हिवाळ्यातील संध्याकाळ बनवा खास! गरमागरम अन् क्रिस्पी फ्लॉवर भजीचा घ्या आस्वाद, पाहा सोपी रेसिपी
Winter Evening Snacks Recipe: हिवाळ्यात संध्याकाळच्या चहासोबत गरमागरम आणि कुरकुरीत काहीतरी खाण्याची मजा काही औरच असते. अशावेळी चविष्ट फ्लॉवर भजी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. जाणून घ्या याची सोपी रेसिपी

हिवाळा सुरू झाला की थंडीच्या वातावरणात गरमागरम चहासोबत काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत खाण्याची इच्छा होते. अशावेळी वेगवेगळ्या भाज्यांपासून तयार केलेल्या भजी-पकोड्यांना विशेष पसंती दिली जाते. त्यातही फ्लॉवरचे पकोडे हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेले हे पकोडे चवीला अतिशय स्वादिष्ट लागतात. संध्याकाळच्या चहासोबत किंवा अचानक घरी आलेल्या पाहुण्यांसाठीही हा एक उत्तम स्नॅक ठरू शकतो. विशेष म्हणजे, घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून हे भजे कमी वेळात तयार करता येतात. चला तर मग, जाणून घेऊया गरमागरम आणि क्रिस्पी फ्लॉवर भजी बनवण्याची सोपी रेसिपी.
कोबी पकोडे बनवण्यासाठी साहित्य
– २०० ग्रॅम फ्लॉवर
– दीड कप बेसन
– १ टीस्पून बेकिंग सोडा
– २ कप रिफाइंड तेल
– २ टीस्पून आमचूर पावडर
– २ टीस्पून लाल तिखट
– हळद
– चवीनुसार मीठ
– आवश्यकतेनुसार पाणी
फ्लॉवर भजी बनवण्याची पद्धत
फ्लॉवर भजी बनवण्यासाठी प्रथम फ्लॉवर नीट धुवून त्याचे छोटे तुकडे करा. आता एका पॅन मध्ये थोडे मिठाचे पाणी उकळून त्यात हे कापलेले फुल टाका. थोड्या वेळाने चिरलेला कोबी स्वच्छ पाण्यातून काढून बाजूला ठेवा.
पकोडे बनवण्यासाठी फॉलो करा या टिप्स
पकोड्यांचे पीठ बनवण्यासाठी प्रथम एक भांडे घेऊन त्यात बेसन, मीठ, १ चमचा तेल, हळद, लाल तिखट, आमचूर पावडर, खाण्याचा सोडा घालून सर्व साहित्य एकत्र करून घ्या. यात एकदम पाणी टाकण्याऐवजी हळूहळू पाणी घालावे. पिठात गुठळ्या होणार नाहीत म्हणून ढवळत राहा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पिठात थोडासा ओवा देखील घालू शकता. जास्त पाणी घालू नका. पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावे.
असे बनवा फ्लॉवर भजी
फ्लॉवरचे पकोडे बनवण्यासाठी प्रथम एक पॅन मध्यम आचेवर गरम करा आणि त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यावर कोबीचा प्रत्येक तुकडा तयार केलेल्या बेसनाच्या बॅटरमध्ये बुडवून घ्या आणि पॅनमध्ये ठेवा आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा. एका प्लेट मध्ये टिश्यू पेपर ठेवून त्यावर पकोडे काढा आणि हिरव्या चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत गरम चहा बरोबर सर्व्ह करा.