घरच्या घरी सोप्या टेस्टी आणि हेल्दी रायता कसा बनवायचा?

Raita Recipe: रायता फक्त उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यात देखील खाऊ शकतो. उन्हाळ्यात उपलब्ध असलेल्या भाज्यांपासून बनवलेला रायता आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. रायता खाल्ल्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करते. चला तर जाणून घेऊया अगदी सोप्या पद्धतीनं घरच्या घरी रायता कसा बनवायचा?

घरच्या घरी सोप्या टेस्टी आणि हेल्दी रायता कसा बनवायचा?
| Edited By: | Updated on: Jan 30, 2025 | 3:18 PM

निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये पोषक तत्वांचा समावेश करणे आवश्यक आहे. अनेकांना वजन कमी करण्यासाठी डायटिंग करायला सांगितले जाते. परंतु डायटिंग करताना तुमच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. वजन कमी करण्यासाठी तुमच्या आहारामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स, गुड फॅट्स आणि कॅल्शियमचा समावेश करावा. त्यासोबतच दररोज दुपारी प्रोबायोटिक्स खाल्ल्यामुळे तुमची पचनक्रिया मजबूत होण्यास मदत होते. अनेकांना जेवणासोबत रायता खायला आवडतो. रायता बनवण्यासाठी दहीमध्ये काही मसाले आणि भाज्या मिक्स करून खाल्ल जाते. रायता तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये खाऊ शकता.

उन्हाळ्यात काही भाज्या आणि फळ खाणे तुमच्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. रायता दररोज खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्यासोबतच बदलत्या ऋतूमध्ये अनेकवेळा संसर्गाचे आजार होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या आहारामध्ये रायता खाल्ल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा संसर्गाचा आजार होणार नाही. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीनं रायता कसा बनवायचा.

काकडी आणि टोमॅटो रायता

साहित्य : 2 कप दही, 1 कप काकडी, 1 कप टोमॅटो, 1 टीस्पून जिरे पावडर, मीठ, मिरपूड

कृती :

  • सर्व प्रथम, दही एका भांड्यात चांगले फेटून घ्या.
  • आता त्यात चिरलेली काकडी आणि टोमॅटो मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात जिरेपूड, मीठ आणि मिरपूड घालून मिक्स करा.
  • तुमचा काकडी टोमॅटो रायता तयार आहे. ते जेवणासोबत सर्व्ह करा.

बीटरूट रायता

साहित्य : 2 कप ताजे दही, 1 कप किसलेले बीटरूट, 1/2 टीस्पून जिरे पावडर, 1/4 टीस्पून काळी मिरी पावडर, 1/4 टीस्पून काळे मीठ, 1/2 टीस्पून लिंबाचा रस, ताजी कोथिंबीर (गार्निशसाठी)

कृती :

  • सर्वप्रथम बीटरूट नीट धुवून सोलून घ्या आणि नंतर किसून घ्या.
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते उकळूनही किसून घेऊ शकता. आता एका भांड्यात दही चांगले फेटून घ्या.
  • त्यामध्ये किसलेले बीटरूट, जिरेपूड, मिरपूड, काळे मीठ घालून मिक्स करा.
  • आता त्यामध्ये लिंबाचा रस घालून मिक्स करा.
  • हिरव्या कोथिंबिरीने सजवा आणि रोटी, पराठा किंवा पुलाव बरोबर सर्व्ह करा.