लंच असो वा डिनर, जेवणाची चव वाढवेल दम आलूची ही खास रेसिपी; घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी भाजी

Hotel Style Dum Aloo Recipe: बटाट्याची भाजी सर्वांनाच आवडते. पण नेहमीची एकाच प्रकारची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही दम आलूची ही खास रेसिपी ट्राय करू शकता.

लंच असो वा डिनर, जेवणाची चव वाढवेल दम आलूची ही खास रेसिपी; घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी भाजी
दम आलूची ही खास रेसिपी
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Oct 28, 2026 | 3:22 PM

लहान मुले असो वा मोठे बटाट्याची भाजी सगळ्यांनाच आवडते. बहुतांश घरी बटाट्याची रस्सा किंवा सुखी भाजी बनवली जाते. एखाद्या दिवशी भाजीला काही नसेल तर तेव्हा हमखास बटाटा केला जातो. तर काही लोक डिनरमध्ये बटाटा खाणे पसंत करतात. जर तुमच्या घरी सुद्धा बटाटा खायला आवडत असेल पण नेहमीची तीच ती भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे मसालेदार ग्रेव्हीसह दम आलू बनवा. ही रेसिपी अगदी सोपी असून, तुम्ही हॉटेलसारखी चव मिळवू शकता. ही भाजी लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही आवडेल. पोळी किंवा पराठा या दोन्हींसोबत याची चव खूप छान लागते. चला तर मग जाणून घेऊया टेस्टी दम आलूची भाजी कशी बनवायची.

दम आलू बनवण्यासाठी साहित्य

– ८ ते ९ लहान आकाराचे बटाटे
– १ कांदा
– २ टोमॅटो
– १०-१५ लसूण पाकळ्या
– २ सुक्या लाल मिरच्या
– कोथिंबीर
– २ इंच आले
– २ हिरव्या मिरच्या
– २ चमचे धने
– १ तमालपत्र
– ७ ते ८ काळी मिरी
– ३ ते ४ लवंगा
– दालचिनीचा छोटा तुकडा
– २ हिरवी वेलची
– कसुरी मेथी
– काश्मिरी लाल मिरची पावडर
– हळद
– जिरे पावडर
– धने पावडर
– तेल
– मीठ

Loading...

दम आलू बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम बटाटे उकळून घ्या. उकडलेले बटाटे सोलून थंड करा. नंतर काट्याच्या साहाय्याने बटाट्यामध्ये लहान छिद्रे करून घ्या. आता हे बटाटे गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. आता एका पॅनमध्ये थोडी हिरवी कोथिंबीर घ्या. त्यात लसूण, आले, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, सुकलेल्या लाल मिरच्या, धने आणि थोडे तेल घालून गॅसवर भाजून घ्या. टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घ्या. गॅस बंद करा. हे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करा.

आता कढईत तेल गरम करून त्यात खडा मसाला टाका. नंतर बारीक चिरलेला कांदा घाला. चांगले भाजल्यानंतर आता त्यात हळद, काश्मिरी लाल तिखट, धणे पावडर आणि जिरे पूड घालून मिक्स करा. नीट मिक्स केल्यानंतर त्यात मसाल्यांची पेस्ट घाला. मंद आचेवर चांगले भाजून घ्या. आता मीठ घालून चांगले मिक्स करा. सर्व मसाले भाजून झाल्यावर त्यात तळलेले बटाटे घाला. पाणी घालून घट्ट होईपर्यंत शिजवा. हिरवी कोथिंबीरने गार्निश करा आणि गरमागरम सर्व्ह करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us