किचनधील ही छोटीशी वस्तू म्हणजे चक्क वरदान, चेहऱ्यावर लावल्यास दिसाल तरूण!
तुम्ही तुमच्या किचनमध्ये असलेल्या गोष्टींचा उपयोग करून चेहऱ्यासाठी कोलॅजन जेल तयार करू शकता. हे जेल चेहऱ्यावर लावल्यावर तुमचा चेहरा तजेलदार वाटेल. विशेष म्हणजे हे जेल तयार करण्यासाठी पैसेही खर्च करावे लागणार नाहीत.

Health Skin Tips : प्रत्येकालाच आपण तरुण आणि सुंदर दिसावं असं वाटतं. काही लोक त्यासाठी अनेक प्रयत्न करतात. वेगवेगळ्या प्रोडक्ट्सची अंमलबजावणी करतात. परंतु त्यांना अपेक्षित परिणाम दिसत नाही. मात्र घरातील, किचनमधील वस्तूंचा वापर करून तुमची त्वचा तजेलदार होऊ शकते. त्वचा नेहमीपेक्षा तरुण आणि टवटवीत दिसू शकते.
गोलॅजन जेल तयार करण्यासाठी काय काय गरेजेचे?
तुमच्या घरात असलेल्या वस्तूंचा उपयोग करूनच तयार केलेली जेल तुमची त्वचा चमकदार करू सकते. ते कसे शक्य आहे, ते जाणून घेऊ या. ही जेल तयार करण्यासाठी तुम्हाला किचनमध्ये असलेली लवंग ही छोटीशी गोष्ट फार उपयोगी पडेल. लंगाचे पाणे, कोरफड जेल, जवस जेल, मध, गुलाबजल, बदामाचे तेल आदी वस्तूंच्या मदतीने तुम्ही कोलॅजन जेल तयार करू शकता.
गुलाब जल, कोरफडीचा काय उपयोग
या सर्व वस्तू तुमच्या चेहऱ्यासाठी खूप चांगल्या असतात असे म्हटले जाते. कोरफडीमुळे चेहरा थंड आणि हायड्रेटेड राहतो. जवसाच्या जेलमुळे स्कीन टायटनिंग होण्यास मदत होते. मधामुळे त्वचेतील ओलावा कायम राहतो. तर गुलाब जलमुळे चेहरा ताजातवाना दिसतो.
कोलॅजन जेल कसे तयार कारावे?
कोलॅजन जल तयार करण्यासाठी अगोदर जवसाच्या बियांना उकळून त्याची जेल तयार करावी. त्यात कोरफड जेल मिसळावी. त्यानंतर काही थेंब लवंगाचे पाणी टाकावे. एक चम्मच गुलाबजल मिसळावे. थोडासा मधही टाकावा. त्यात एका व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे तेल, काही थेंब बदामाचे तेल मिसळावे आणि या सर्व गोष्टींचे चांगले मिश्रण तयार करावे.
कोलॅजन जेल चेहऱ्यावर कसे लावावे?
कोलॅजन जेल रात्री सोन्याच्या अगोदर चेहऱ्याला लावावे. त्याआधी चेहरा चांगला स्वच्छ करावा. जेल चेहऱ्यावर लावून हलकी मसाज करावी. आठवड्यात दोन ते तीन वेळा चेहऱ्यावर लावल्यास तुम्हाला तुमची त्वचा तजेलदार दिसेल.
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)