहे लावण्याची योग्य पद्धत
Skin
| Edited By: | Updated on: Nov 17, 2026 | 3:16 PM

हिवाळा सुरू झाला की त्वचेच्या अनेक समस्या जाणवू लागतात. थंड वारे आणि हवेत कमी झालेला ओलावा यामुळे त्वचेतील नैसर्गिक आर्द्रता कमी होते. त्यामुळे त्वचा कोरडी, रूक्ष आणि निस्तेज दिसू लागते. याशिवाय, या दिवसांत गरम पाण्याने आंघोळ करणे, शरीराला उब मिळावी म्हणून हीटर वापरणे किंवा शेकोटी करणे यामुळेही त्वचेचा कोरडेपणा वाढू शकतो. या सर्वांचा परिणाम त्वचेवर होऊन अनेकदा खाज सुटणे, त्वचा ताणल्यासारखी वाटणे आणि त्वचा सोलवटणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे आणि तिच्यातील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवणे गरजेचे आहे. यासाठी त्वचा स्वच्छ केल्यानंतर योग्य मॉइश्चरायझर लावणे महत्त्वाचे ठरते. मात्र, बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांमधून आपल्या त्वचेला अनुरूप मॉइश्चरायझर कसे निवडावे आणि त्याचा योग्य परिणाम मिळण्यासाठी ते नेमके कधी व कसे लावावे, हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी होत असल्यास एकदाच मॉइश्चरायझर लावणे पुरेसे ठरत नाही. काही तासांनंतर त्याचा प्रभाव कमी होऊ लागतो. त्यामुळे त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी दर ४ ते ५ तासांनी मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचा मऊ राहण्यास आणि कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.

Loading...

पेट्रोलियम जेली बेस्ड मॉइश्चरायझर वापरा

त्वचा खूप कोरडी आणि रूक्ष झाली असेल, तर व्हॅसलीनसारखी पेट्रोलियम जेली वापरू शकता. ती त्वचेवर संरक्षणात्मक थर तयार करून नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. विशेषतः टाच, कोपर आणि ओठांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.

बेबी ऑइलदेखील ठरू शकते फायदेशीर

मॉइश्चरायझर लावल्यानंतरही त्वचेचा कोरडेपणा कमी होत नसेल, तर बेबी ऑइलचा वापर करू शकता. यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. हिवाळ्यात ऑइल-बेस्ड मॉइश्चरायझर निवडणेही फायदेशीर ठरू शकते.

मॉइश्चरायझर लावण्याची योग्य पद्धत

गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो. त्यामुळे त्वचा पूर्णपणे कोरडी होण्याची वाट न पाहता थोडी ओली असतानाच मॉइश्चरायझर लावावे. यामुळे त्वचेवरील ओलावा टिकून राहतो आणि त्वचा अधिक काळ मऊ व हायड्रेटेड राहण्यास मदत होते.

घरगुती उपायांचाही वापर करा

मॉइश्चरायझरसोबतच त्वचेची काळजी घेण्यासाठी मध आणि दही यांसारख्या नैसर्गिक पदार्थांचाही वापर करू शकता. मात्र, हे पदार्थ प्रत्येकाच्या त्वचेला सूट होतीलच असे नाही. त्यामुळे वापरण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर चाचणी घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us