AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डाळ आणि भातामध्ये किडे पडणार नाही, किचनच्या ‘या’ सोप्या ट्रिक्स करून बघा

आपल्यापैकी बहुतेक घरांमध्ये असे घडते की डाळ आणि तांदूळ यांना किड्यांचा प्रादुर्भाव होतो. जर तुम्ही सुद्धा भरपूर प्रमाणात डाळ आणि तांदूळ यांचा साठा करू ठेवला आहे आणि त्यांना किडे लागत आहे. तर त्यापासून बचाव करण्यासाठी हा लेख अशा हॅक्सबद्दल सांगण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही डाळ आणि तांदूळ कीटकांपासून वाचवू शकता.

डाळ आणि भातामध्ये किडे पडणार नाही, किचनच्या 'या' सोप्या ट्रिक्स करून बघा
| Edited By: | Updated on: Jan 30, 2025 | 3:14 PM
Share

आपल्या भारतात डाळीचे आणि तांदळाचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. त्यामुळे भारतीय थाळी मध्ये डाळीचे प्रकार खायला मिळतात. कारण वेगवेगळ्या डाळींमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. मात्र डाळी आणि तांदळांमध्ये किडे पडल्याने अनेक महिला अस्वस्थ होतात. खरं तर महिला या डाळी आणि तांदुळ यांचा साठा मोठ्या प्रमाणात करत असतात. त्यामुळे त्यांची देखभाल खूप चांगल्या प्रकारे करावी लागते. तसे झाले नाही तर डाळ आणि तांदळात किडे पडायला वेळ लागत नाही. मात्र खूप काळजी घेऊनही काही वेळा डाळ आणि तांदळाला किडीचा प्रादुर्भाव होतो. अशावेळी तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या वस्तू आठवड्यातून एकदा तपासून त्या खराब झाल्या आहेत का हे पाहणं गरजेचं आहे.

डाळ आणि तांदूळ कीटकांपासून कसे वाचवायचे याची चिंता तुम्हालाही सतावत असेल तर हा लेख तुम्हाला काही हॅक्स आणि ट्रिक्सबद्दल सांगणार आहे, ज्यांच्या मदतीने तुमचे काम खूप सोपे होईल. सध्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डाळ आणि तांदूळ यासारख्या गोष्टी जिथे ठेवता तिथे ओलसरपणा आहे की नाही तपासणे. जर त्या ठिकाणी ओलसरपणा असेल तर स्वयंपाकघरातील वस्तू तिथे कधीही ठेवू नका.

डाळी आणि तांदळाच्या डब्यात कीटकांचा प्रादुर्भाव होऊ नये आणि बराच काळ चांगले रहावे असे प्रत्येक महिलेला वाटतं असतं. यासाठी सर्वप्रथम तुम्ही डाळ आणि तांदूळ प्लॅस्टिकच्या डब्ब्यात भरून ठेवता तर सर्वात आधी तो डब्बा काढून हवाबंद डब्ब्यात डाळ आणि तांदूळ यासारख्या वस्तू भरून ठेवा. याशिवाय आपल्या आजीच्या काळापासून चालत आलेल्या घरगुती उपायांबद्दलही माहिती असायला हवं. चला तर मग जाणून घेऊया त्या उपायांबद्दल ज्याने तुमच्या स्वयंपाक घरात डाळी आणि तांदळाचा किड्यांपासून बचाव होईल.

  • डाळींचे कीटकांपासून संरक्षण व्हावे असे वाटत असेल तर डाळीच्या डब्यात ४ ते ५ सोललेल्या लसणाच्या पाकळ्या टाका. या लसणाच्या पाकळ्या कोरड्या पडल्यावर पुन्हा डब्यात ताज्या कळ्या टाकाव्या. यामुळे तुमच्या डाळीत कधीही किड्यांची लागण होणार नाही.
  • लवंग डाळींची चव वाढवण्यास मदत करतेच, शिवाय किडीच्या प्रादुर्भावापासून ही डाळींचे संरक्षण करते. तुम्हाला फक्त डाळीच्या डब्ब्यात 8-10 लवंगा ठेवा आणि तुम्ही डाळ हवाबंद डब्ब्यांमध्ये ठेवली आहे की नाही याची खात्री करा.
  • डाळीच्या डब्यात सुक्या मिरच्या घालणे हे कीटकांपासून बचाव करण्याचा आणखी एक प्रभावी मार्ग आहे. डाळीच्या डब्यात २-३ सुक्या लाल मिरच्या टाकून ठेवा. हवाबंद डब्यात लाल मिरची टाकल्यास कीटक होणार नाहीत.
  • जर तुमच्या तांदळाच्या डब्यात किडे झाले असतील तर. तर त्यासाठी आधी तांदूळ हवाबंद डब्यात ठेवा आणि नंतर त्यात ३-४ तमालपत्रे ठेवा. यामुळे तांदळातील किडींना आळा बसेल.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?.
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.