
Hidden Camera In Changing Room : पुरूष असो वा महिला शॉपिंग मॉल अथवा कपड्याच्या मोठ्या शोरूममध्ये कपडे खरेदीसाठी जातात. त्यावेळी कपड्याची फिटींग आणि अंगावर ड्रेस शोभतो की नाही यासाठी ते ट्रायल रूममध्ये एकदा डोकवतातच. कधी-कधी चेजिंग रुममध्ये कपडे ट्राय करताना अनेकदा आपल्या मनात या ठिकाणी कॅमेरा तर लपवलेला नाही ना, अशी शंकेची पाल चुकचुकते.
हॉटेल अथवा चेजिंग रुममध्ये हिडन कॅमेरा असण्याच्या हजारो घटना रोज येतात. अशावेळी प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जर तुम्ही शॉपिंग मॉलमध्ये चेजिंग रुमचा वापर करत असाल तर विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अशा ठिकाणी ट्रायल रूममध्ये छुपा कॅमेरा तर नाही ना, याची तपासणी करणे आवश्यक आहे.
फोनच्या फ्लॅशलाईटची मदत घ्या
ट्रायल रूममध्ये छुपा कॅमेरा आहे की नाही हे माहिती करून घेण्यासाठी तुम्ही फोनचा वापर करू शकता. जर तुम्हाला चेजिंग रुममध्ये एखाद्या ठिकाणी कॅमेरा लपवला असण्याची भीती वाटत असेल तर त्या रुममधी लाईट अगोदर बंद करा. त्यानंतर मोबाईलमधील फ्लॅशलाईट सुरू करून रूम स्कॅन करा. स्मार्टफोनचा कॅमेरा प्रकाश परावर्तीत करतो. त्यामुळे जर एखादा कॅमेरा लपवला असेल तर तुम्हाला असा कॅमेरा लपवल्याचे लागलीच समोर येईल.
ट्रायलरूमच्या आरशाची तपासणी करा
याशिवया ट्रायलरूम अथवा बाथरूममधील आरशाच्या पाठीमागे सुद्धा कॅमेरा लपवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा आरशामागे हिडन कॅमेरा असू शकतो. अशा आरशावर एक बोट ठेवा. आता आरशावर ठेवलेले बोट आणि आरशातील बोट यामध्ये गॅप दिसत असेल तर मग भीतीचे कारण नाही.
मोबाईल मदतीला
जर अशा ट्रायलरूममध्ये तुमच्या मोबाईलचे नेटवर्क वारंवार जात असेल तर समजून जा की अशा रूममध्ये कॅमेरा लपवल्या गेला आहे. जर अशा खोलीत वारंवार नेटवर्क गायब होत असेल तर त्या ट्रायल रुममध्ये कॅमेरा तर लपवलेला नाही ना याची खात्री करा.
बॉडीगार्ड ॲप डाऊनलोड करा
तुमच्या मोबाईलमध्ये बॉडीगार्ड ॲप डाऊनलोड करा. हे ॲप तुम्हाला एखाद्या रुममध्ये कॅमेरा तर लपवलेला नाही ना, याची खातरजमा करण्यास मदत करेल. त्यासाठी प्लेस्टोरमध्ये जाऊन बॉडीगार्ड ॲप डाऊनलोड करा. हे ॲप सक्रिय करताच जर एखाद्या रूममध्ये छुपा कॅमेरा असेल तर लाल रंगाचे निशाण ब्लिंक होईल.